उद्योग समूहांवर सतत कसे पैसे "ओढतात" अशा सुराने स्तुतिसुमने उधळली जात असतात. करतही असतील अवास्तव नफेखोरी कधी कधी.त्याची तरफदारी नको करायला. तरी पडत्या काळात, कठीण काळात, जेव्हा अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असते,तेव्हा हे मोठे मोठे पसारे सांभाळणे हे सुद्धा खूप कठीण आव्हान असतं. ह्याबद्दल विशेष बोललं जात नाही. जणू काही नफा किंवा संपत्ती निर्माण करणे ही एक वाईट कृती असावी.
सध्या आपण अत्यंत आव्हानात्मक अशा परिस्थितीतून जात आहोत, त्यात परत आपल्या देशाबद्दल प्रतिमा भरपूर मलीन करण्याचे प्रयत्न होत असताना दिसत आहेत, ज्यात आपलेही बंधू - भगिनी हो मध्ये हो मिसळून मस्त सहभाग देत आहेत, वगैरे वगैरे. ह्या अशा वातावरणात अशा मोठ्या कंपन्या कसा मार्ग काढत असतील ? आपल्या सहकाऱ्यांना, संबंधितांना कसं बरं प्रेरित, आशादायी ठेवत असतील ? उत्तर आहे : ह्यांचे नेतृत्त्व!
नेत्याने नेहमी मार्ग दाखवावा
हे आज वाचण्यात आलं. संघाच्या निराश खेळाडूंना बात्रा एक मार्ग दाखवत आहेत, अडचण मान्य करून. इथे उद्दामपणा नाही;तर संघासाठी, त्या खेळाडूंसाठी सर्व काही करण्याची मानसिकता,उगाच भांडत न बसता.
असाच Optimism IPL च्या वेळी दिसला
एक तर प्रत्यक्ष स्पर्धा सुरु केली, काही सामने झाले, नेहमीच्या रंजकतेने. प्रेक्षकांविना. किती येत असेल खर्च वगैरे तर सोडाच;अंतर्गत किती तरी विरोध असू शकतो असे निर्णय घेताना. तरीही खेळाडूंना उत्तमोत्तम सुविधा देवून, त्यांच्या सुरक्षिततेची हमी घेवून हे सामने खेळविले गेलेत.
अमिरातीत जाण्याची तयारी दर्शविली गेली, तिथे अडचण;तर आता उरलेला सिझन इंग्लंड मध्ये खेळवण्यात येणार आहे. इतकी मानसिक तयारी आहे. आम्ही करणारच अशी जिद्दच दर्शवितो हि कृती!
सोडून द्यायला काय लागतं !
नकोच करायला म्हटलं; कि संघर्षच संपला. मग बसा आमटी भाकरी आणि काकडीची कोशिंबीर खात, आणि घरी बसून TV serials वर चविष्ट चर्चा करीत. हे TV serials चे लोक सुद्धा पहा : गोव्यात गेलेत, सर्व संच घेवून. किती fast करत असतील काम वगैरे तर झालंच, तरीही ह्याला गती देणारे नेतृत्त्व असते, म्हणून हे घडते. सोडून द्यायला काहीच लागत नाही.
असाच optimism आपण आपल्या व्यवसायात, संघात, ग्रुप मध्ये आणू, इतकं तर आपण नक्कीच करू शकतो ना यार !
आपल्याला खरा विश्वास वाटायला हवा - आतून !
- "हो जायेगा भाय" हा मंत्र जपुयात. थोडं बसुयात. पाहूयात. जाणवेल, दिसेल, कि माझ्या स्वत:च्या आयुष्यात असे कितीतरी ह्यापेक्षाही आव्हानात्मक प्रसंग येवून गेलेले आहेत. त्यातून मार्ग निघत गेलाय. कधी माझ्या कर्तुत्त्वाने; तर कधी कुणाच्या तरी;अथवा परिस्थितीने. मार्ग हा निघतोच. कारण मुळात जीवन हे प्रवाही आहे, उर्जेचा खेळ. त्यामुळे हे बदलेल. ह्यावर पक्का विश्वास असू द्या.
लागणारा वेळ त्याला देवू. Parallely, स्वत:ला सक्रीय कामात बुडवून घेऊ. माझ्या ८४ वर्षाच्या आईचं उदाहरण मी देईन इथे: तसं काय काम आहे तिला सध्या ? शिवाय सध्या थोडं थोडकं सुद्धा बाहेर जाता येत नाहीये. तरी तिने तिचं तिचं एक छानसं रुटीन लावून घेतलंय. त्यात संध्याकाळच्या सिरियल्स अविभाज्य घटक आहे. negative वगैरे वाटतात: त्या 😒मला. तिला नव्हे. तिने त्याला एका "रुटीन" चं स्थान दिलंय. सकाळी उठल्यापासून सर्व शारीरिक कामे देखील ती अजूनही करते. स्वैपाक सुद्धा करू शकते सगळा, करतेही. मी सुद्धा थांबवत नाही. कारण हीच तर आहे साधना, तपश्चर्या. आजूबाजूला प्रेरक घडो, न घडो. मी माझ्या कामात मग्न. आत्ता सुद्धा तिची भाज्यांची निवडणूक सुरूच आहे बाजूला. शिवाय मला प्रश्नही विचारतीये कि twitter म्हणजे काय ? smart phone वापरायला शिकली आहे ती, शिवाय तिला नवीन गाणीही खूप आवडतात, आवडून घ्यायची वृत्ती ठेवलीये. कालच गुणगुणत होती : मै तो रस्ते से जा रहा था 😄- कदाचित यांत्रिक वाटेल हे. तरीसुद्धा उगाचच ती ना निराशेच्या लाटेवर स्वार होते, ना आनंदात प्रचंड मशगुलता दाखवते! तर थोडक्यात काय : तर बदललेलं रुटीन पटकन स्वीकारा, उगाच "झूम मिटींग्स चा वैताग येतो" नका म्हणत बसू. नुकसान आपलंच.
- बातम्या टाळता येणार नाहीत, प्रमाण टाळता येईल, परिणाम टाळता येईल. कमी वेळा updates चेक करा. परिणाम कसा टाळता येईल ? आत्ताचा विचार केलात तर असे साठीचे रोग अनेक वेळा आले,गेले. हा सुद्धा येईल,जाईल. मी माझं रुटीन सुरु ठेवीन. हा स्वार्थ वाटतो का ? असेल, तर हा खरा स्वार्थ आहे. आपण उत्तम राहिलो, आनंदी राहिलो, आशावादी राहिलो, तर चार लोक राहतील ना, आजूबाजूचे ! नाहीतर आपलं खत्रूड थोबाड पाहण्यात रस नाही कुणाला. त्यामुळे : "दिल जवॉ, तो दुनिया हंसी" हे लक्षात ठेवून आनंद, आश्वासकता पसरवू सभोवताली. हाच परमार्थ.
- नेट्वर्किंग meetings मध्ये सहभागी व्हा ! Saturday क्लब च्या meetings मध्ये सहभागी व्हा. उत्साही वाटतच ! सध्या झूम वर असतात, मेंबर असाल तर कोणत्याही क्लब ची मीटिंग विनामुल्य ! नसाल, तर एखाद-दुसरी मीटिंग जरूर attend करा, जमल्यास सभासद व्हा, अनेक उद्योजकांचा सहभाग, सहवास लाभेलच, शिवाय धंदा मिळण्याची आशा ! इतकं टोनिक व्यावसायिकाला पुरेसं आहे.अशीच मीटिंग मराठी connect किंवा BNI ची सुद्धा असते. तीही करा attend, Point काय : विश्वास बळकट करा. असेच इतरही अनेक क्लब्स, ग्रुप्स असतात. आम्ही निवडक उद्यमिच्या whatsapp ग्रुप वर ह्या आजूबाजूच्या मिटींग्स बद्दल आवर्जून सांगतो लोकांना.
करून पहा, अवश्य, आणि कळवा अभिप्राय! प्रेरित रहा, उत्साही रहा, उद्योग धंद्याची कास धरा !
'हो जायेगा भाय', क्या बात बोलेलाय बाप,
ReplyDeleteलोगो का 'दुर्गती' हो गया था , अभि एकदम से 'ह्रिदयपरिवर्तन'हो जायेगा 🙂