Thursday 18 August 2022

तरीही तुम्हाला लिहावंसं वाटतंय का ?

कालच एका मित्राशी चर्चा करताना विषय निघाला, ते linked in वर अनेक वर्षे लिहित असतात. त्यांच्या एका मित्राची तक्रार सांगत होते ... " काही Likes नाहीत, comments नाहीत, काही उपयोग नाही " 

चांगलं आहे. तरीही तुम्हाला लिहावंसं वाटतंय का ?

नील पसरिचा नावाचा एक लेखक आहे, ज्याचं एक podcast आहे त्यात त्याने म्हटलंय कि रोज माझी व्यक्त व्हायची जागा म्हणजे माझा blog. तो सलग ३ वर्षे हून अधिक , रोज एक blogpost लिहित असे. "आज काय चांगलं घडलं" इतकाच विषय. स्वत:शीच संवाद. आज त्याचा podcast सर्व ऐकतात, ह्यातच यश आलं की ! पण असं काही नाही झालं, किंवा खात्री दिली गेली, 

तरीही तुम्हाला लिहावंसं वाटेल का ?

Blog म्हणजे व्यक्त होणे हो ! platform कोणताही असेल. blogger, इमेल लिस्ट, whatsapp किंवा चक्क आपली डायरी. स्वत:शी उत्स्फुर्तपणे झालेला संवाद, मार्केटिंग साठी नव्हे. Marketing मध्ये ing म्हणजे करणे ... थोडा push आहे. आपण म्हणतोय ते "होणारं" ... आतून सळसळून बाहेर यायला मागणारं. किती हवं, काही प्रमाण नाही. कसं हवं ... काहीही चालतंय ... बोलायचं असेल, तर mobile वर करा रेकॉर्ड. Video नाही म्हणणार मी कारण त्यात थोडं दिसणं वगैरे आलं.

आता तरी तुम्हाला लिहावंसं वाटेल का ?

आमच्या मित्राच्या कथेतला उर्वरित भाग सांगतो : ते स्वत: जे आवश्यक वाटेल तेच लिहितात, शिवाय सगळा प्रत्यक्ष अनुभवच लिहितात, Forwarded काहीच नाही, ४-५ वर्ष तरी लिहितायेत ( न मोजता ) . आणि त्याना त्यातून कस्टमर मिळतात. 🙋

आता ( तरी ) कदाचित लिहाल .....

हे कस्टमर तुमच्या कोणत्याही पोस्ट ला LIKE/COMMENT/SHARE करणारे अजिबात नसू शकतात. आणि  ४-५ वर्षात एखादा मिळेल, ह्याची काहीच शाश्वती नाही. 

तरी लिहाल ?

तुम्हाला लौकिक यश असेल, तरी आणि नसेल ( तुमच्याच मनात ) तरीही लिहा. कारण हा प्रवास आहे. प्रवासवर्णन समजून लिहा. ह्याचा जगाला , निदान एखाद्याला तरी, कधी तरी, कुठे तरी निश्चित उपयोग होईल. गेला बाजार .. तुम्हाला भीड भाड न बाळगता व्यक्त व्हायला तर मिळेल !

आता ( तरी ) लिहा !

No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.