कधी कधी whatsapp किंवा telegram वर आपण मोठे मोठे मेसेजेस पोस्ट करतो. वाचले जात असतीलही, तरी ते जर blog वर पोस्ट केले ना, तर जास्त उपयुक्त ठरू शकत. ह्या मोठ्या मेसेज चा एक छोटा मेसेज तयार करायचा : म्हणजे नक्की वाचकांना त्याचा काय उपयोग होईल वाचून हे त्या short मेसेज मध्ये लिहायचं, आणि त्याची लिंक पोस्ट करायची सोबत.
फायदा कसा होतो ?
- आपल्याला नेमकं शोधायची आणि बोलायची सवय लागायला लागते.
- त्या मेसेज मधलं "नेमकं" ते share केल्याने ज्याला उपयुक्त ठरू शकतं , त्याच्या नजरेस हि पोस्ट यायची अधिक शक्यता असते; त्यामुळे तुमचा वाचक वर्गही वाढेल. आणि तोही नेमका. नुसताच 👌किंवा 👍 करणारा नाही.
- blog ला एक "लिंक" असते, त्यामुळे तुमचं लेखन हे पटकन वितरीत करता येतं, परत परत वापरता येतं.
- blog पोस्ट म्हणजे एक जास्त काळ नेटवर राहणारा ऐवज असतो. दीर्घकाळ स्मरणात राहतो, राहू शकेल.
Right way to create a digital content ..
ReplyDelete