काय आहे हे १ मिनिट इंट्रो ?
बिझनेस नेट्वर्किंग मिटींग्स मध्ये साधारणत: २० ते ५० व्यावसायिक एकत्र येतात , आणि आपापल्या व्यवसायाची ओळख देतात. मुळात ह्या मिटींग्स साधारण ९० ते १२० मिनिटे म्हणजे दीड ते जास्तीत जास्त 2 तास चालतात. ह्या मिटींग्ज मधून व्यवसायाच्या संधी निर्माण होणे हे अपेक्षित असते त्यामुळेच ह्या मर्यादित वेळात काही गोष्टी घडणे हे व्हायला हवं :-
- प्रत्येक मेंबर चा व्यवसाय सर्वांना कळणे ( नक्की व्यवसाय काय ?)
- तो त्यात किती पारंगत आहे ( शिक्षण, मान्यता, ग्राहक इत्यादी )
- त्याला नक्की काय मदत हवी आहे ( एखादं चांगलं बिझनेस कनेक्शन )
- तो नक्की काय मदत देवू शकतो ( त्याचं एखादं उत्तम कनेक्शन )
- नजीकच्या काळातील एखादा ताजा ताजा बिझनेस अपडेट ( समाधानी ग्राहक वगैरे )
हे सर्व , प्रत्येक मेंबर चं घडवून आणायचं असेल, तर त्याला वेळेचं बंधन आलंच ओघाने. शिवाय, एखाद्याच्या बिजनेस मध्ये अधिक रस वाटल्यास, पुढे नंतर न्याहारी च्या वेळात अधिक चर्चा करून संबंध अधिक वाढविता येऊ शकतात की !
शिवाय, ह्या प्राथमिक ओळखीत व्यावसायिकाची प्राथमिक बिजनेस category कळली, तरी पुरेसं असतं ! त्यामुळे खूप खोलात जावून व्यवसायाचा प्रत्येक पैलू न पैलू उलगडून सांगण्याची आवश्यकता नाहीये. ह्यामुळेच , एक मिनिट ही एक सर्वसाधारणपणे स्वीकृत ओळख-वेळ मानली गेलीये, आणि हे रुजलंय देखील चांगलंच.
ह्या एक मिनिटात आश्चर्य कारक घटना घडू शकतात !
नीट लक्ष देवून जर हे हत्यार-अवजार आपण वापरल , तर मात्र आश्चर्य कारक, अफाट deals होऊ शकतील. ह्या करीता खालील गोष्टी अगदी काटेकोरपणे करणे गरजेचं आहे :-
- ह्या एक मिनिट ची कसून तयारी करणे.
- प्रत्येकाची इंट्रो कान देवून ऐकणे.
- उपयुक्त वाटल्यास टिपून ठेवणे. ( कुठे एकत्र काम करता येईल का हे तपासणे)
- मागत काय आहेत, हे समजून घेणे (ह्यातून आपल्याला त्यांचा ग्राहक वर्ग कळतो). समान ग्राहक वर्ग भिन्न उत्पादन किंवा सेवा ह्याचं छान ग्याट मेट होऊ शकतं.
- ग्राहकांची नावे सांगितल्यास, आणि अपेक्षित सापडल्यास नोंद करणे.
रेफरल ची देव घेव :-
ह्या नंतर रेफरल ची देव घेव होते. ह्यातून पुढच्या संधी वगैरे निर्माण होतात. ह्या पुढे नेताना मात्र काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, म्हणजे ज्यांना रेफरल देत आहोत ते त्या योग्य आहेत कि नाही हे पडताळून घेणे , तसेच मिळालेले रेफारल्स नीट समजून घ्यायचे. हे एका वेगळ्या पोस्ट मध्ये पाहू.
Excellent information
ReplyDeleteChaan Guidance! Thanks !
ReplyDeleteधन्यवाद !
DeleteKhup Chan information
ReplyDeleteउपयुक्त माहीती👍🙏🏻
ReplyDelete