व्यावसायिक मानसिकता वाढीला लावायची, स्वत:पासून; आणि सोबत कुणाला रस असेल, तर त्यांना घेवून हा खरा निवडक उद्यमी चा गाभा. हा विचार करताना विविध व्यावसायिक,छोटे-मोठे कसा विचार करतात हे खूप जवळून समजून घेण्याची संधी मिळते, वारंवार.
नुकत्याच माधवीशी झालेल्या गप्पांतून हे अनुभवाला आलं. शिवाय किर्लोस्करांचा कार्यक्रम करताना 2-3 गोष्टी पाहण्यात आलेल्या, त्या म्हणजे :-
- त्यांना "
सर्वात मोठ्ठं" व्हायचं नव्हतं;तर सर्वात जास्त आदरणीय व्हायचं होतं, एका क्षेत्रात : Engineering. फक्त वाढत राहणं हे खूप उथळ आहे हे वाटायला लागलं ह्यानंतर. - लक्ष्मणराव ह्यांचा प्रवास एका "रागा" तून सुरु झाला. म्हणजेच राग आणि इतर सो called नकारात्मक भावना ह्या किती मोठ्या गोष्टींच्या जनक ठरू शकतात.
- फंडिंग साठी त्यांनी नेट वर्किंग केलं , प्रपोजल बनवलं. वरकरणी औंध च्या राजांनी त्यांना जमीन दिली हे जरी दिसत असलं, तरी लक्ष्मणरावांनी त्याना स्वप्न विकलं,यशस्वी रित्या.
ह्यातल्याच ३ क्रमांकाच्या मुद्द्याला धरून आपण स्वप्ना कुलकर्णी ह्यांचा सेशन ठेवला, पाठोपाठ वाटलं की ह्याची कार्यशाळा ठेवू. त्यांनी मानधन मागितलं नाही, तरी आपल्याकडून द्यावं असा विचार झाला. २०० रु इतकं द्यावं per head असं म्हणण्यात आलं.
काही मंडळींनी "हे फी मध्ये नाही का " असे विचारले, तर काहींनी चक्क स्वत:हून sponsorship offer केली. दोन्हीही ठीक. पण द्यायची मानसिकता विकसित करायची आहे, तेव्हा मेम्बर्स नी फक्त देणगी म्हणून यायचं हि अपेक्षा नाही, तर स्वत:हून शिकायचं आणि त्याकरिता त्या तज्ज्ञाला मानधन (त्यांनी न मागता देखील) द्यावे असे मला वाटत होते. मेम्बर्शीप फी कशी वापरली जाते हे मला explain करावे असे मला वाटत नाहीये. वर्षभर, उत्तम प्रतीचे, अत्यंत selective असे ज्ञान,माणसे त्यांचे अनुभव हे मिळवायला कदाचित ह्याच्या (संपूर्ण ५० लोकांची वार्षिक फी) कितीतरी पट खर्च होत असेल, विचार करून पहा. त्यामुळे ग्रुप वाढवीत राहणे हा अजिबात हेतू नाही. आणि ह्या फी मध्ये काय ? तर निवडक, वेगळ्या विचार करणाऱ्या मंडळींचा सहवास; इतकेच assure करता येईल.
पण खरंच, राग मात्र नाही,आणि अपेक्षाही नाही. आता september अखेरीला काही लोकांचे renewal आहे. त्याना पूर्ण मोकळीक आहे, renew न 🚫🚫करण्याची 😇
उत्साहवर्धक काय ?
आत्ता पर्यंत काही लोकांनी फंडिंग कार्यशाळेला स्वत:हून नोंदणी केलेली आहे. शिकायचं आहे म्हणून. देणगी म्हणून नव्हे. पुरस्कर्ते म्हणूनही नव्हे. असा समूह राहिला तरी पुरेसं आहे.
खंत
मंडळी मिटींग्स ना येत नाहीत.
माझं वैयक्तिक मत -
ReplyDelete# 'राग हा मनुष्याचा शत्रू आहे'
# 'Anger is one letter short to danger'
वरील सुविचार एकतर्फी आणि भंपक आहेत.
'रागाचे' प्रकार असतात,
आपल्याला जन्मजात लाभलेल्या सामाजिक, भौगोलिक, आर्थिक परिस्थतीचा राग आल्याशिवाय ती बदलण्याची मानसिकता तयार होत नाही.
*लक्ष्मणराव* हे ह्या विचारसरणीचे आपल्यासाठी प्रणेते म्हणता येतील
बाकी थोडासा आत्मस्तुतीचा धोका पत्करून 'निवडक' बद्दल सांगायचं झालं तर मी असं म्हणेन ,
"Price is what you pay, Value is what you get" 😊