व्यवसाय करणे म्हणजे नुसतं आपल्याविषयी काहीतरी "ढकलत" राहणे नव्हे !
काल - परवाच माझ्या बहिणीशी (जी आता एक निवृत्त आयुष्य जगतीये),तिच्याशी बोलता बोलता ती म्हणाली : हे whatsapp ग्रुप्स जॉईन करायचे म्हणजे लोकांची नुसती विका-विकी सहन करत रहायची, त्यापेक्षा नकोच !
खूप बोध घेण्यासारखं आहे हे ! कारण अशाच मंडळींना टार्गेट करून आपण आपला माल विकत असतो. आणि त्यांनाच जर असं वाटत असेल, तर हे whatsapp मार्केटिंग म्हणजे झोलच म्हणायचं की ! त्यात परत हि whatsapp मार्केटिंग ची softwares आलीयेत मार्केट मध्ये. ह्याच्या जाळ्यात परत लोक फसत राहतात, कारण ही softwares आपलं हे "ढकलिंग" automate करून तर देतातच,शिवाय भरपूर,माहित नसलेल्या लोकांपर्यंत आपलं पोस्टिंग "पुश" करत राहतात, आणि आपल्याला वाटतं कि हे खूप भारी मार्केटिंग चाललंय माझं !
असंच एक बकवास म्हणजे परस्पर "ग्रुप्स" ना आणि लिस्ट ना add करत राहणे
लोक परस्पर add करतात आणि मेसेजेस चा भडीमार करत राहतात. logic काय,तर कुणीतरी पाहतं आणि माल विकत घेतं. असेलही;पण त्यासाठी ही "शिकार" सतत करत रहावी लागते, आणि मुळात आपला समज असा होतो की हे करतच राहायला हवं. ह्यात मुळात आपलं काम, त्यातली अधिकारिता ही अधिकाधिक विकसित व्हायच्या ऐवजी मी सतत "विकायच्या" कामात राहतो आणि हेच मला माझं प्रथम-कर्म वाटू लागतं.
मुळात असं करूनही तितकासा उपयोग होतो असं नाही. नुकतंच मला कुणीतरी परस्पर एका whatsapp ग्रुप ला add केलं. पूर्वी मी लगेच बाहेर पडत असे. आता जरा सबुरीने घेतो,तपासतो आणि मग ठरवतो कि ग्रुप उपयुक्त आहे किंवा नाही ते. जरा शेअर करतो :-
ह्या ग्रुप ला ज्यांनी add केलं त्यांची विषयी तपासलं तर आढळलं ...
- ह्या व्यक्तीचं Just Dial चं लिस्टिंग फार भारी नव्हत (जे त्याने सेंड केलेलं होतं)
- मग पाहिलं GMB, म्हणजे गुगल लोकल, तिथे लिस्टिंग नव्हतच
- website नाही, शिवाय ही व्यक्ती डिजिटल मार्केटिंग करत होती
- त्याला मी त्याचं linked इन प्रोफाईल पाठवायला सांगितलं,तर उत्तर नाही
हे सगळं करायला हवं असं अजिबात नाही, पण तरी ह्यातला एक मार्ग तरी योग्य पद्धतीने केला तर जास्त चांगले आणि स्थिर परिणाम मिळू शकतात. उदाहरणार्थ जर just Dial हा मार्ग निवडला असेल, तर त्यावर पूर्ण लक्ष देवून reviews वगैरे बिल्ड करावेत. म्हणजे Conversion तरी निश्चित मिळू शकेल.
जोडीला आपले नवीन प्रोजेक्ट्स वगैरे linked in वर पोस्ट करीत राहावेत.
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.