Friday 20 August 2021

आत्ता समोर असणारा यक्ष प्रश्नच आपल्याला मार्ग दाखवत असतो !

१८ ऑगस्ट दुपारी सव्वा बारा वाजेपर्यंत माझ्या मिनरल water च्या ट्रेनिंगसाठी ह्यावेळी, म्हणजे ट्रेनिंग क्र ८५ ला एकही बुकिंग झालेलं नव्हतं. म्हणजे बघा की, ट्रेनिंग ला सुरुवात होणार 2 वाजता दुपारी आणि १२ पर्यंत एकही बुकिंग नाही. मग मी ठरवून टाकलं कि ह्यावेळी "रद्द". तसं काही ठिकाणी सांगून सुद्धा टाकलं आणि १५ वीस मिनिटांत 2 जणांनी विचारलं: सर, 2 ला सुरु करतोय ना ?

ह्यावेळी मी "नाहीच" घ्यायचा निर्णय घेतला. सर्वांना सध्या जे खूप कठीण प्रश्न आहेत तेच मलाही आहेत. तरीही मी माझ्या निर्णयावर स्थिर राहिलो. तरीही सकाळपासून बेचैनी होतीच. आणि मी माझ्या सहकार्यांसोबत थोडी चर्चा सुद्धा केली ह्या अनुषंगाने : की नक्की काय होतंय !

मग चर्चेअंती असं लक्षात आलं,की परिस्थितीत विशेष फरक नाहीये,तर आमच्या ग्राहकाला नक्की कळविले जात नाहीये, की, कधी आणि कोणत्या तारखेला हे ट्रेनिंग असणार आहे ते. आम्ही फेसबुक वर पोस्ट वगैरे करत असतो, तरी हे लक्षात आलं, कि आमचा सर्वात जास्त "Traffic" असणारा Channel म्हणजे आमचा Youtube channel तसेच आमचा "कोरा" चा वाचकवर्ग. इथे आमची "Initimations" पोचतच नाहीत.  म्हणजे हे करून पाहूयात. 

ह्याने लगेच अपेक्षित परिणाम मिळेल का ?

मिळेल,अशी अटकळ आहे.पाहुया आता.आणि आमच्या अनुभवाने, साधारण ३ एक महिने तरी कोणताही नवीन प्रयोग करून पहावा लागतो. मगच काहीतरी निश्चित पुढची स्टेप घेता येते.ह्यापेक्षा फार वाईट काही घडेल असं वाटत नाही.

लगेच मोठमोठे चेंजेस किंवा बदल करायचे नाहीत. 

थोडा संयम दाखवायचा. फेस करायची आतली धाकधूक, भीती, अनिश्चितता.हीच प्रगल्भता.हाच तो मानसिकतेतला बदल.आपला वाचकवर्ग आपल्याला पाहत असतो, आपली नोंद ठेवत असतो.तात्पुरत्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण जर आपल्या बिझनेस model मध्ये मोठे किंवा दाखल घेण्याजोगे निर्णय घेतले, तर ग्राहकांच्या मनात वसलेली आपली छबी ही कायमस्वरूपी विस्कळीत होण्याची शक्यता असते. ज्याने हे ग्राहक, जे मोठ्या प्रयत्नाने जोडून राहिलेले असतात, एका क्षणात पाठ फिरवून निघून जातात, आणि आपल्याला फक्त परिणाम दिसतो. कारण आपले updates चेक करताना सुद्धा ते काही आपल्याला सांगत नसतात की "मी अमुक अमुक, माझा नंबर अमुक अमुक". सोडताना तर प्रश्नच नाही. काही मार्गांनी आपण हे catch करू शकतो,म्हणजे newsletter द्वारे वगैरे. तरीही जाणाऱ्या माणसाला "जाब" नाही विचारता येत.

ह्याची काल लगेच प्रचीती आली,प्रत्यक्ष !

एका Dining Hall ला जाण्याचा काल योग आला.त्यांनी त्या हॉटेल च्या आवारात हा Hall पुन्हा साधारण १० एक वर्षांच्या Gap नंतर पुन्हा सुरु केलाय. ह्याची Veg, शाकाहारी, राजस्थानी थाळी ही खासियत होती, जे आता पुन्हा रुजू होत आहे. पण मध्ये ह्या हॉटेल चालकांनी, काही वर्षे इतर विविध models वापरून पहिली. ज्यात मांसाहारी पदार्थ सुद्धा होते. आणि इथेच ग्राहक वर्गाने पाठ फिरवली.

नवीन वर्ग येईलच की !

हे तर आहेच. तरी ह्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील हे निश्चित. ह्यातलाच एक भाग म्हणून आम्हाला त्यांनी काल थाळी खायला आमंत्रित केलं. तरीही जुना वर्ग टिकवून ठेवला असता तर !

शिकण्यासारखे .....

  1. संपूर्णपणे एकदम बिझनेस model बदलायचे असेल, तर तितकी शाश्वती तुमच्या ROI ने द्यायला हवी.
  2. थोडे थोडे बदल, तेही अंतर्गत करायला हरकत नाही, पण हळू हळू !
  3. सदर उदाहरणात एकदम Customer Segment संपूर्णपणे बदलून गेली ना ! त्यामुळे आधीचे ग्राहक तुटले. असं करायचं असेल, तर वेगळी vertical सुरु केलेली उत्तम.

आपली मते अपेक्षित !

1 comment:

  1. भारी वाटलं 👍
    अपेक्षित निकाल मिळत नसल्यास काही तरी बदल करावा लागेल असं आपल्याला वाटतं पण निव्वळ गरज आहे म्हणून करू पाहणारा बदल किंवा पर्याय हा सक्षम आहे का ह्यांचं उत्तर त्या प्रॉब्लेम मध्येच दडलेलं असतं हे आत्मपरिक्षणात्मक निरीक्षण भारी वाटलं, धन्यवाद 🙏

    ReplyDelete

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.