Friday, 20 August 2021

आत्ता समोर असणारा यक्ष प्रश्नच आपल्याला मार्ग दाखवत असतो !

१८ ऑगस्ट दुपारी सव्वा बारा वाजेपर्यंत माझ्या मिनरल water च्या ट्रेनिंगसाठी ह्यावेळी, म्हणजे ट्रेनिंग क्र ८५ ला एकही बुकिंग झालेलं नव्हतं. म्हणजे बघा की, ट्रेनिंग ला सुरुवात होणार 2 वाजता दुपारी आणि १२ पर्यंत एकही बुकिंग नाही. मग मी ठरवून टाकलं कि ह्यावेळी "रद्द". तसं काही ठिकाणी सांगून सुद्धा टाकलं आणि १५ वीस मिनिटांत 2 जणांनी विचारलं: सर, 2 ला सुरु करतोय ना ?

ह्यावेळी मी "नाहीच" घ्यायचा निर्णय घेतला. सर्वांना सध्या जे खूप कठीण प्रश्न आहेत तेच मलाही आहेत. तरीही मी माझ्या निर्णयावर स्थिर राहिलो. तरीही सकाळपासून बेचैनी होतीच. आणि मी माझ्या सहकार्यांसोबत थोडी चर्चा सुद्धा केली ह्या अनुषंगाने : की नक्की काय होतंय !

मग चर्चेअंती असं लक्षात आलं,की परिस्थितीत विशेष फरक नाहीये,तर आमच्या ग्राहकाला नक्की कळविले जात नाहीये, की, कधी आणि कोणत्या तारखेला हे ट्रेनिंग असणार आहे ते. आम्ही फेसबुक वर पोस्ट वगैरे करत असतो, तरी हे लक्षात आलं, कि आमचा सर्वात जास्त "Traffic" असणारा Channel म्हणजे आमचा Youtube channel तसेच आमचा "कोरा" चा वाचकवर्ग. इथे आमची "Initimations" पोचतच नाहीत.  म्हणजे हे करून पाहूयात. 

ह्याने लगेच अपेक्षित परिणाम मिळेल का ?

मिळेल,अशी अटकळ आहे.पाहुया आता.आणि आमच्या अनुभवाने, साधारण ३ एक महिने तरी कोणताही नवीन प्रयोग करून पहावा लागतो. मगच काहीतरी निश्चित पुढची स्टेप घेता येते.ह्यापेक्षा फार वाईट काही घडेल असं वाटत नाही.

लगेच मोठमोठे चेंजेस किंवा बदल करायचे नाहीत. 

थोडा संयम दाखवायचा. फेस करायची आतली धाकधूक, भीती, अनिश्चितता.हीच प्रगल्भता.हाच तो मानसिकतेतला बदल.आपला वाचकवर्ग आपल्याला पाहत असतो, आपली नोंद ठेवत असतो.तात्पुरत्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण जर आपल्या बिझनेस model मध्ये मोठे किंवा दाखल घेण्याजोगे निर्णय घेतले, तर ग्राहकांच्या मनात वसलेली आपली छबी ही कायमस्वरूपी विस्कळीत होण्याची शक्यता असते. ज्याने हे ग्राहक, जे मोठ्या प्रयत्नाने जोडून राहिलेले असतात, एका क्षणात पाठ फिरवून निघून जातात, आणि आपल्याला फक्त परिणाम दिसतो. कारण आपले updates चेक करताना सुद्धा ते काही आपल्याला सांगत नसतात की "मी अमुक अमुक, माझा नंबर अमुक अमुक". सोडताना तर प्रश्नच नाही. काही मार्गांनी आपण हे catch करू शकतो,म्हणजे newsletter द्वारे वगैरे. तरीही जाणाऱ्या माणसाला "जाब" नाही विचारता येत.

ह्याची काल लगेच प्रचीती आली,प्रत्यक्ष !

एका Dining Hall ला जाण्याचा काल योग आला.त्यांनी त्या हॉटेल च्या आवारात हा Hall पुन्हा साधारण १० एक वर्षांच्या Gap नंतर पुन्हा सुरु केलाय. ह्याची Veg, शाकाहारी, राजस्थानी थाळी ही खासियत होती, जे आता पुन्हा रुजू होत आहे. पण मध्ये ह्या हॉटेल चालकांनी, काही वर्षे इतर विविध models वापरून पहिली. ज्यात मांसाहारी पदार्थ सुद्धा होते. आणि इथेच ग्राहक वर्गाने पाठ फिरवली.

नवीन वर्ग येईलच की !

हे तर आहेच. तरी ह्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील हे निश्चित. ह्यातलाच एक भाग म्हणून आम्हाला त्यांनी काल थाळी खायला आमंत्रित केलं. तरीही जुना वर्ग टिकवून ठेवला असता तर !

शिकण्यासारखे .....

  1. संपूर्णपणे एकदम बिझनेस model बदलायचे असेल, तर तितकी शाश्वती तुमच्या ROI ने द्यायला हवी.
  2. थोडे थोडे बदल, तेही अंतर्गत करायला हरकत नाही, पण हळू हळू !
  3. सदर उदाहरणात एकदम Customer Segment संपूर्णपणे बदलून गेली ना ! त्यामुळे आधीचे ग्राहक तुटले. असं करायचं असेल, तर वेगळी vertical सुरु केलेली उत्तम.

आपली मते अपेक्षित !

Wednesday, 18 August 2021

Quora वर तुमचे Views कमी होतायेत का ? काळजी नको !

काही काळापूर्वी मी Quora ह्या प्रश्नोत्तराच्या वेबसाईट वर माझ्या क्षेत्रात म्हणजे मिनरल water च्या क्षेत्रात "Most Viewed Author" होतो. मी हे अभिमानाने मिरावायचो देखील!

आज आणि काही महिने पाहतोय, की हे माझं स्थान थोडं हलले आहे. कधी ८-९ व्या स्थानावर सुद्धा मी आहे. आज साधारण ५ व्या स्थानावर. "आपली लोकप्रियता कमी व्हायला लागली आहे कि काय" वगैरे प्रश्न मलाही पडायचे पूर्वी, पण आता खरंच नाही पडत. असो. तरी ते पहिल्या स्थानावरचे आहेत, ज्यांना माझ्यापेक्षा जास्त views आहेत, ते नक्की काय करतात, हे सुद्धा कोरा आपल्याला दाखवतं. त्यातून मला काही प्रेरणा मिळेल अशा आशेने मी जरा ह्याच्या थोडा खोलात गेलो, त्याचा हा आढावा आणि पाहणी :-


काय वाटतं तुम्हाला ? मते कळवा !



Tuesday, 17 August 2021

Reputation Build करण्याला सर्वात पहिला Preference द्या !

व्यवसाय करणे म्हणजे नुसतं आपल्याविषयी काहीतरी "ढकलत" राहणे नव्हे !

काल - परवाच माझ्या बहिणीशी (जी आता एक निवृत्त आयुष्य जगतीये),तिच्याशी बोलता बोलता ती म्हणाली : हे whatsapp ग्रुप्स जॉईन करायचे म्हणजे लोकांची नुसती विका-विकी सहन करत रहायची, त्यापेक्षा नकोच !

खूप बोध घेण्यासारखं आहे हे ! कारण अशाच मंडळींना टार्गेट करून आपण आपला माल विकत असतो. आणि त्यांनाच जर असं वाटत असेल, तर हे whatsapp मार्केटिंग म्हणजे झोलच म्हणायचं की ! त्यात परत हि whatsapp मार्केटिंग ची softwares आलीयेत मार्केट मध्ये. ह्याच्या जाळ्यात परत लोक फसत राहतात, कारण ही softwares आपलं हे "ढकलिंग" automate करून तर देतातच,शिवाय भरपूर,माहित नसलेल्या लोकांपर्यंत आपलं पोस्टिंग "पुश" करत राहतात, आणि आपल्याला वाटतं कि हे खूप भारी मार्केटिंग चाललंय माझं !

असंच एक बकवास म्हणजे परस्पर "ग्रुप्स" ना आणि लिस्ट ना add करत राहणे 

लोक परस्पर add करतात आणि मेसेजेस चा भडीमार करत राहतात. logic काय,तर कुणीतरी पाहतं आणि माल विकत घेतं. असेलही;पण त्यासाठी ही "शिकार" सतत करत रहावी लागते, आणि मुळात आपला समज असा होतो की हे करतच राहायला हवं. ह्यात मुळात आपलं काम, त्यातली अधिकारिता ही अधिकाधिक विकसित व्हायच्या ऐवजी मी सतत "विकायच्या" कामात राहतो आणि हेच मला माझं प्रथम-कर्म वाटू लागतं.

मुळात असं करूनही तितकासा उपयोग होतो असं नाही. नुकतंच मला कुणीतरी परस्पर एका whatsapp ग्रुप ला add केलं. पूर्वी मी लगेच बाहेर पडत असे. आता जरा सबुरीने घेतो,तपासतो आणि मग ठरवतो कि ग्रुप उपयुक्त आहे किंवा नाही ते. जरा शेअर करतो :-

ह्या ग्रुप ला ज्यांनी add केलं त्यांची विषयी तपासलं तर आढळलं ...

  1. ह्या व्यक्तीचं Just Dial चं लिस्टिंग फार भारी नव्हत (जे त्याने सेंड केलेलं होतं)
  2. मग पाहिलं GMB, म्हणजे गुगल लोकल, तिथे लिस्टिंग नव्हतच
  3. website नाही, शिवाय ही व्यक्ती डिजिटल मार्केटिंग करत होती 
  4. त्याला मी त्याचं linked इन प्रोफाईल पाठवायला सांगितलं,तर उत्तर नाही 
हे सगळं करायला हवं असं अजिबात नाही, पण तरी ह्यातला एक मार्ग तरी योग्य पद्धतीने केला तर जास्त चांगले आणि स्थिर परिणाम मिळू शकतात. उदाहरणार्थ जर just Dial हा मार्ग निवडला असेल, तर त्यावर पूर्ण लक्ष देवून reviews वगैरे बिल्ड करावेत. म्हणजे Conversion तरी निश्चित मिळू शकेल. 

जोडीला आपले नवीन प्रोजेक्ट्स वगैरे linked in वर पोस्ट करीत राहावेत.


Friday, 13 August 2021

Videos करावेत की Podcasts ?

Demos असतील, तर अर्थात Videos च वापरा. पण माहितीपर काही असेल, जे "न पाहता" फक्त ऐकून चालेल; तर अशा वेळी Podcasts प्रचंड उपयोगी ठरतात. सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे Distraction होत नाही. तुमचा channel जर खूप प्रसिद्ध असेल, तर YOUTUBE वरच "podcasts" अशी एक वेगळी प्ले लिस्ट करून त्यावर एक एक करत तुमचे Audios ठेवू शकता. ह्याचा हेतू इतकाच, की एकाच channel वर लोकांना सगळं मिळावं म्हणून. 

पण youtube तर फक्त Video च घेतं ना ..

बरोबर. आपले जरी podcasts असतील, तरी ते "Uplaod Video" म्हणूनच चढवावे लागतात. आणि View थांबवून फक्त ऐकता येत नाहीत मोबाईलवर, हीच एक पंचाईत असते Youtube ची. तरी वर म्हटलं तसं, search खूप जास्त असतो यु ट्यूब ला. त्यामुळे त्यावर सुरुवात नक्की करू शकता. 

कसे करायचे अपलोड ?

तसेच. जसे Video करतो तसे. Kinemaster सारखं एखादं सोप्पं App घ्या आणि करा रेकॉर्ड त्यात. सोबत काही फोटोज टाका, किंवा चक्क स्वत:चाच फोटो करा अपलोड, इतकं सोप्पं.

पण मग Videos च का नाही ?

Videos पण चालतात ना ! जर अगदीच जनरल असेल विषय, आणि फक्त engagement हा हेतू असेल, तर चालेल की. पण एखाद्या विषयावर सखोल विचार मांडायचे असतील तर podcast चा नक्कीच खूप चांगला उपयोग होतो.

तुमचा channel जर फार जर प्रसिद्ध नसेल, किंवा तुम्हाला सर्च वगैरे मध्ये तितका रस नसेल, आणि फक्त "अधिकार-सिद्धता" ह्या एकाच विषयात रस असेल, तर फक्त podcasts म्हणजेच तुमच्या Audio Files तुमच्या website वर अपलोड करून ठेवू शकता. म्हणजे ह्या File ची "लिंक" मिळू शकते. ही लिंक मग अनेक प्रकारे Re-Purpose करता येते :-

  • Website वर "टेबल" स्वरूपात : उदाहरण 
  • सोशल media वर पोस्ट्स मध्ये 
  • Email मधून पाठवता येईल 
  • Blog वरून : जसं आपण NU मुलाखतींचे एक विशेष पेज केलेलं आहे.
  • Business Whatsapp मध्ये "Quick Replies" मध्ये 
ह्या रणनीती चा सर्वोत्कृष्ट फायदा म्हणजे तुमच्या मजकुरात रस असणाऱ्या व्यक्ती ला तो मजकूर निवांत, Distraction फ्री ऐकता येतो. 

विचार/प्रश्न/प्रतिक्रिया अपेक्षित !


Tuesday, 3 August 2021

आपापल्या विषयाबाबत सतर्कता ही देखील अधिकार सिद्धता च !

नुकतेच आपण पाहिले,की मी डोमेन नेम renewal करण्याबाबत एक पोस्ट टाकली. त्यावर ओंकार चंद्रचूड ह्यांनी त्या संदर्भात असलेला त्यांचा अनुभव share केला. 


असंच आज आमच्या एका दुसऱ्या ग्रुप वर पेटंट बद्दल एक पोस्ट आली असताना, त्या ग्रुप च्या सदस्य, पल्लवी कदम ह्यांनी आवर्जून एक कमेंट पोस्ट केली. पेटंट या विषयात त्या काम करतात, हे सांगायला नकोच. 


ह्यातून काय होऊ शकतं ?

आपण जेव्हा स्थानिक व्यवसाय किंवा छोटा व्यवसाय करत असतो, तेव्हा एखाद-दुसऱ्या ग्रुप्स मध्ये कार्यरत असतो. प्रत्येकच मेंबर काही उठून रोज पोस्टिंग कर असं नाही होत. तर मग हे , आपले विषय आले, की आवर्जून प्रतिक्रिया, काही उपयुक्त टिप्स share केल्या, कि मेम्बर्स ना उपयोग होतोच; शिवाय आपला, आपल्या बद्दल चा आदर वाढू शकतो, कारण आपण आपल्या विषयात काही बोलत राहतो.

एका मर्यादित, niche ग्रुप्स मधून ह्या प्रकारे आपल्याला खूप मोठ्या प्रकारे यश मिळू शकेल. म्हणजे : सतत आपण चमकोगिरी करायची गरज नाही, शिवाय ५० ग्रुप्स ना सुद्धा जॉईन व्हायची आवश्यकता नाही !

हे लेख वाचू शकता :-

  1. चमकोगिरी :- https://nupune.blogspot.com/2021/07/blog-post.html
  2. अनेक ग्रुप्स :- https://nupune.blogspot.com/2021/04/network.html

Monday, 2 August 2021

Domain Name इतकं महत्त्वाचं आहे का खरोखर ?

मुळात डोमेन नेम म्हणजे तुमच्या (Internet वरच्या)  म्हणजेच आभासी मालमत्तेचे एका संक्षिप्त शब्दात केलेले संपूर्ण वर्णन. ह्यालाच URL असाही शब्द वापरला जातो. Uniform Resource Locator. म्हणजेच कोठूनही पटकन पाहता येण्यासाठी केली गेलेली सोय. म्हणजेच website कोठूनही पाहता यावी ह्याकरिता असलेले एक छोटेसे नाव, नावाची पाटी.

स्थायी किंवा स्थावर मालमत्ता जपण्यासाठी वारसदार वगैरे बऱ्याच गोष्टी जपून, पाहून कराव्या लागतात. म्हणजे ही मालमत्ता सहजा सहजी कुणाच्याही हाती लागत नाही. परंतु आभासी मालमत्ता मात्र फक्त डोमेन नेम बाबतीत केलेल्या हलगर्जी पणामुळे तिऱ्हाईत मंडळींच्या हाती अगदी सहज लागू शकते.

किंमतीत फरक आहे ना पण !

होय. बहुतेक स्थावर मालमत्ता ह्या आभासी मालमत्तांच्या तुलनेत जास्त कीमती असतात. उदाहरणार्थ एखाद्या १ BHK Flat ची किंमत एखाद्या केटरिंग contractor च्या website च्या तुलनेत नक्कीच कितीतरी पटीने जास्त असेल. परंतु हाच catering contractor जेव्हा त्याचा व्यवसाय वाढवू शकतो, तेव्हा त्याने website केली, आणि ह्या डोमेन कडे दुर्लक्ष झाले, तर हे प्रकरण खूप जास्त महाग पडू शकेल. त्याचा कालावधी संपल्यावर आठवणीने जर renew केले नाही, तर ते लिलाव स्वरूपात विकलं जाऊ शकतं आणि तुमच्याच नावावर, तुमच्याच डोमेन वर एखादा तिऱ्हाईत कोणत्याही प्रकारचा Online व्यवसाय करू शकतो !

ह्याने काय फरक पडेल ?

  • परस्पर कोणताही माहित नसलेला धंदा तुमच्या नावाने केला गेला तर तुम्हाला चालेल का ? हा आधी विचार करा. Branding दृष्टीने हा विचार महत्त्वाचा आहे. 
  • आपलेच डोमेन फक्त हलगर्जीपणाने आपल्यालाच खूप जास्त किंमतीला विकत घ्यायला लागू शकेल 
  • एखाद्या स्पर्धकाने जर घेतले, तर कितीही त्रागा केला, तरीही हे मिळू शकत नाही.
  • डोमेन गेले कि, त्याबरोबर website सुद्धा गेली. पुन्हा नव्याने सगळी उभारणी करावी लागेल, दुसरे डोमेन घेऊन.
  • नवीन पत्त्यावर दुकान नेल्या सारखे आहे हे, ते सुद्धा नवीन नाव लावून. असेल उपलब्ध तर.

काय करावं हे होऊ द्यायचं नसेल तर ?

  • Website व डोमेन दुसरीकडून करून घेतले असेल, तरीही आपल्याकडे स्वत:कडे ह्याचा Reminder सेटप करून ठेवा. developer चा हलगर्जी पणा तुम्हाला भोवू देवू नका. 
  • दरवर्षी अगदी ठरवून वेळेवर हे काम करा, न चुकता. 
  • शक्य झाल्यास डोमेन चे नोंदणीकृत मालक तुम्ही रहा : तुमचा email ID ही मालकी सिद्ध करायला पुरेसा असतो.
  • शक्यतो हे काम एखाद्या established कंपनीकडे द्या. Freelance developers नको.