बऱ्याच वेळा सकाळी सकाळी जागे झाल्यावर समोरचे problems मन:पटला वर दृश्यमान व्हायला लागतात. काहीना हे अगदी सहज बाजूला ठेवायला जमतही असेल. पण मला मात्र विशेष असे प्रयत्न करायला लागतात ह्याच्या करिता. खास प्रयत्न, खास टूल्स वापरून. नाहीतर गाडी जाऊ लागते चिंतेच्या रुळांवरून, चिंतापूर जंक्शन ला.
तरी मला अगदी हल्ली हल्ली उमगलेलं एक लेटेस्ट realization म्हणजे :-
हे नकारात्मक विचार किंवा भाव बऱ्याच वेळा ALERTS सारखं काम करीत असतात.
उदाहरणादाखल सध्या चालू असलेली Pandemic ची चिंता. हे शब्द ऐकले कि मनात चिंतेचं बीज पेरलं जातं : ह्याचं पुढे मोठ्ठं झाड होऊ शकेल. हो, हे ते नकारात्मक असेल, जर पुढचा विचार भीती, धास्ती ह्याकडे गेला तर. उलटपक्षी हा विचार करताना जर आत्म स्वगत बदललं, तर मात्र हेच नकारात्मक बीज आपला मित्र होऊ शकेल.
- बीज : काळजी वाढविणारी बातमी आली पडद्यावर " वाढवलाय यार lockdown"
- आत्म स्वगत : " कसं व्हायचं व्यवसायाचं !" किंवा " कसं होणार माझं पुढे !" वगैरे वगैरे !
- इथे एखादा Anchor लावता येईल : मी माझ्या स्वत:च्याच टपलीत हळूच मारून घेतो. Anchor म्हणजे अशी एखादी कृती करायची : Quick : जी केल्याने तुम्ही पुढच्या अपेक्षित विचारांकडे मनाला आणू शकाल. हि काहीही असू शकेल. आता मला इथे "चल, हे विचार बंद कर आधी, हे निष्फळ आहेत, ही विचार शृंखला बंद कर" ह्या विचारावर मनाला आणायचे आहे. ह्याच्याशी Connected अशी माझ्या आईने लहानपणापासून मारत आलेली टप्पल हि कृती मला ताळ्यावर आणते, हे माझ्या मनाला परिचित आहे. म्हणजेच मी माझ्या टप्पल ह्या कृतीने मनाला सांगितलं , की ही विचार शृंखला तोड. बस्स !
- आता स्वीकार : "हे असणार आहे भाऊ काही काळ. सगळ्यांच्या सोबत."
- आश्वासन : ह्यातूनच मार्ग निघेल, असंख्य प्रसंगांतून निघतो , तसा.
- Alert : चल मित्रा,कामाला लागू. योग्य ते सर्व measures घेवून !
मी येतो बाहेर, आणि आपली नित्यकर्मे करायला लागतो. ना नकारात्मक , ना सकारात्मक. एवढे तरी करता येतं.
अशा तुमच्या आहेत काही आयडीया ? share करा !
Anchor आणि स्वीकार खूप महत्वाचा.... छान लिहिलं आहेस सौमित्र.
ReplyDeleteAnchor आणि स्वीकार खूप महत्वाचा.... छान लिहिलं आहेस सौमित्र.
ReplyDelete