Saturday Club च्या मिटींग्स मध्ये माझे मित्र श्री सुहास फडणीस हे या प्रकारातले एकदम मास्टर समजता येतील; अनेकांना ते सतत ह्यात सुचवत असतात. मी अगदी आत्ता आत्ता पर्यंत इतकं महत्त्व देत नव्हतो याला. पण माझे डोळे अगदी खाडकन उघडले नुकतेच !
नुकतंच मराठी connect च्या मीटिंग ला आमच्या प्रत्यक्ष मीटिंग नंतर गप्पागोष्टी सुरु असताना,एक सदस्य म्हणाले:-
"आपल्याकडे त्या वीज बिल कमी करून देणाऱ्या एक गेस्ट आल्या होत्या ना काही दिवसांपूर्वी .."
वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच दोघांनी ( मी आणि कात्रे ) नाव सुचविलं : गायत्री अकोलकर. यथावकाश, गायत्री चा त्यांच्याशी संपर्क होवून पुढे संधींची देवाण घेवाण होईलच. पण ह्या प्रसंगाने आणि नंतर गायत्री शी पुन्हा एकदा ह्या संदर्भात बोलल्याने मला दोन-तीन गोष्टींचा उलगडा झाला :-
- नेटवर्क मिटिंग मध्ये सुरुवातीची ५ ते १० सेकंदच लोकांचं आपल्याकडे लक्ष असतं.
- तेवढ्यात त्यांच्या लक्षात राहील असं काहीतरी करायचं
- Tagline हा ह्याकरीता उत्तम पर्याय.
- Tagline सुलभ , सोप्पी असावी.
लहानशीच असावी : छोटीशीच आहे : ५ सेकंदात संपते.
"आम्ही तुमचे वीज बिल कमी करून देतो"
फक्त ७ शब्दांत खेळ खल्लास. ते सुद्धा जास्तीत जास्त 2-३ अक्षरांचे. पहिल्या १० सेकंदात आणि संपायच्या आधी बरोब्बर योग्य त्या व्यक्तींच्या Attention स्पेस मध्ये घुसते.Service Piched : Energy Audits, मुख्य व्यवसाय : Electrical Contracter.
Effect , परिणाम काय साध्य होईल हे बोलणे अपेक्षित :
ह्यात प्रमुख व्यवसाय
Electrical Contracter,,किंवा Pitch करत असलेल्या serviceEnergy Auditsबद्दल उल्लेख नाही , तर मिळणाऱ्या उपयुक्त परिणामा बद्दल बोलले गेले आहे.
मिळणारा परिणाम हा बरोब्बर समस्येवर बोट ठेवणारा आहे, तोही रोजच्या जीवनातील :
"Energy Audits" म्हणलं तर फार कमी लोक connect होतील. पण वीज बिल कमी करून देतो म्हटलं कि खूप लोकांना कळतं , आणि प्रत्यक्ष reference मिळू शकतात.
शब्दही अलंकारिक वगैरे नाहीत :
अलंकारिक किंवा शब्दच्छल करून वगैरे लिहिलं कि तुमच्याबद्दल दबदबा निर्माण होईल, कौतुक देखील होईल. तरी त्यातून व्यवसायासाठी Reference मिळतील असं नाही. हे टाळलेल दिसतंय.
तात्पर्य :-
अगदी गणित करून नको करायला, तरीही Tagline सुरुवातीलाच येवू द्या,आणि Effect वर फोकस ठेवायचा इतकं मात्र माझ्या पक्कं लक्षात राहिलंय. मीसुद्धा लागलोय ह्या कामाला आता.
मस्तच,बारकावे छान उलगडलेयत, धन्यवाद गायत्री आणि सौमित्र सर,मी देखील लागतो कामाला 🙇♂️
ReplyDeleteJarur
Deleteअगदी बारकाव्यासह उलगडून सांगितले आहे.👍
ReplyDeleteअगदी बारकाव्यासह उलगडून सांगितले आहे.👍
ReplyDelete