Monday, 2 August 2021

Domain Name इतकं महत्त्वाचं आहे का खरोखर ?

मुळात डोमेन नेम म्हणजे तुमच्या (Internet वरच्या)  म्हणजेच आभासी मालमत्तेचे एका संक्षिप्त शब्दात केलेले संपूर्ण वर्णन. ह्यालाच URL असाही शब्द वापरला जातो. Uniform Resource Locator. म्हणजेच कोठूनही पटकन पाहता येण्यासाठी केली गेलेली सोय. म्हणजेच website कोठूनही पाहता यावी ह्याकरिता असलेले एक छोटेसे नाव, नावाची पाटी.

स्थायी किंवा स्थावर मालमत्ता जपण्यासाठी वारसदार वगैरे बऱ्याच गोष्टी जपून, पाहून कराव्या लागतात. म्हणजे ही मालमत्ता सहजा सहजी कुणाच्याही हाती लागत नाही. परंतु आभासी मालमत्ता मात्र फक्त डोमेन नेम बाबतीत केलेल्या हलगर्जी पणामुळे तिऱ्हाईत मंडळींच्या हाती अगदी सहज लागू शकते.

किंमतीत फरक आहे ना पण !

होय. बहुतेक स्थावर मालमत्ता ह्या आभासी मालमत्तांच्या तुलनेत जास्त कीमती असतात. उदाहरणार्थ एखाद्या १ BHK Flat ची किंमत एखाद्या केटरिंग contractor च्या website च्या तुलनेत नक्कीच कितीतरी पटीने जास्त असेल. परंतु हाच catering contractor जेव्हा त्याचा व्यवसाय वाढवू शकतो, तेव्हा त्याने website केली, आणि ह्या डोमेन कडे दुर्लक्ष झाले, तर हे प्रकरण खूप जास्त महाग पडू शकेल. त्याचा कालावधी संपल्यावर आठवणीने जर renew केले नाही, तर ते लिलाव स्वरूपात विकलं जाऊ शकतं आणि तुमच्याच नावावर, तुमच्याच डोमेन वर एखादा तिऱ्हाईत कोणत्याही प्रकारचा Online व्यवसाय करू शकतो !

ह्याने काय फरक पडेल ?

  • परस्पर कोणताही माहित नसलेला धंदा तुमच्या नावाने केला गेला तर तुम्हाला चालेल का ? हा आधी विचार करा. Branding दृष्टीने हा विचार महत्त्वाचा आहे. 
  • आपलेच डोमेन फक्त हलगर्जीपणाने आपल्यालाच खूप जास्त किंमतीला विकत घ्यायला लागू शकेल 
  • एखाद्या स्पर्धकाने जर घेतले, तर कितीही त्रागा केला, तरीही हे मिळू शकत नाही.
  • डोमेन गेले कि, त्याबरोबर website सुद्धा गेली. पुन्हा नव्याने सगळी उभारणी करावी लागेल, दुसरे डोमेन घेऊन.
  • नवीन पत्त्यावर दुकान नेल्या सारखे आहे हे, ते सुद्धा नवीन नाव लावून. असेल उपलब्ध तर.

काय करावं हे होऊ द्यायचं नसेल तर ?

  • Website व डोमेन दुसरीकडून करून घेतले असेल, तरीही आपल्याकडे स्वत:कडे ह्याचा Reminder सेटप करून ठेवा. developer चा हलगर्जी पणा तुम्हाला भोवू देवू नका. 
  • दरवर्षी अगदी ठरवून वेळेवर हे काम करा, न चुकता. 
  • शक्य झाल्यास डोमेन चे नोंदणीकृत मालक तुम्ही रहा : तुमचा email ID ही मालकी सिद्ध करायला पुरेसा असतो.
  • शक्यतो हे काम एखाद्या established कंपनीकडे द्या. Freelance developers नको.


No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.