Tuesday 21 September 2021

Groups = Promotions : हे जणू सूत्रच झालंय !

कोणताही फेसबुक किंवा whatsapp ग्रुप उघडून बघा : त्यात जास्तीत जास्त पोस्ट्स प्रमोशन च्याच दिसतात. छोट्या व्यावसायिकांचं मी तर पाहिलंय, की त्यांचा हा एकच "धर्म" होवून बसलेला दिसतो, की ग्रुप ना ? ठोक पोस्टिंग. किंवा ग्रुप्स हे "पोस्टिंग" करताच असतात. अनेक जण तर हे दुकानच उघडून बसतात, कि एक फेसबुक चा ग्रुप करा, त्यावर प्रचंड मेंबर संख्या add करत जा; आणि एखादी स्वस्त अशी मेम्बर्शीप द्या आणि ती विका. बदल्यात फेसबुक असतंच तुमच्या पोस्ट्स प्रचंड populate करायला. 

हरकत काय असं करायला ?


खरं तर काही असूच शकत नाही ना, कारण प्रत्येकाचं स्वातंत्र्य ! तरीही एकंदरीत आधी आयुष्य म्हणजे मला सृष्टीकर्त्याने दिलेलं जीवन आलं, आणि मग ते कसं घालवायचं हा प्रश्न आला. म्हणून तर आपण कुणालाही प्रथम भेटीत विचारतो ना : 
"What do you do" किंवा
"What's your Occupation" किंवा
"काय करता आपण" किंवा
"काय चाललंय  सध्या" 

हे सर्व प्रश्न "तुम्ही तुम्हाला दिलेली ही उर्जा कशी कारणी लावता" असे आहेत.ही कारणी लावताना आपण केलेल्या विविध कामांच्या नंतर आपल्याला कसं वाटतं  ह्याचा विचार आपण करतो का कधी ? म्हणजे अगदी "समाधान" ह्या फूट पट्टी वर नकोय मोजायला; तरीही साधारणत: आपण ज्या हेतू ने आपला व्यवसाय निवडलेला असतो तो हेतू बऱ्याचदा बाजूलाच पडलेला दिसतो आणि "सतत आपल्या सेवा-उत्पादने आपण सतत विकत राहणे " हेच काम होवून बसलेलं दिसतं.

विक्री किंवा प्रमोशन हा व्यवसायाचा एक भाग आहे हे निश्चित, तरी जोडीने उत्तरोत्तर हि प्रक्रिया थोडी सोपी व्हायला हवी. म्हणजे आपल्याला मिळणाऱ्या परिणामांच्या तुलनेत हे काम कमी-कमी होत जावं.आणि आपल्याला आपल्या बेसिक profile वर म्हणजेच आपल्या क्षमता (स्वत: च्या किंवा व्यावसायिक) किंवा त्यांचा दर्जा वाढविण्यावर काम करायला वेळ आणि वाव मिळावा.

हे प्रत्येकाच्या मनाशी पक्कं असतं; तरीही "जो दिखता हैं वही बिकता हैं " हे एकमेव सूत्र अंगिकारल्याने खूप घोळ होतो.

मुळात ग्रुप्स हे ह्याकरीता नसावेतच मुळी !

ग्रुप्स वर हे आपल्या योग्यता वाढविण्याकरिता काय करता येईल  ह्या विषयी बोललं जावं अथवा व्यक्त व्हावं. अशाच काहीशा उद्देशाने आपण निवडक उद्यमी ची निर्मिती केली. हे वेगवेगळे प्रयत्न, त्यांची गोळा बेरीज व सोबतीने येणारे अनुभव ह्याची गोडी चाखता आली तर खरा प्रवासाचा आनंद घेता येईल.

"इथे धंदा मिळत नाही" किंवा 

"खूपच कमी हालचाल असते सध्या ग्रुप वर 

वगैरे साठी इथे येण्यात काहीच अर्थ नाही. ह्या कोणत्याही गोष्टी अर्थात सवंग पणा ग्रुप वर नसावा. ग्रुप थेट धंदा मिळण्यासाठी नव्हे तर एकंदरीत व्यवसायाद्वारे आयुष्य रसदार,चविष्ट व्हावं ह्या दिशेने चालावा. 

कमी हालचाल अर्थात जास्त मोकळी जागा. 👉हीच तर अपेक्षित आहे ना.

तर निवडक उद्यमी म्हणजे अशा प्रकारे विचार करू शकण्याची तयारी असणाऱ्या लहान-थोर उद्यमी मंडळींचा समूह. 

प्रयोग बेडरपणे share करायला वाव असावा !

मनात योजलेले काम झाले की त्याला आपण यश म्हणतो साधारणत: आणि हे होण्याकरिता आपण उद्यमी मंडळी अनेक कृती करीत असतो. ह्यांना "प्रयोग" म्हणता येईल. त्यांतले अनुभव कधी share करतो का आपण ? हल्ली ज्याभोवती एक मोठ्ठ वलय निर्माण झालंय तो mentor म्हणजे तरी काय ? आपले अनुभव फक्त सांगणे खरं तर. हे अनुभव अगदी बेडरपणे सांगता आले, तर खरा ग्रुप, नाहीतर एक दुकानच फक्त !

No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.