Wednesday, 16 March 2022

हातातली कामे ही सर्वात महत्त्वाची ....

जे जे बिझनेस ग्रुप्स मी पाहतो, तिथे एक-कलमी कार्यक्रम चालू असतो, तो म्हणजे प्रमोशन. चर्चा सुद्धा ह्याच्याच की किती नवीन orders मिळाल्या, यश सुद्धा किती नवीन ग्राहक मिळविले वगैरे ह्याच्याच. इतकंच काय, तर त्या त्या खुद्द नेटवर्क चं यश सुद्धा असंच मोजलं जातं. किती नवीन members जॉईन झाले वगैरे. 

हे महत्त्वाचं आहे, तरीही फक्त हेच महत्त्वाचं नाहीये. किंबहुना, माझ्या मते तर हे दुय्यम आहे, म्हणजे अगदी मार्केटिंग च्या दृष्टीने पाहिलं तरीही. कसं ते जरा सांगायचा प्रयत्न करतो ...

आपण एखादं काम , व्यवसाय सुरु करतो, ते अर्थार्जनासाठी. म्हणजे आपण एखादा product किंवा सेवा विकतो म्हणजे पैशाच्या बदल्यात देवू करतो. त्या त्या product किंवा सेवेचा समोरच्याला ( ग्राहक, जो ग्रहण करतो तो ) काहीतरी उपयोग होतो. कोणत्यातरी purpose म्हणजे हेतू करिता. अर्थात आपण त्याचा तो हेतू साध्य करतो. आपले उत्पादन अथवा सेवा त्याच्या हेतू साध्य करण्याच्या उपयोगी पडली. ही सेवा घेताना किंवा product वापरताना, जर तो ग्राहक समाधानी झाले, तर ते शक्यतो पुढे दुसरीकडे कुठे जात नाही. आणि आपल्याला एक विश्वासू ग्राहक मिळतो. असा ग्राहक आपल्याला पुढेही इतर ग्राहक देवू शकतो. 

काही काही उत्पादने हि किंवा सेवा ह्या पुन्हा पुन्हा लागणाऱ्या असतात, किंवा एखाद्या प्रकल्पाचा भाग असतात. त्यातही पुन्हा हेच तत्त्व लागू पडतं. एखादेवेळी एखादं नवीन उत्पादन/प्रक्रिया वगैरे विकसित करायची असते, तिथेही आपण पुरवठादार ह्या भूमिकेत असलो तरी ग्राहकाच्या सोबत रहावं लागतं. ती साथ ठेवली तर आपल्याला एक कायम स्वरूपी ग्राहक मिळाल्याचं समाधान मिळेल, शिवाय आपण निवडलेल्या व्यवसायाला एक अधिष्ठान प्राप्त होईल. 

म्हणजेच दिवसाची, महिन्याची समय सारिणी ठरवताना सर्वात आधी आपला Focus हवा आपल्या Exisiting Customers वर, त्यानंतर Admin वर आणि शेवटी भविष्यातील संधींवर : ह्यातच पुढच्या orders वगैरे येईल. आधी हातातलं सांभाळणे हे सर्वात महत्त्वाचं.

हा विषय निघाला कारण मला माझं Presentation द्यायचं आहे एके ठिकाणी. त्यात ग्राहक कोण सांगू ? उथळ पणाने २ - ४ परिचित नावे लोकांसमोर फेकू शकतो (खरोखर कस्टमर असलेली) , तरीही माझ्या दृष्टीने तेच महत्त्वाचे ज्यांनी मला त्यांच्या डिजिटल मार्केटिंग च्या प्रवासात मला सोबत ठेवलं आहे. ह्यातल्या सर्वात जुन्या ग्राहकाने तर मला एकदाही, छोटासा review देखील दिलेला नाहीये. पण २०१४ पासून सोबत आहोत ह्यापेक्षा काय अधिक review असायला हवा ? 

जुन्या आठवणी शिकवतात ...

मला आठवतंय ... मला एका कस्टमर ने मशिनरीची order देताना सांगितलं होतं ... संपूर्ण होईपर्यंत आमच्या सोबत रहा ! त्यातून हेच शिकलोय, कि ग्राहकाला त्यांचे सप्लायर्स सोबत हवे असतात. हाच आपला स्वधर्म !


No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.