नेटवर्क तयार करणे म्हणजे जाळे विणणे ....
network करणे म्हणजे विक्री नव्हे ! एखाद्या बिजनेस नेटवर्क ला जाताना ....
- आपल्याला फक्त लोकांना भेटायचं आहे , तेही अगदी समोर कोण आल्यास. network करणे म्हणजे अगदी चंट व्यक्ती हवी, पुढे होवून बोलणारी, वगैरे प्रचंड गैर समज असतात. बरोबर कार्ड्स वगैरे ठेवा; तरीही अगदी स्वत:हून , आपला स्वभाव असा नसेल, तर असलं अचाट साहस करण्याची अजिबात आवश्यकता नाही, Be Yourself.
- अर्थात कुणी ओळख करून घ्यायला आलं स्वत: हून, तर करून घ्या. तरीही तुमच्या पद्धतीने. प्रत्येकच माणसाशी तुमचं network जुळेल असं काही नाही, तेव्हा, निवांत ! तुमचं visiting कार्ड असेल, तर उत्तमच, नसेल तरीही ठीक, आपला व्यवसाय सांगता येतोच कि !
- साधारणपणे १ मिनिटात ओळख, नंतर presentation (त्या त्या network च्या एखाद्या मेंबर चं ) , नंतर referral rounds असा हा agenda असतो. ह्यात आपला role हा बघ्या आणि ऐक्या चा ठेवायचाय ! ऐकून महत्त्वाच्या काही गोष्टी जाणवल्या तर त्या टिपून ठेवायच्या.
- एकदम कोणत्याही प्रकारचं commitment देवू नका. अर्थात, नेटवर्क सर्वार्थाने योग्य वाटल्यास जॉईन करा देखील, तरीही ४८ तास तरी निर्णय राखून ठेवायचाय !
- Network साठी बऱ्या पैकी खर्च येत राहतो. BNI सारखे नेटवर्क असेल, तर वर्षाकाठी १ लाख रुपये इतका खर्च धरून चाला. Saturday क्लब ला जरासा कमी, तरी ५० ते ६० हजार येतोच ! हा सध्यातरी "खर्च" ह्या प्रकारातच बांधून टाका. ह्यातून किती धंदा मिळाला हा हिशोबच नाही करायचा ! साधारण ३ ते ५ वर्षानंतर तुम्हाला ह्याचा खरा उपयोग व्हायला लागेल. Network हि व्यायामा प्रमाणे असलेली सवय आहे !
- Network साठी वेळही द्यावा लागेल. मिटींग्स ही फक्त एक घटना असते. त्यातून जाणीव पूर्वक घटनांची नोंद घेणे, माणसे काय बोलतात ते नीट लक्ष देवून ऐकणे तसेच भेटलेल्या माणसांवर पुन्हा "नीर-क्षीर" विवेक ठेवून काम करणे; सतत network वाढवीत राहणे, जोपासणे ह्याला वेळ द्यायला हवा, लागतो !
- हे करता करता एक वेगळा कसलेला व्यावसायिक आपल्यात घडू लागतो ! आपण आपल्या व्यवसायात कदाचित उत्तम असू देखील, पण एकत्र team सोबत काम करण्याची सुद्धा आपल्याला सवय होऊ लागते, अर्थात व्यवसाय एका वेगळ्या level वर नेणे !
- फक्त मला काय मिळेल , ह्याचा विचार करण्या ऐवजी team कशी वाढविता येईल हा विचार जरा जास्त प्रचलित करा, म्हणजे आपले passive earning वाढू लागेल !
फारच सुंदर माहितीपूर्ण लेख
ReplyDelete