whatsapp चा वापर वाढल्यापासून लोकांना ज्ञान वाटण्याची प्रचंड सुरसुरी येवू लागली आणि प्रचंड सवंग पणाचा महापूर जणू लोटू घातलाय. त्यातून उथळ साहित्य भरभरून वाहू लागलं , आणि येईल जाईल ती मंडळी ढकल करू लागली.
उपयुक्त वगैरे वाटण्याची हौस समजू शकतो; तरी जरा समजावतील तरी ! तर ते पण नाही ! नुसती बातमी पाहिली, धडाक ... उपयुक्त .... select group ... forward ही अगदी नित्याची झालीये कृती.
मी माझ्यापुरता तरी एक नियम घेतलाय लावून ...
एक तर फारच मोजक्या ग्रुप्स वरचा मजकूर पहायचा. खूप चांगलं मिळालं तर त्यातली अगदी मोजकीच १ ते 2 गोष्टी सूत्र स्वरूपात आपल्या group बरोबर share करायच्या. ह्याने निदान ग्रुप सदस्यांना नेमका मसला झटक्यात मिळतो; शिवाय शेवटी लिंक देवून टाकावी , ज्याला हवीत details तो पाहून घेईल कि !
निवडक कृती करणारे निवडक उद्यमी
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.