Wednesday, 18 August 2021

Quora वर तुमचे Views कमी होतायेत का ? काळजी नको !

काही काळापूर्वी मी Quora ह्या प्रश्नोत्तराच्या वेबसाईट वर माझ्या क्षेत्रात म्हणजे मिनरल water च्या क्षेत्रात "Most Viewed Author" होतो. मी हे अभिमानाने मिरावायचो देखील!

आज आणि काही महिने पाहतोय, की हे माझं स्थान थोडं हलले आहे. कधी ८-९ व्या स्थानावर सुद्धा मी आहे. आज साधारण ५ व्या स्थानावर. "आपली लोकप्रियता कमी व्हायला लागली आहे कि काय" वगैरे प्रश्न मलाही पडायचे पूर्वी, पण आता खरंच नाही पडत. असो. तरी ते पहिल्या स्थानावरचे आहेत, ज्यांना माझ्यापेक्षा जास्त views आहेत, ते नक्की काय करतात, हे सुद्धा कोरा आपल्याला दाखवतं. त्यातून मला काही प्रेरणा मिळेल अशा आशेने मी जरा ह्याच्या थोडा खोलात गेलो, त्याचा हा आढावा आणि पाहणी :-


काय वाटतं तुम्हाला ? मते कळवा !



Tuesday, 17 August 2021

Reputation Build करण्याला सर्वात पहिला Preference द्या !

व्यवसाय करणे म्हणजे नुसतं आपल्याविषयी काहीतरी "ढकलत" राहणे नव्हे !

काल - परवाच माझ्या बहिणीशी (जी आता एक निवृत्त आयुष्य जगतीये),तिच्याशी बोलता बोलता ती म्हणाली : हे whatsapp ग्रुप्स जॉईन करायचे म्हणजे लोकांची नुसती विका-विकी सहन करत रहायची, त्यापेक्षा नकोच !

खूप बोध घेण्यासारखं आहे हे ! कारण अशाच मंडळींना टार्गेट करून आपण आपला माल विकत असतो. आणि त्यांनाच जर असं वाटत असेल, तर हे whatsapp मार्केटिंग म्हणजे झोलच म्हणायचं की ! त्यात परत हि whatsapp मार्केटिंग ची softwares आलीयेत मार्केट मध्ये. ह्याच्या जाळ्यात परत लोक फसत राहतात, कारण ही softwares आपलं हे "ढकलिंग" automate करून तर देतातच,शिवाय भरपूर,माहित नसलेल्या लोकांपर्यंत आपलं पोस्टिंग "पुश" करत राहतात, आणि आपल्याला वाटतं कि हे खूप भारी मार्केटिंग चाललंय माझं !

असंच एक बकवास म्हणजे परस्पर "ग्रुप्स" ना आणि लिस्ट ना add करत राहणे 

लोक परस्पर add करतात आणि मेसेजेस चा भडीमार करत राहतात. logic काय,तर कुणीतरी पाहतं आणि माल विकत घेतं. असेलही;पण त्यासाठी ही "शिकार" सतत करत रहावी लागते, आणि मुळात आपला समज असा होतो की हे करतच राहायला हवं. ह्यात मुळात आपलं काम, त्यातली अधिकारिता ही अधिकाधिक विकसित व्हायच्या ऐवजी मी सतत "विकायच्या" कामात राहतो आणि हेच मला माझं प्रथम-कर्म वाटू लागतं.

मुळात असं करूनही तितकासा उपयोग होतो असं नाही. नुकतंच मला कुणीतरी परस्पर एका whatsapp ग्रुप ला add केलं. पूर्वी मी लगेच बाहेर पडत असे. आता जरा सबुरीने घेतो,तपासतो आणि मग ठरवतो कि ग्रुप उपयुक्त आहे किंवा नाही ते. जरा शेअर करतो :-

ह्या ग्रुप ला ज्यांनी add केलं त्यांची विषयी तपासलं तर आढळलं ...

  1. ह्या व्यक्तीचं Just Dial चं लिस्टिंग फार भारी नव्हत (जे त्याने सेंड केलेलं होतं)
  2. मग पाहिलं GMB, म्हणजे गुगल लोकल, तिथे लिस्टिंग नव्हतच
  3. website नाही, शिवाय ही व्यक्ती डिजिटल मार्केटिंग करत होती 
  4. त्याला मी त्याचं linked इन प्रोफाईल पाठवायला सांगितलं,तर उत्तर नाही 
हे सगळं करायला हवं असं अजिबात नाही, पण तरी ह्यातला एक मार्ग तरी योग्य पद्धतीने केला तर जास्त चांगले आणि स्थिर परिणाम मिळू शकतात. उदाहरणार्थ जर just Dial हा मार्ग निवडला असेल, तर त्यावर पूर्ण लक्ष देवून reviews वगैरे बिल्ड करावेत. म्हणजे Conversion तरी निश्चित मिळू शकेल. 

जोडीला आपले नवीन प्रोजेक्ट्स वगैरे linked in वर पोस्ट करीत राहावेत.


Friday, 13 August 2021

Videos करावेत की Podcasts ?

Demos असतील, तर अर्थात Videos च वापरा. पण माहितीपर काही असेल, जे "न पाहता" फक्त ऐकून चालेल; तर अशा वेळी Podcasts प्रचंड उपयोगी ठरतात. सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे Distraction होत नाही. तुमचा channel जर खूप प्रसिद्ध असेल, तर YOUTUBE वरच "podcasts" अशी एक वेगळी प्ले लिस्ट करून त्यावर एक एक करत तुमचे Audios ठेवू शकता. ह्याचा हेतू इतकाच, की एकाच channel वर लोकांना सगळं मिळावं म्हणून. 

पण youtube तर फक्त Video च घेतं ना ..

बरोबर. आपले जरी podcasts असतील, तरी ते "Uplaod Video" म्हणूनच चढवावे लागतात. आणि View थांबवून फक्त ऐकता येत नाहीत मोबाईलवर, हीच एक पंचाईत असते Youtube ची. तरी वर म्हटलं तसं, search खूप जास्त असतो यु ट्यूब ला. त्यामुळे त्यावर सुरुवात नक्की करू शकता. 

कसे करायचे अपलोड ?

तसेच. जसे Video करतो तसे. Kinemaster सारखं एखादं सोप्पं App घ्या आणि करा रेकॉर्ड त्यात. सोबत काही फोटोज टाका, किंवा चक्क स्वत:चाच फोटो करा अपलोड, इतकं सोप्पं.

पण मग Videos च का नाही ?

Videos पण चालतात ना ! जर अगदीच जनरल असेल विषय, आणि फक्त engagement हा हेतू असेल, तर चालेल की. पण एखाद्या विषयावर सखोल विचार मांडायचे असतील तर podcast चा नक्कीच खूप चांगला उपयोग होतो.

तुमचा channel जर फार जर प्रसिद्ध नसेल, किंवा तुम्हाला सर्च वगैरे मध्ये तितका रस नसेल, आणि फक्त "अधिकार-सिद्धता" ह्या एकाच विषयात रस असेल, तर फक्त podcasts म्हणजेच तुमच्या Audio Files तुमच्या website वर अपलोड करून ठेवू शकता. म्हणजे ह्या File ची "लिंक" मिळू शकते. ही लिंक मग अनेक प्रकारे Re-Purpose करता येते :-

  • Website वर "टेबल" स्वरूपात : उदाहरण 
  • सोशल media वर पोस्ट्स मध्ये 
  • Email मधून पाठवता येईल 
  • Blog वरून : जसं आपण NU मुलाखतींचे एक विशेष पेज केलेलं आहे.
  • Business Whatsapp मध्ये "Quick Replies" मध्ये 
ह्या रणनीती चा सर्वोत्कृष्ट फायदा म्हणजे तुमच्या मजकुरात रस असणाऱ्या व्यक्ती ला तो मजकूर निवांत, Distraction फ्री ऐकता येतो. 

विचार/प्रश्न/प्रतिक्रिया अपेक्षित !


Tuesday, 3 August 2021

आपापल्या विषयाबाबत सतर्कता ही देखील अधिकार सिद्धता च !

नुकतेच आपण पाहिले,की मी डोमेन नेम renewal करण्याबाबत एक पोस्ट टाकली. त्यावर ओंकार चंद्रचूड ह्यांनी त्या संदर्भात असलेला त्यांचा अनुभव share केला. 


असंच आज आमच्या एका दुसऱ्या ग्रुप वर पेटंट बद्दल एक पोस्ट आली असताना, त्या ग्रुप च्या सदस्य, पल्लवी कदम ह्यांनी आवर्जून एक कमेंट पोस्ट केली. पेटंट या विषयात त्या काम करतात, हे सांगायला नकोच. 


ह्यातून काय होऊ शकतं ?

आपण जेव्हा स्थानिक व्यवसाय किंवा छोटा व्यवसाय करत असतो, तेव्हा एखाद-दुसऱ्या ग्रुप्स मध्ये कार्यरत असतो. प्रत्येकच मेंबर काही उठून रोज पोस्टिंग कर असं नाही होत. तर मग हे , आपले विषय आले, की आवर्जून प्रतिक्रिया, काही उपयुक्त टिप्स share केल्या, कि मेम्बर्स ना उपयोग होतोच; शिवाय आपला, आपल्या बद्दल चा आदर वाढू शकतो, कारण आपण आपल्या विषयात काही बोलत राहतो.

एका मर्यादित, niche ग्रुप्स मधून ह्या प्रकारे आपल्याला खूप मोठ्या प्रकारे यश मिळू शकेल. म्हणजे : सतत आपण चमकोगिरी करायची गरज नाही, शिवाय ५० ग्रुप्स ना सुद्धा जॉईन व्हायची आवश्यकता नाही !

हे लेख वाचू शकता :-

  1. चमकोगिरी :- https://nupune.blogspot.com/2021/07/blog-post.html
  2. अनेक ग्रुप्स :- https://nupune.blogspot.com/2021/04/network.html

Monday, 2 August 2021

Domain Name इतकं महत्त्वाचं आहे का खरोखर ?

मुळात डोमेन नेम म्हणजे तुमच्या (Internet वरच्या)  म्हणजेच आभासी मालमत्तेचे एका संक्षिप्त शब्दात केलेले संपूर्ण वर्णन. ह्यालाच URL असाही शब्द वापरला जातो. Uniform Resource Locator. म्हणजेच कोठूनही पटकन पाहता येण्यासाठी केली गेलेली सोय. म्हणजेच website कोठूनही पाहता यावी ह्याकरिता असलेले एक छोटेसे नाव, नावाची पाटी.

स्थायी किंवा स्थावर मालमत्ता जपण्यासाठी वारसदार वगैरे बऱ्याच गोष्टी जपून, पाहून कराव्या लागतात. म्हणजे ही मालमत्ता सहजा सहजी कुणाच्याही हाती लागत नाही. परंतु आभासी मालमत्ता मात्र फक्त डोमेन नेम बाबतीत केलेल्या हलगर्जी पणामुळे तिऱ्हाईत मंडळींच्या हाती अगदी सहज लागू शकते.

किंमतीत फरक आहे ना पण !

होय. बहुतेक स्थावर मालमत्ता ह्या आभासी मालमत्तांच्या तुलनेत जास्त कीमती असतात. उदाहरणार्थ एखाद्या १ BHK Flat ची किंमत एखाद्या केटरिंग contractor च्या website च्या तुलनेत नक्कीच कितीतरी पटीने जास्त असेल. परंतु हाच catering contractor जेव्हा त्याचा व्यवसाय वाढवू शकतो, तेव्हा त्याने website केली, आणि ह्या डोमेन कडे दुर्लक्ष झाले, तर हे प्रकरण खूप जास्त महाग पडू शकेल. त्याचा कालावधी संपल्यावर आठवणीने जर renew केले नाही, तर ते लिलाव स्वरूपात विकलं जाऊ शकतं आणि तुमच्याच नावावर, तुमच्याच डोमेन वर एखादा तिऱ्हाईत कोणत्याही प्रकारचा Online व्यवसाय करू शकतो !

ह्याने काय फरक पडेल ?

  • परस्पर कोणताही माहित नसलेला धंदा तुमच्या नावाने केला गेला तर तुम्हाला चालेल का ? हा आधी विचार करा. Branding दृष्टीने हा विचार महत्त्वाचा आहे. 
  • आपलेच डोमेन फक्त हलगर्जीपणाने आपल्यालाच खूप जास्त किंमतीला विकत घ्यायला लागू शकेल 
  • एखाद्या स्पर्धकाने जर घेतले, तर कितीही त्रागा केला, तरीही हे मिळू शकत नाही.
  • डोमेन गेले कि, त्याबरोबर website सुद्धा गेली. पुन्हा नव्याने सगळी उभारणी करावी लागेल, दुसरे डोमेन घेऊन.
  • नवीन पत्त्यावर दुकान नेल्या सारखे आहे हे, ते सुद्धा नवीन नाव लावून. असेल उपलब्ध तर.

काय करावं हे होऊ द्यायचं नसेल तर ?

  • Website व डोमेन दुसरीकडून करून घेतले असेल, तरीही आपल्याकडे स्वत:कडे ह्याचा Reminder सेटप करून ठेवा. developer चा हलगर्जी पणा तुम्हाला भोवू देवू नका. 
  • दरवर्षी अगदी ठरवून वेळेवर हे काम करा, न चुकता. 
  • शक्य झाल्यास डोमेन चे नोंदणीकृत मालक तुम्ही रहा : तुमचा email ID ही मालकी सिद्ध करायला पुरेसा असतो.
  • शक्यतो हे काम एखाद्या established कंपनीकडे द्या. Freelance developers नको.


Tuesday, 20 July 2021

एक वेगळाच आनंद !

व्यावसायिक मानसिकता वाढीला लावायची, स्वत:पासून; आणि सोबत कुणाला रस असेल, तर त्यांना घेवून हा खरा निवडक उद्यमी चा गाभा. हा विचार करताना विविध व्यावसायिक,छोटे-मोठे कसा विचार करतात हे खूप जवळून समजून घेण्याची संधी मिळते, वारंवार.

नुकत्याच माधवीशी झालेल्या गप्पांतून हे अनुभवाला आलं. शिवाय किर्लोस्करांचा कार्यक्रम करताना 2-3 गोष्टी पाहण्यात आलेल्या, त्या म्हणजे :-

  1. त्यांना "सर्वात मोठ्ठं" व्हायचं नव्हतं;तर सर्वात जास्त आदरणीय व्हायचं होतं, एका क्षेत्रात : Engineering. फक्त वाढत राहणं हे खूप उथळ आहे हे वाटायला लागलं ह्यानंतर.
  2. लक्ष्मणराव ह्यांचा प्रवास एका "रागा" तून सुरु झाला. म्हणजेच राग आणि इतर सो called नकारात्मक भावना ह्या किती मोठ्या गोष्टींच्या जनक ठरू शकतात. 
  3. फंडिंग साठी त्यांनी नेट वर्किंग केलं , प्रपोजल बनवलं. वरकरणी औंध च्या राजांनी त्यांना जमीन दिली हे जरी दिसत असलं, तरी लक्ष्मणरावांनी त्याना स्वप्न विकलं,यशस्वी रित्या.

ह्यातल्याच ३ क्रमांकाच्या मुद्द्याला धरून आपण स्वप्ना कुलकर्णी ह्यांचा सेशन ठेवला, पाठोपाठ वाटलं की ह्याची कार्यशाळा ठेवू. त्यांनी मानधन मागितलं नाही, तरी आपल्याकडून द्यावं असा विचार झाला. २०० रु इतकं द्यावं per head असं म्हणण्यात आलं. 

काही मंडळींनी "हे फी मध्ये नाही का " असे विचारले, तर काहींनी चक्क स्वत:हून sponsorship offer केली. दोन्हीही ठीक. पण द्यायची मानसिकता विकसित करायची आहे, तेव्हा मेम्बर्स नी फक्त देणगी म्हणून यायचं हि अपेक्षा नाही, तर स्वत:हून शिकायचं आणि त्याकरिता त्या तज्ज्ञाला मानधन (त्यांनी न मागता देखील) द्यावे असे मला वाटत होते. मेम्बर्शीप फी कशी वापरली जाते हे मला explain करावे असे मला वाटत नाहीये. वर्षभर, उत्तम प्रतीचे, अत्यंत selective असे ज्ञान,माणसे त्यांचे अनुभव हे मिळवायला कदाचित ह्याच्या (संपूर्ण ५० लोकांची वार्षिक फी) कितीतरी पट खर्च होत असेल, विचार करून पहा. त्यामुळे ग्रुप वाढवीत राहणे हा अजिबात हेतू नाही. आणि ह्या फी मध्ये काय ? तर निवडक, वेगळ्या विचार करणाऱ्या मंडळींचा सहवास; इतकेच assure करता येईल.

पण खरंच, राग मात्र नाही,आणि अपेक्षाही नाही. आता september अखेरीला काही लोकांचे renewal आहे. त्याना पूर्ण मोकळीक आहे, renew न 🚫🚫करण्याची 😇

उत्साहवर्धक काय ?

आत्ता पर्यंत काही लोकांनी फंडिंग कार्यशाळेला स्वत:हून नोंदणी केलेली आहे. शिकायचं आहे म्हणून. देणगी म्हणून नव्हे. पुरस्कर्ते म्हणूनही नव्हे. असा समूह राहिला तरी पुरेसं आहे.

खंत 

मंडळी मिटींग्स ना येत नाहीत.

Saturday, 10 July 2021

थकले रे नंदलाला : चमकोगिरी पासून सावध राहण्याचा परिपाठ

  


"दिखता है वो बिकता है" ही एकदा sole Value ठरविली,कि मग काय, सोप्पं झालं कि सारं ! फक्त नाचत राहायचं, चमकत राहायचं आणि हेच सवंगपणे करत राहायचं ! 

चमकोगिरी करत राहण्याने होतं असं, कि आपण काम सोडून इतर सगळं करत बसतो. आणि नंतर दमतो. पण हातात विशेष काही पडत असं काही नाही ! 

गदिमा कसं मांडतात पहा ...

"नाचनाचुनी अती मी दमले" 

"आत्म स्तुतीचे कुंडल कानी, गर्व चढविला भाळा "

किंवा 

"स्वत: भोवती घेता गिरक्या, अंध पणा कि आला"