Demos असतील, तर अर्थात Videos च वापरा. पण माहितीपर काही असेल, जे "न पाहता" फक्त ऐकून चालेल; तर अशा वेळी Podcasts प्रचंड उपयोगी ठरतात. सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे Distraction होत नाही. तुमचा channel जर खूप प्रसिद्ध असेल, तर YOUTUBE वरच "podcasts" अशी एक वेगळी प्ले लिस्ट करून त्यावर एक एक करत तुमचे Audios ठेवू शकता. ह्याचा हेतू इतकाच, की एकाच channel वर लोकांना सगळं मिळावं म्हणून.
पण youtube तर फक्त Video च घेतं ना ..
बरोबर. आपले जरी podcasts असतील, तरी ते "Uplaod Video" म्हणूनच चढवावे लागतात. आणि View थांबवून फक्त ऐकता येत नाहीत मोबाईलवर, हीच एक पंचाईत असते Youtube ची. तरी वर म्हटलं तसं, search खूप जास्त असतो यु ट्यूब ला. त्यामुळे त्यावर सुरुवात नक्की करू शकता.
कसे करायचे अपलोड ?
तसेच. जसे Video करतो तसे. Kinemaster सारखं एखादं सोप्पं App घ्या आणि करा रेकॉर्ड त्यात. सोबत काही फोटोज टाका, किंवा चक्क स्वत:चाच फोटो करा अपलोड, इतकं सोप्पं.
पण मग Videos च का नाही ?
Videos पण चालतात ना ! जर अगदीच जनरल असेल विषय, आणि फक्त engagement हा हेतू असेल, तर चालेल की. पण एखाद्या विषयावर सखोल विचार मांडायचे असतील तर podcast चा नक्कीच खूप चांगला उपयोग होतो.
तुमचा channel जर फार जर प्रसिद्ध नसेल, किंवा तुम्हाला सर्च वगैरे मध्ये तितका रस नसेल, आणि फक्त "अधिकार-सिद्धता" ह्या एकाच विषयात रस असेल, तर फक्त podcasts म्हणजेच तुमच्या Audio Files तुमच्या website वर अपलोड करून ठेवू शकता. म्हणजे ह्या File ची "लिंक" मिळू शकते. ही लिंक मग अनेक प्रकारे Re-Purpose करता येते :-
- Website वर "टेबल" स्वरूपात : उदाहरण
- सोशल media वर पोस्ट्स मध्ये
- Email मधून पाठवता येईल
- Blog वरून : जसं आपण NU मुलाखतींचे एक विशेष पेज केलेलं आहे.
- Business Whatsapp मध्ये "Quick Replies" मध्ये
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.