मागील पोस्ट मधील ठळक वैशिष्ट्ये
1.चलनवाढ (महागाई) हा एक प्रकारचा खर्चच आहे जो दरवर्षी साधारण 6 टक्क्याने वाढतोय
2.उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी गुंतवणूक ही 'निवड' न राहता 'निकड' झाली आहे (Its no more a choice, rather a compulsion)
आता एकदा का आपल्याला कळलं की गुंतवणुकीच्या परताव्याचा दर 6 टक्क्यांपेक्षा अधिक हवा की काही गोष्टी स्पष्ट होतात...
कुठल्या?
1.बँकांची
कुठलीही उत्पादने (Inflation) ला मागे काढत नाहीत...करंट किंवा सेविंग
अकाउंट मध्ये परताव्याचा दर Inflation पेक्षा कायमच कमी असतो. FD ला वयस्कर
व्यक्तींना काही बँका 6 टक्के परतावा देतील सुद्धा पण ज्या दिवशी तुम्ही गुंतवणूक
काढून घ्याल, तेव्हा ती रक्कम हे तुमच त्यावर्षीचे उत्पन्न गणले जाईल आणि
त्याअनुषंगाने तुम्ही ज्या करपात्र प्रकारात (Tax Bracket) मध्ये याल त्यानुसार कर भरावा
लागेल. थोडक्यात तुमच्या अपेक्षित खर्चापेक्षा परताव्याचा दर कमी होईल.
(ह्याचाच अर्थ जेव्हा तुम्ही 15 वर्षांसाठी लाखांनी/कोट्यांनी रुपयांची FD
करता, तेव्हा उत्तरोत्तर तुम्ही तुमची संपत्ती कमी कमी करून घेता 🏽♂️)
2.किसान विकास पत्र, पोस्टातली गुंतवणूक, सरकारी रोखे , सोनं इत्यादी कुठलीच उत्पादने Inflation पेक्षा अधिक परतावा देत नाहीत
3.वरील
उत्पादनांना काही लोकं 'जोखीम विरहीत' उत्पादने मानतात (घरबसल्या सिलिंग
फॅन माझ्या डोक्यावर पडू शकतो - हे ऐकायला जितकं अतर्क्य वाटतं त्याच
न्यायाने एवढी किमान जोखीम जगतांना प्रत्येक क्षणी असते) त्यामुळे
गुंतवणुकीचे निर्णय डोळसपणे घ्यावेत.
मग कुठल्या साधनांमध्ये 6 टक्क्यांपेक्षा अधिकचा परतावा देण्याची क्षमता आहे?
भारतातील गेल्या 40 वर्षाचा इतिहास पाहता खालील दोन साधनांमधील गुंतवणुकीने सातत्याने inflation ला मागे काढलंय -
1.भांडवली बाजार (स्टॉक मार्केट)
2.म्युच्युअल फंड
कसं? परताव्याचा दर कसा मोजायचा इत्यादी पुढील भागात
'तळ
टीप' - 'Rule of Inversion' - Instead of asking, 'How do i save and
invest? Ask yourself, How would i get broke - You will find the right
track
धन्यवाद
मागे काढलंय म्हणजे त्याचा परतावा हा inflation ला मागे टाकतोय, असंच ना ?
ReplyDeleteआर्थिक साक्षरता वयाच्या बारा वर्षांपासून शिकवले पाहिजे
ReplyDelete