घाबरू नका, एकदम गाण्या बिण्या बद्दल लिहिण्याचा मानस नाहीये माझा. फक्त एक फंडा म्हणून वापरतोय.
बरीच मेहनत करून, Finally जेव्हा एखादा आपल्याला संपर्क करतो, त्यानंतर आपला Autoresponder जर असा मेसेज सेंड करत असेल , तर बिघडणार काहीच नाही, पण सुधारणार मात्र नक्कीच नाही.
अगदीच "नोकरदार" किंवा "सरकारी" मेसेज वाटतो की नाही ? आपल्या प्रत्येक संवादातून आपण आपल्या ग्राहकाला आपण त्याच्यासोबत आहोत, किंबहुना, त्याच्यासोबत व्यवसाय करायला उत्सुक आहोत, हे सांगायला हवं.
प्रत्येक वेळी एखाद्या Research ची जोड हवीच का ?
***प्रत्येक वेळी गुगल असे म्हणते, किंवा अमुक विद्यापीठातल्या तमुक प्राध्यापकाने असे म्हटले आहे असे आधार लागत नाहीत. आपली बुद्धी, आपली समज ह्यावर विश्वास ठेवून जगायला लागलं कि, जाणवेल, कि वरील Autoresponder बदलून जरा बदलला कि ग्राहक आपल्याला लगेच orders ची थाळी घेऊन हजर होईल असं नाही, तरी शक्यता प्रकारात तरी नक्की येईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सतत एक सकारात्मक, उत्तम संवाद साधायची सवय लागेल, ज्यातून मग आश्चर्यकारक असे Results मिळू शकतील.
प्रत्येक संपर्क महत्त्वाचा ! मौल्यवान
saturday club चे संस्थापक भिडे सर ह्यांच्याकडे सुमारे १२ हजार व्यावसायिक मंडळींचा data प्रिंटेड, वर्गवारी करून , Filing करून कपाटात नीट राखून ठेवला होता. हे मला सांगितलं त्यामानाने तरुण व्यावसायिक हर्षवर्धन भुर्के ( आज ४५ असतील ). ते जेव्हा भिडे सरांना २०१६ मध्ये भेटले तेव्हा, भिडे सर वय वर्ष ८३.
आलेल्या संधीचं सोनं करणे म्हणजे हेच छोटे-छोटे बदल लगेच अंमलात आणणे, नाही का ?
तर जर whatsapp ला autoresponder सेट केला असेल, तर तो लगेच ग्राहकाभिमुख करा आणि स्वत: ला बदल. माझा एक mentor , गोपालकृष्णन एक शब्द छान वापरतो : Prospect Empathy. Empathy ला मराठी शब्द सहानुभूती असा आहे, पण मला आस्था हा शब्द जास्त योग्य वाटतो.
ही आस्था विकसित करणे म्हणजे कायम ह्याचं स्मरण राखणे की आपल्या सेवा ग्राहकाला काय Value Add करतील ? ह्याबद्दल पुन्हा कधीतरी. सध्या आपला Autoresponder गरज असल्यास नीट करून घेऊ.
*** इंटरनेट वरून अनेक महान वक्ते आपल्याला विनामुल्य ऐकायला / वाचायला मिळतात. त्यातील निवडक असे भाष्य निवडून चर्चा असा एक सुरेख प्रवास आम्ही निवडक उद्यमी ह्या आमच्या साप्ताहिक ग्रुप मध्ये करत असतो. शुक्रवारी रात्री online मिटींग्स असतात. मीटिंग विनामूल्य attend करता येते.
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.