बिझनेस नेट्वर्किंग मीटिंग ला गेल्यावर खूप लोक भेटतात,आणि वाटू लागत : सगळेच कामाचे आहेत की ! तरीही त्यातून कशी निवड कराल ?
प्रथम एक पक्क समजून घेऊ ; कि इथे सर्वच "रेफरल" ह्या उद्देशाने आलेले आहेत. सगळेच दुकानदार. नाही म्हणायला काही खरेदीदार सुद्धा असतात आलेले, तरी खूपच कमी. त्यामुळे पुन्हा इथून ग्राहके नका शोधू. हा लेख जरूर वाचा
आता मग कसं काम करायचं ?
जाणून घ्या स्वत:चा रेफरल फनेल
प्रथम आपल्या व्यवसायाचा नीट विचार झालेला असायला हवा : म्हणजे मी काय करतो, आणि कोण माझ्यासाठी उत्तम रेफरल partners ठरतील ! जरा एखादं उदाहरण घेऊन पाहूयात. आपले एक सदस्य , समजा " Industrial पेंटिंग" ची कामे करतात. तर त्यांनी हे रेफरल partners कसे शोधायचे ?
काम काय आहे ? कारखान्याचे रंगकाम
आदर्श ग्राहक कोण ? जरा मोठ्या कंपन्या (लिमिटेड कंपन्या )==> तेथील परचेस किंवा मेंटेनन्स व्यवस्थापक : ह्यांच्या पर्यंत पोचायचे आहे.
👉म्हणजेच ह्यांच्या पर्यंत पोहोचवू शकणारे नेटवर्क partners हवेत. रेफरल Partners म्हणूयात. म्हणजेच हे पहायचं आहे कि , इतर कोणत्या प्रकारच्या सेवा किंवा उत्पादने देणारे व्यावसायिक ह्या मंडळींच्या नियमित संपर्कात असू शकतात ते. सोपं झालं काम. आता लागुयात कामाला :-
- कॅन्टीन व्यवस्थापन agency : Industrial Caterers
- Water Plant AMC Contractor
- Computer Hardware Suppliers
- Oils and Consumables चे सप्लायर
- सिविल कंत्राटदार
- आणि इतरही...
ही अशी एक लिस्ट तयार केली, कि झालं ! पुढच्या वेळी नेटवर्क ला गेलात, किंवा आत्ताच्याच नेटवर्क मधून असे partners शोधा आणि मिळवा. ह्याच्या करता एक सोप्पी युक्ती म्हणून सांगतो :-
"कहां से तू आया और कहां तुझे जाना है " हे पहात राहायचं, म्हणजे काय; तर आपला ग्राहक आधी कुठून किंवा कुणाकडून आपल्या कडे आला आणि नंतर कुणाकडे जाणार , अशा मंडळींचे प्रकार ओळखून घ्यायचे. टिपायचे. आणि लिहून ठेवायचे. नजर अपोआप त्यात होईल.
- कहां से तू आया : Civil Contractor
- कहां तुझे जाना है : Electrical Contractor
Civil Construction झाल्यावर पेंटिंग होत असतं , तसेच
पेंटिंग झाले कि पुढचे काम : Electrical Work.
मीटिंग मध्ये असे बिझनेसमन शोधायचे , आणि त्यांच्याशी घट्ट नेटवर्क करायचे !
नेट्वर्किंग म्हणजे शिकार शेती
खूपच छान. कहां से तू आया और कहां तुझे जाना है. इतके दिवस मी ही ओळ आध्यात्मिक समजत होते. आज असाही दृष्टिकोन मिळाला.
ReplyDeleteGoggle बदलला.
DeleteWow it's very usefull to understand
ReplyDelete