Tuesday 27 April 2021

बरबादियो का जश्न !

TV वर "epic" channel वरचा राजा रसोई और अन्य कहानिया  कार्यक्रमात रणवीर ब्रार त्याची एक रेसिपी share करत होता. बोलता बोलता अगदी सहज पणे त्याचं बोस्टन इथलं एक उपहारगृह कसं बंद पडलं आणि त्याच्या पार्टनर ने किंवा जो ते उपहारगृह चालवायचा, त्याने उरले-सुरले ५००० डॉलर्स त्याला कसे देवू केले हा अनुभव म्हणून सांगितला. आणि शेवटी म्हणाला : " पकाने वाले को क्या , एक चूल्हा ही मिल जाय, बस है ना ! "

इतकं सहजपणे सो called अपयश पचवता येणं , आणि ते व्यवस्थित पचवलं गेलंय, कारण त्याच्यावर हसून ते इतरांबरोबर share सुद्धा केलं गेलं, बरबादियो का जश्न !

आम्ही पूर्वी "अपयशातून शिक्षण" असा एक वार ... मला वाटतं .... गुरुवार चालवायचो निऊ वर. नंतर नंतर वाटू लागलं हे अपयश तर आपल्याला पुढे घडवतं ना. शिवाय अजून पुढे गेल्यावर वाटायला लागलं कि कुठलीही नवी वाट धरताना, चटकन हवं ते मिळालं, असं सहसा होत नाही. आणि तेच बरं आहे. मग त्याचा पिच्छा पुरवून ते पुढे मिळविणे वगैरे हे आपल्या ध्यासावर, वेडावर अवलंबून आहे.

किती चिकटून असतो मी माझ्या यशांना, अपयशांना ! अपयशाची सल अगदी खोल खोल रुतलेली असते. मग ती खंत, सल बाळगत राहून , पुन्हा बात निकली तो हरेक बात पे रोना  येतंच ! अर्थात हे जुनं - पानं काढून रडणं हे सुद्धा आवश्यक वाटतं मला कधी कधी. मुळात स्वीकारून तर टाकू, कि मला असं असं वाटतंय म्हणून ! मग पुढे काय ते करू त्याचं !

मला हवं ते मिळालं : यश , ते नाही मिळालं , दुसरं काही गवसलं , तिकडे आहे लक्ष माझं ? नाहीये. कारण "ते नाही मिळालं" हि वीणा सतत चालू आहे. नकारात्मक चिंतन. ह्याच्या वर मी एक साधा उपाय काढलाय : अगदी जवळच्या सह अनुभवी मित्रा सोबत बसावं आणि भरपूर रडून बिडून घ्यावं - क्या खोया  ह्याच्यावर. उपयुक्त आहे का हि कृती ? काही काळ तरी निश्चित चालते. कुणीच जर मला नाही सापडलं तर मी चक्क youtub वर दर्द भरे गीत लावतो आणि समरस होतो. मोकळं मोकळं वाटतं. मला वाटतं काही दिवस - महिने - वर्ष तरी हे Infection त्रास देत नाही.

मग कधी लक्षात येतं , कि अरे , मी त्या त्या deal मध्ये गंडलो, कारण कागदपत्रे नीट पाहिली नव्हती. जेव्हा त्याचा त्रास झाला, दू:ख बीख्ख झालं , बोचलं ते, किंवा सल राहिली आत, तर त्यालाही कारण आहे. ती सल, ती वेदनाच तर त्या चुकीची आठवण करून देत असते. कदाचित लाखो रुपये आणि वेळ खर्चून केलेला एखादा कोर्स हि देणार नाही हे. हेच तर ते प्रवाहा सोबत राहणे, वाहणे, प्रवाही जीवन.

हल्ली हल्ली तर मला वाटू लागलंय कि आपल्या आयुष्याच्या रस्त्यावरचा यश काय अन अपयश काय .... एक अनुभव , बस !


3 comments:

  1. हं.. तुम्ही म्हणताय तसं या सगळ्याकडे फक्त एक अनुभव म्हणून स्वीकारून सोडून देता आलं तर खूपच छान! तेवढं एक जमलं की काय फक्त मज्जानु लाईफ :D

    ReplyDelete
  2. अशाच एका कार्यक्रमात'रणवीर ब्रार'ला विचारण्यात आलं, 'What are you waiting for?'तो म्हणाला'I am waiting for my next Failure' 🙂

    ReplyDelete

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.