Thursday, 14 October 2021

Brief about 'Nivdak Udyami' -

What is 'Nivdak Udyami'

Religious, Social, Educational or even for commercial reasons people do come together as a group however nature of each person is different and hence keeping them closely connected to a common cause for a longer period of time is a bit tedious job. One need to establish certain guidelines of rules and make continuous efforts to develop the culture to abide those rules and stay with in the established framework 👨‍🏫


Considering this 'Nivdak Udyami' was formed in December 2019 where Professional Business owners/Entrepreneurs should come together to help grow each other's business, share their good or bad experiences, invite domain experts and arrange discussions, brainstorm and by virtue of constant questioning try to understand and learn the subject - This is how we function 

@ 'Nivdak' we have set up weekly posting scheduled with dedicated subjects for each day along with timeline

"Business Education and Personality Traits Development" has been the core of 'Nivdak's existence. Non value add forwards, Borrowed philosophy, Political, Ritual, Caste biased posts, spamming is strictly prohibited here

Hence handful and selected 30 odd people could earn our membership till date

@ 'Nivdak Udyami', We believe that Nurturing Culture and Creating Wealth both can be achieved simultaneously, So its just not a group rather a movement 😊

Sunday, 26 September 2021

कधीतरी models ही "Freeze" व्हायलाच हवीत की !

Flexibility हा देखील एक अत्यंत अति लाडावून ठेवलेला शब्द आहे. असाच Innovation हा सुद्धा. हे सतत इतके बोलले जातात,कि व्यावसायिकाला वाटावं कि सतत बिझनेस models सारखी बदलतच राहिली पाहिजेत.

असं काही नाही. नकोच मुळी. एखादी नवीन कार्यपद्धती मुळात वर्क होतीये कि नाही, झालीये कि नाही वगैरे पाहायला काही वेळ तर द्यायला हवा ना ! आणि त्यात परत मुळातल्या त्या model लाच सारखा आपण धक्का लावत राहिलो तर कठीणच होवून बसेल की. 

म्हणजे असं,कि घरात काम करणाऱ्या बाई ला सतत रोज वेगळ्या वेळी, वेगवेगळ्या पद्धतीने, अनेक माणसांनी कामे सांगत राहिली, तर सोडूनच जाईल ना ती. अगदी असंच आहे हे.

मी तर चक्क माझ्यासाठी कधी कधी Freeze हा शब्द एखाद्या दिशादर्शका सारखा वापरतो !

नाही करायचा बदल निदान ३ वर्ष तरी. कधी कधी पाहिजे तसं घडत नाही. वैफल्य येतं. हा सुद्धा त्या प्रयोगातला, ठाम राहण्यातला एक भागच समजायचं. आपल्या मार्गावरचा विश्वास असंच develop होतो. 

Tuesday, 21 September 2021

Groups = Promotions : हे जणू सूत्रच झालंय !

कोणताही फेसबुक किंवा whatsapp ग्रुप उघडून बघा : त्यात जास्तीत जास्त पोस्ट्स प्रमोशन च्याच दिसतात. छोट्या व्यावसायिकांचं मी तर पाहिलंय, की त्यांचा हा एकच "धर्म" होवून बसलेला दिसतो, की ग्रुप ना ? ठोक पोस्टिंग. किंवा ग्रुप्स हे "पोस्टिंग" करताच असतात. अनेक जण तर हे दुकानच उघडून बसतात, कि एक फेसबुक चा ग्रुप करा, त्यावर प्रचंड मेंबर संख्या add करत जा; आणि एखादी स्वस्त अशी मेम्बर्शीप द्या आणि ती विका. बदल्यात फेसबुक असतंच तुमच्या पोस्ट्स प्रचंड populate करायला. 

हरकत काय असं करायला ?


खरं तर काही असूच शकत नाही ना, कारण प्रत्येकाचं स्वातंत्र्य ! तरीही एकंदरीत आधी आयुष्य म्हणजे मला सृष्टीकर्त्याने दिलेलं जीवन आलं, आणि मग ते कसं घालवायचं हा प्रश्न आला. म्हणून तर आपण कुणालाही प्रथम भेटीत विचारतो ना : 
"What do you do" किंवा
"What's your Occupation" किंवा
"काय करता आपण" किंवा
"काय चाललंय  सध्या" 

हे सर्व प्रश्न "तुम्ही तुम्हाला दिलेली ही उर्जा कशी कारणी लावता" असे आहेत.ही कारणी लावताना आपण केलेल्या विविध कामांच्या नंतर आपल्याला कसं वाटतं  ह्याचा विचार आपण करतो का कधी ? म्हणजे अगदी "समाधान" ह्या फूट पट्टी वर नकोय मोजायला; तरीही साधारणत: आपण ज्या हेतू ने आपला व्यवसाय निवडलेला असतो तो हेतू बऱ्याचदा बाजूलाच पडलेला दिसतो आणि "सतत आपल्या सेवा-उत्पादने आपण सतत विकत राहणे " हेच काम होवून बसलेलं दिसतं.

विक्री किंवा प्रमोशन हा व्यवसायाचा एक भाग आहे हे निश्चित, तरी जोडीने उत्तरोत्तर हि प्रक्रिया थोडी सोपी व्हायला हवी. म्हणजे आपल्याला मिळणाऱ्या परिणामांच्या तुलनेत हे काम कमी-कमी होत जावं.आणि आपल्याला आपल्या बेसिक profile वर म्हणजेच आपल्या क्षमता (स्वत: च्या किंवा व्यावसायिक) किंवा त्यांचा दर्जा वाढविण्यावर काम करायला वेळ आणि वाव मिळावा.

हे प्रत्येकाच्या मनाशी पक्कं असतं; तरीही "जो दिखता हैं वही बिकता हैं " हे एकमेव सूत्र अंगिकारल्याने खूप घोळ होतो.

मुळात ग्रुप्स हे ह्याकरीता नसावेतच मुळी !

ग्रुप्स वर हे आपल्या योग्यता वाढविण्याकरिता काय करता येईल  ह्या विषयी बोललं जावं अथवा व्यक्त व्हावं. अशाच काहीशा उद्देशाने आपण निवडक उद्यमी ची निर्मिती केली. हे वेगवेगळे प्रयत्न, त्यांची गोळा बेरीज व सोबतीने येणारे अनुभव ह्याची गोडी चाखता आली तर खरा प्रवासाचा आनंद घेता येईल.

"इथे धंदा मिळत नाही" किंवा 

"खूपच कमी हालचाल असते सध्या ग्रुप वर 

वगैरे साठी इथे येण्यात काहीच अर्थ नाही. ह्या कोणत्याही गोष्टी अर्थात सवंग पणा ग्रुप वर नसावा. ग्रुप थेट धंदा मिळण्यासाठी नव्हे तर एकंदरीत व्यवसायाद्वारे आयुष्य रसदार,चविष्ट व्हावं ह्या दिशेने चालावा. 

कमी हालचाल अर्थात जास्त मोकळी जागा. 👉हीच तर अपेक्षित आहे ना.

तर निवडक उद्यमी म्हणजे अशा प्रकारे विचार करू शकण्याची तयारी असणाऱ्या लहान-थोर उद्यमी मंडळींचा समूह. 

प्रयोग बेडरपणे share करायला वाव असावा !

मनात योजलेले काम झाले की त्याला आपण यश म्हणतो साधारणत: आणि हे होण्याकरिता आपण उद्यमी मंडळी अनेक कृती करीत असतो. ह्यांना "प्रयोग" म्हणता येईल. त्यांतले अनुभव कधी share करतो का आपण ? हल्ली ज्याभोवती एक मोठ्ठ वलय निर्माण झालंय तो mentor म्हणजे तरी काय ? आपले अनुभव फक्त सांगणे खरं तर. हे अनुभव अगदी बेडरपणे सांगता आले, तर खरा ग्रुप, नाहीतर एक दुकानच फक्त !

Saturday, 11 September 2021

बिझनेस नेटवर्क Presentation : ७ प्रमुख मुद्दे

फोरम चं उद्दिष्ट जाणून घेऊन मग Presentation द्यावं !

नुकतंच एक बिझनेस नेटवर्क फोरम attend केलं. त्यात एका मेंबर चं बिझनेस Presentation पाहिलं. छान कल्पक केलं होतं. तरीही ते त्या form ला साजेसं असतं तर अजून छान वाटलं असतं. बिझनेस नेटवर्क हे "नेटवर्क" वाढण्यासाठी आहे, त्यातून आपले सह मेम्बर्स प्रशिक्षित व्हायला हवेत : आपल्याला आवश्यक ते रेफरल्स देण्याकरिता.

माझ्या मते हे १० मिनिटांच Presentation म्हणजे आपल्या १ मिनिट चंच Extension असतं. त्यात खालील गोष्टींची खबरदारी जरूर घ्यायला हवी :-

  1. कमी शब्दांत परंतु योग्य व्यक्तीकडून (आपल्या कामाची समज असणारी व्यक्ती ) स्वत:ची ओळख करून घेणे. 
  2. 2 ते ३ product किंवा सेवा अथवा त्यांची versions सांगावीत. प्रत्यक्ष ते कसं काम करतं ह्यापेक्षा उपयुक्तता काय ह्याकडे अधिक लक्ष असावे. त्यात पुन्हा काय ऐकलं , काय पाहिलं की मला रेफर करता येईल ह्याची एखादी यादी देता येईल.
  3. एखाद्या प्रमुख ग्राहकाचे Testimonial नक्की share करता येईल. हा चांगला तगडा ग्राहक असावा. तुमचे जे ग्राहक आहेत, त्यातल्या त्यात ! थेट नसेल, Indirect असेल तरी चालेल. मुळात आपलं काम इतक्या चांगल्या ग्राहकाला उपयुक्त ठरतंय हे लोकांना व्यवस्थित समजेल. प्रत्यक्ष त्या व्यक्तीला बोलावून वेळ दवडू नका. 
  4. तुमचं खास Certification किंवा व्यवसायाला साजेशी एखादी डिग्री वगैरे जरूर,नक्की स्क्रीन वर दाखवा, सोबत बोलून सुद्धा सांगा. त्या image वर मोठ्या अक्षरांत ती कसली,कशा बद्दल ची degree आहे ते लिहा. 
  5. नसेल तर तुमच्या अनुभवाला सारथी बनवा.नवखे, startup असाल, तर तुमच्या आधीच्या नोकरीतील अनुभवाला; तेही नसेल, तर तुमची कल्पना, आणि स्टोरी मार्केट करा. लोकांना,मेम्बर्स ना कळायला हवं की, सदर विषयातील सर्व कौशल्ये तुमच्यात आहेत. (Linked-In चं Skill Endorsement जरूर पहा !)
  6. Gives आणि Asks वर हमखास लक्ष द्या. इथे व्यवस्थित 2 भाग करून लोकांना समजावून सांगा की माझ्या कडून काय मिळेल, आणि मला कुठे रेफर करता येईल. स्पेसिफिक नावे किंवा निदान ते ते हुद्दे जरी समजावून सांगितले तरी चालेल. 
  7. साधारण ह्या सगळ्यात १० मिनिटे दिलेली असतात. त्यात निदान 2 मिनिटे शेवटी आपले Gives व Asks समजावून सांगायला तसेच प्रश्नोत्तरे हाताळायला शिल्लक रहावीत. एखाद-दुसरा प्रश्न तुमची USP समजावून सांगायला चक्क प्लॉट केला तरी चालेल. उद्देश हाच कि आपला व्यवसाय कळण्यापेक्षा आपल्या व्यवसायाकरिता referals कसे शोधायचे हे मेम्बर्स ना कळू शकेल.
आपल्या सह मेम्बर्स पर्यंत एकदा आपल्याला रेफरल कसे द्यायचे, कुठून शोधता येतील हे आपण पाहिलं, सोबत का द्यायचे हे कळलं कि झालं कि !

Friday, 20 August 2021

आत्ता समोर असणारा यक्ष प्रश्नच आपल्याला मार्ग दाखवत असतो !

१८ ऑगस्ट दुपारी सव्वा बारा वाजेपर्यंत माझ्या मिनरल water च्या ट्रेनिंगसाठी ह्यावेळी, म्हणजे ट्रेनिंग क्र ८५ ला एकही बुकिंग झालेलं नव्हतं. म्हणजे बघा की, ट्रेनिंग ला सुरुवात होणार 2 वाजता दुपारी आणि १२ पर्यंत एकही बुकिंग नाही. मग मी ठरवून टाकलं कि ह्यावेळी "रद्द". तसं काही ठिकाणी सांगून सुद्धा टाकलं आणि १५ वीस मिनिटांत 2 जणांनी विचारलं: सर, 2 ला सुरु करतोय ना ?

ह्यावेळी मी "नाहीच" घ्यायचा निर्णय घेतला. सर्वांना सध्या जे खूप कठीण प्रश्न आहेत तेच मलाही आहेत. तरीही मी माझ्या निर्णयावर स्थिर राहिलो. तरीही सकाळपासून बेचैनी होतीच. आणि मी माझ्या सहकार्यांसोबत थोडी चर्चा सुद्धा केली ह्या अनुषंगाने : की नक्की काय होतंय !

मग चर्चेअंती असं लक्षात आलं,की परिस्थितीत विशेष फरक नाहीये,तर आमच्या ग्राहकाला नक्की कळविले जात नाहीये, की, कधी आणि कोणत्या तारखेला हे ट्रेनिंग असणार आहे ते. आम्ही फेसबुक वर पोस्ट वगैरे करत असतो, तरी हे लक्षात आलं, कि आमचा सर्वात जास्त "Traffic" असणारा Channel म्हणजे आमचा Youtube channel तसेच आमचा "कोरा" चा वाचकवर्ग. इथे आमची "Initimations" पोचतच नाहीत.  म्हणजे हे करून पाहूयात. 

ह्याने लगेच अपेक्षित परिणाम मिळेल का ?

मिळेल,अशी अटकळ आहे.पाहुया आता.आणि आमच्या अनुभवाने, साधारण ३ एक महिने तरी कोणताही नवीन प्रयोग करून पहावा लागतो. मगच काहीतरी निश्चित पुढची स्टेप घेता येते.ह्यापेक्षा फार वाईट काही घडेल असं वाटत नाही.

लगेच मोठमोठे चेंजेस किंवा बदल करायचे नाहीत. 

थोडा संयम दाखवायचा. फेस करायची आतली धाकधूक, भीती, अनिश्चितता.हीच प्रगल्भता.हाच तो मानसिकतेतला बदल.आपला वाचकवर्ग आपल्याला पाहत असतो, आपली नोंद ठेवत असतो.तात्पुरत्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण जर आपल्या बिझनेस model मध्ये मोठे किंवा दाखल घेण्याजोगे निर्णय घेतले, तर ग्राहकांच्या मनात वसलेली आपली छबी ही कायमस्वरूपी विस्कळीत होण्याची शक्यता असते. ज्याने हे ग्राहक, जे मोठ्या प्रयत्नाने जोडून राहिलेले असतात, एका क्षणात पाठ फिरवून निघून जातात, आणि आपल्याला फक्त परिणाम दिसतो. कारण आपले updates चेक करताना सुद्धा ते काही आपल्याला सांगत नसतात की "मी अमुक अमुक, माझा नंबर अमुक अमुक". सोडताना तर प्रश्नच नाही. काही मार्गांनी आपण हे catch करू शकतो,म्हणजे newsletter द्वारे वगैरे. तरीही जाणाऱ्या माणसाला "जाब" नाही विचारता येत.

ह्याची काल लगेच प्रचीती आली,प्रत्यक्ष !

एका Dining Hall ला जाण्याचा काल योग आला.त्यांनी त्या हॉटेल च्या आवारात हा Hall पुन्हा साधारण १० एक वर्षांच्या Gap नंतर पुन्हा सुरु केलाय. ह्याची Veg, शाकाहारी, राजस्थानी थाळी ही खासियत होती, जे आता पुन्हा रुजू होत आहे. पण मध्ये ह्या हॉटेल चालकांनी, काही वर्षे इतर विविध models वापरून पहिली. ज्यात मांसाहारी पदार्थ सुद्धा होते. आणि इथेच ग्राहक वर्गाने पाठ फिरवली.

नवीन वर्ग येईलच की !

हे तर आहेच. तरी ह्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील हे निश्चित. ह्यातलाच एक भाग म्हणून आम्हाला त्यांनी काल थाळी खायला आमंत्रित केलं. तरीही जुना वर्ग टिकवून ठेवला असता तर !

शिकण्यासारखे .....

  1. संपूर्णपणे एकदम बिझनेस model बदलायचे असेल, तर तितकी शाश्वती तुमच्या ROI ने द्यायला हवी.
  2. थोडे थोडे बदल, तेही अंतर्गत करायला हरकत नाही, पण हळू हळू !
  3. सदर उदाहरणात एकदम Customer Segment संपूर्णपणे बदलून गेली ना ! त्यामुळे आधीचे ग्राहक तुटले. असं करायचं असेल, तर वेगळी vertical सुरु केलेली उत्तम.

आपली मते अपेक्षित !

Wednesday, 18 August 2021

Quora वर तुमचे Views कमी होतायेत का ? काळजी नको !

काही काळापूर्वी मी Quora ह्या प्रश्नोत्तराच्या वेबसाईट वर माझ्या क्षेत्रात म्हणजे मिनरल water च्या क्षेत्रात "Most Viewed Author" होतो. मी हे अभिमानाने मिरावायचो देखील!

आज आणि काही महिने पाहतोय, की हे माझं स्थान थोडं हलले आहे. कधी ८-९ व्या स्थानावर सुद्धा मी आहे. आज साधारण ५ व्या स्थानावर. "आपली लोकप्रियता कमी व्हायला लागली आहे कि काय" वगैरे प्रश्न मलाही पडायचे पूर्वी, पण आता खरंच नाही पडत. असो. तरी ते पहिल्या स्थानावरचे आहेत, ज्यांना माझ्यापेक्षा जास्त views आहेत, ते नक्की काय करतात, हे सुद्धा कोरा आपल्याला दाखवतं. त्यातून मला काही प्रेरणा मिळेल अशा आशेने मी जरा ह्याच्या थोडा खोलात गेलो, त्याचा हा आढावा आणि पाहणी :-


काय वाटतं तुम्हाला ? मते कळवा !



Tuesday, 17 August 2021

Reputation Build करण्याला सर्वात पहिला Preference द्या !

व्यवसाय करणे म्हणजे नुसतं आपल्याविषयी काहीतरी "ढकलत" राहणे नव्हे !

काल - परवाच माझ्या बहिणीशी (जी आता एक निवृत्त आयुष्य जगतीये),तिच्याशी बोलता बोलता ती म्हणाली : हे whatsapp ग्रुप्स जॉईन करायचे म्हणजे लोकांची नुसती विका-विकी सहन करत रहायची, त्यापेक्षा नकोच !

खूप बोध घेण्यासारखं आहे हे ! कारण अशाच मंडळींना टार्गेट करून आपण आपला माल विकत असतो. आणि त्यांनाच जर असं वाटत असेल, तर हे whatsapp मार्केटिंग म्हणजे झोलच म्हणायचं की ! त्यात परत हि whatsapp मार्केटिंग ची softwares आलीयेत मार्केट मध्ये. ह्याच्या जाळ्यात परत लोक फसत राहतात, कारण ही softwares आपलं हे "ढकलिंग" automate करून तर देतातच,शिवाय भरपूर,माहित नसलेल्या लोकांपर्यंत आपलं पोस्टिंग "पुश" करत राहतात, आणि आपल्याला वाटतं कि हे खूप भारी मार्केटिंग चाललंय माझं !

असंच एक बकवास म्हणजे परस्पर "ग्रुप्स" ना आणि लिस्ट ना add करत राहणे 

लोक परस्पर add करतात आणि मेसेजेस चा भडीमार करत राहतात. logic काय,तर कुणीतरी पाहतं आणि माल विकत घेतं. असेलही;पण त्यासाठी ही "शिकार" सतत करत रहावी लागते, आणि मुळात आपला समज असा होतो की हे करतच राहायला हवं. ह्यात मुळात आपलं काम, त्यातली अधिकारिता ही अधिकाधिक विकसित व्हायच्या ऐवजी मी सतत "विकायच्या" कामात राहतो आणि हेच मला माझं प्रथम-कर्म वाटू लागतं.

मुळात असं करूनही तितकासा उपयोग होतो असं नाही. नुकतंच मला कुणीतरी परस्पर एका whatsapp ग्रुप ला add केलं. पूर्वी मी लगेच बाहेर पडत असे. आता जरा सबुरीने घेतो,तपासतो आणि मग ठरवतो कि ग्रुप उपयुक्त आहे किंवा नाही ते. जरा शेअर करतो :-

ह्या ग्रुप ला ज्यांनी add केलं त्यांची विषयी तपासलं तर आढळलं ...

  1. ह्या व्यक्तीचं Just Dial चं लिस्टिंग फार भारी नव्हत (जे त्याने सेंड केलेलं होतं)
  2. मग पाहिलं GMB, म्हणजे गुगल लोकल, तिथे लिस्टिंग नव्हतच
  3. website नाही, शिवाय ही व्यक्ती डिजिटल मार्केटिंग करत होती 
  4. त्याला मी त्याचं linked इन प्रोफाईल पाठवायला सांगितलं,तर उत्तर नाही 
हे सगळं करायला हवं असं अजिबात नाही, पण तरी ह्यातला एक मार्ग तरी योग्य पद्धतीने केला तर जास्त चांगले आणि स्थिर परिणाम मिळू शकतात. उदाहरणार्थ जर just Dial हा मार्ग निवडला असेल, तर त्यावर पूर्ण लक्ष देवून reviews वगैरे बिल्ड करावेत. म्हणजे Conversion तरी निश्चित मिळू शकेल. 

जोडीला आपले नवीन प्रोजेक्ट्स वगैरे linked in वर पोस्ट करीत राहावेत.