Friday, 11 November 2022

इमेल कचरा व्यवस्थापन

नियमितपणे अनावश्यक येणारे इमेल्स ची Subscriptions बंद करून टाकणे :-

खूप वेळा आपण अनाहूतपणे किंवा कधीतरी कदाचित ठरवून काही इमेल्स येत राहावेत म्हणून "subscribe" केलेले असतात. ते जर सध्याला अनावश्यक भासत, वाटत असतील, तर ताबडतोब बंद करून टाकावीत. त्या करिता इमेल उघडून अगदी खाली हा पर्याय उपलब्ध असतो, तो निवडा. बारीक अक्षरांत असतो हा. मी रोज निदान ३ तरी अशी subscriptions बंद करीत असतो.



आपल्या कोणत्याही Channel मधून असा कचरा निर्माण होत नाहीये ह्याची देखील खबरदारी घ्या 

बऱ्याच वेळा Softwares आपल्याला फशी पाडतात हे करायला. उदा. Whatsapp Bulk Messaging चे एखादे Application. किंवा Email Marketing चं एखादं software. भसाभस काहीतरी एखाद्याने न विचारातच पाठवत राहणे म्हणजे Impact निर्माण करणे नव्हे. मला वाटलंच लिहावंसं वगैरे तर इथे blog वर लिहितो किंवा त्या त्या whatsapp ग्रुप वर. अगदीच share करावेसे वाटले तर whatsapp ला status म्हणून ठेवतो.

रोज emails delete करीत राहणे 

लागेल कधीतरी किंवा असुदेत अजून एक कॉपी म्हणून असंख्य Emails जमा होत जातात आणि एक दिवस कोटा फुल होतो. यात वेळच्या वेळी काढून न टाकलेल्या इमेल्स खूप आहेत हे लक्षात असुद्या. डिजिटल युगाची ही आदळणारी देणगी, अशीच manage करावी लागेल. सोशल मिडिया ची notifications बंद करून टाका. उगाच किती त्रास तो !

कसदार, आवश्यक, उपयुक्त असं कमीच असतं 

त्यामुळेच सतत delete करत राहणे हे मोठं काम आहे. हे करीत राहिलं, की आपोआपच उपयुक्त असं वर तरंगतं.

Wednesday, 9 November 2022

ट्विटर, मस्क आणि नफा ...

Elon Musk सध्या twitter विकत घेण्यापेक्षा त्यांनी आल्या आल्या घेतलेल्या तुघलकी निर्णय प्रक्रियेमुळे जास्त चर्चेत आहेत. आल्या आल्या महाराजांनी cost cutting वर जबरदस्त जोर दिला आहे.

मुळात ट्विटर म्हणे दररोज ३० कोटी इतका तोटा भोगत आहे. इतर बहुचर्चित कंपन्यांची काही वेगळी परिस्थिती नाही. Zomato वगैरे कंपन्या नुसत्या जोरात दिसतात. म्हणजे काय तर गिऱ्हाईक वाढतंय, महसूल वाढत चाललाय, नफा नव्हे. Jack Dorse ह्या ट्विटर founder ने कंपनी चा प्रमाणाबाहेर विस्तार झाला आहे अशी कबुली दिलीय.

इकडे startups मात्र वेगळ्याच मस्तीत असतात. ह्यांच्या कामगिरीचे निदर्शक म्हणजे काय तर ह्यांनी उभे केलेले funding. अरे बाबांनो, खाली नफा किती राहतोय ह्यावरून judge होतात उद्योग. पण गुंतवणूक दार काय ? दिसते त्याला सत्य मानतात. कंपनीच्या महसुलात ७६ टक्के वाढ अशी बातमी दिली जाते हेडलाईन्स मार्फत. खाली लिहिलेला मजकूर वाचत नाही बरेचदा : तिमाही तोट्यात घट हे राहून जातं वाचायचं. जणू काही तोट्यात घट ही भारी कामगिरी आहे.

मुळात musk ह्यांचा निर्णय तुघलकी म्हणताना, आपण तुघलक ला अव्यवहारी ठरवत असतो. तुघलक चे लक्ष तिजोरी कडे खास करून होते. व्यवस्थापनाकडे सुद्धा होतं. त्याच धर्तीवर musk ह्यांचे कौशल्य धावत नसेल , कशा वरून ?

मुळात जिथे पैसा भरपूर उपलब्ध असतो ( funding) , तेथेच निर्णयांच्या बाबत जरा ढिलाई अनुभवायला येते, आणि जेथे हा कमी किंवा मोजक्या प्रमाणात असतो, तिथे जास्त सफाई अनुभवायला येते.

Musk हे ह्या संपूर्ण स्टार्टअप क्षेत्राला ढवळून काढणारा काय ?

Saturday, 5 November 2022

व्यवसायाचे सिंहावलोकन

आपला व्यवसाय गुंतवणूक दराप्रमाणे पाहता यायलाच हवा.

यातला सर्वात पहिला निदर्शक म्हणजे नफा. आणि ROI. शिवाय हा काही काळानुसार मापायला हवा.

वेळोवेळी ( आदर्श स्थिती दर ३ महिन्यांनी ) आपल्या products, सेवा ह्यांचे मूल्यमापन करायला हवे, कोणत्या सुरू ठेवायच्या,कोणत्या मध्ये बदल करायचे, कोणत्या बंद करायच्या वगैरे.

नुकतेच वाचनात आले, की पेप्सिको ही कंपनी आता मध्यपूर्व, आफ्रिका तसेच दक्षिण आशिया ह्या विभागांत त्यांच्या Aquafina ह्या प्रॉडक्ट साठी आता rpet म्हणजे पून: चरित प्लास्टिक चा अधिकाधिक वापर करेल.ही झाली कृती. पण हे जरूर पहावे लागेल की ही कृती स्फुरली कुठून ?

प्लास्टिक चा वापर कमी करण्या विषयी उदात्त दृष्टिकोन असला तरीही अर्थकारण महत्त्वाचे ठरते. शिवाय पर्यायी व्यवस्था होईपर्यंत हळूहळू टप्प्या टप्प्याने हे होणे शक्य आहे. परंतु यात जर काम सुरू केलं नाही तर कंपनीचे esg मानांकन मात्र अजून घसरेल ह्यात शंकाच नाही.

ESG मानांकन काय आहे ह्याबद्दल सकाळ मध्ये एक विशेष लेख आला होता. आणि हे त्या त्या कंपन्यांचे रोखे बाजारातील स्थान बळकट किंवा कमजोर करण्यात खूप परिणामकारक ठरेल ह्यात वाद नाही. या आधाराने पेप्सीचे हे मूल्यांकन खूप खाली ( १६ chya आसपास) आहे. स्पर्धक कंपनी कोका कोला चे मध्यम आहे. तर मायक्रोसॉफ्ट चे उच्च ( > ७० ) आहे. तर इथून ही कृती स्फुरली असायची शक्यता नाकारता येत नाही. 

आपल्यासाठी धडा असा की याचप्रमाणे आपणही आपल्या व्यवसायाचे सिंहावलोकन करतो का ? नसलो, तर करायला हवे. ह्याकरता आपण पूर्वी श्रीरंग गोखले सरांचे एक सेशन ठेवले होते ज्यात KRA आणि KPI ह्याबद्दल चर्चा केली गेली होती.

KRA म्हणजे परिणाम कुठे घडवून आणायचा आहे उदा. पदरात पडणारा पैसा. व्यवसायातील भाग. KPI म्हणजे हे नक्की दाखविणारे निदर्शक. म्हणजे नफा.

गोखले सरांचे कल्पकते चे दिवस हे पुरस्कार प्राप्त पुस्तक जरूर वाचा. मराठी मध्ये ह्या विषयावर असलेले कदाचित एकमेव पुस्तक असावे.

Tuesday, 18 October 2022

QR कोड: Hawkins वि Honda

Hawkins : कल्पक कंटेंट पण .....

गेले काही दिवस hawkins chya जाहिराती पाहण्यात येत आहेत. तयार करू शकता येणारे पदार्थ व त्यासाठी लागणारे साहित्य - उपकरणे हे hawkins गेले काही दिवस पीच करीत आहे.

एक गोष्ट मात्र निश्चित की त्यांचा कॉल टू action मात्र होंडा इतका सशक्त नाही. QR कोड हा hawkins chya website वर नेतो,इथे वाचकांशी नाते दुरावण्याची मोठी शक्यता निर्माण होते. 

होंडा :- ग्राहकाच्या वर्तनाचा अधिक विचार 

ह्या जाहिरातीत २ ठिकाणी QR CODE दिसतात. उजवीकडचा कोड व्हिडिओ जाहिरात दाखवतो, तर दुसरा कोड वाचकांशी WHATSAPP वरून संवाद साधतो. हा CALL TO ACTION अधिक सशक्त वाटतो.


Friday, 14 October 2022

जागतिक मानसिक आरोग्य दिन - वृंदा आंबेकर



आरोग्य, स्वास्थ्य म्हटलं कि आपल्या मनात आहार, व्यायाम याबद्दल विचार येतात. आता मी जर 'मानसिक आरोग्य किंवा स्वास्थ्य' असं म्हटलं तर अनेकांच्या भुवया उंचावतील. हे आपल्यासाठी नाही असेही वाटेल. पण जर मी हे  सांगितलं कि आज दहा  माणसातील किमान एक माणूस मानसिक समस्येने त्रस्त आहे तर? 

मी मानसिक समस्या म्हणत आहे; आजार नव्हे. stress, anxiety  किंवा depression याच्या कोणत्यातरी पातळीवर दहातील एक माणूस आहे. त्यात आपला नंबर नाही ना? हा विचार येणारच आणि आला नाही तर  तो करायला हवा. 

आज १० ऑक्टोबर- जागतिक मानसिक आरोग्य दिन. मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी ही गरज WHO ला वाटावी यावरून त्याचे महत्व कळते. आपल्या शारीरिक आजारांपैकी साधारण ७०% आजारांचे मूळ मानसिकतेत आहे हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे याकडे सजगपणे पाहणे, त्याबद्दल जाणून घेणे निकडीचे आहे.
माणूस सुख, आनंद यासाठी सतत प्रयत्नशील असतो. काळाबरोबर त्यांच्या व्याख्या बदलल्या. ते मिळवण्याच्या  प्रवासात मानसिक पातळीवर काय काय घडते याबद्दल तो अनभिज्ञ असतो किंवा त्याकडे लक्ष देणे जरुरी वाटत नाही. सुखाच्या वस्तू पायाशी लोळण घेत असल्या तरी मानसिक स्वास्थ्य नसेल तर उपभोगातला आनंद कसा मिळणार?
 
बाहेरून माणूस कितीही शांत दिसत असला तरी आत काय चालले आहे हे कोणाला कळत नाही, कदाचित त्याला स्वतःलाही. मनावर असणारा सततचा ताण, चिडचिड, उत्साह न वाटणे हि मानसिक अस्वास्थ्याची प्राथमिक लक्षणे असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष न करता त्याचा स्वीकार करून काय काम करता येईल याचा योग्य वेळेत विचार केल्यास  पुढील पातळीवरील डिप्रेशन, anxiety किंवा व्यसन यापासून दूर राहणे शक्य आहे.  

यासाठी आपल्या भावनांशी मैत्री करायला शिकले पाहिजे. भावनांकडे लक्ष देणे, त्यांना अचूक नाव देणे आणि त्यांचा चांगला- वाईट असे लेबल न लावता स्वीकार करणे हे शिकले पाहिजे. सगळ्याच भावना गरजेच्या असतात. त्या व्यक्त कशा प्रकारे केल्या जातात हा भाग वेगळा. त्या दाबून टाकणे किंवा overreact होणे हे दोन्ही धोकादायकच. इतरांपेक्षा आपल्यासाठीच. सततची overreactive प्रवृत्ती आपली physiology काही अंशी बदलू शकते आणि दाबलेली भावना वाफेसारखी कधी कुठे बाहेर पडेल याचा नेम नाही. कधी कधी अगदी लहानपणी कळत नकळत दबल्या गेलेल्या अशा भावना तारुण्यात किंवा वृद्धापकाळातही डोके वर काढू शकतात - मानसिक किंवा शारीरिक आजाराच्या रूपात. 

आजूबाजूला काय घडते याचा तपशील आपण ठेवत असतो पण मनाच्या सागरात काय चालले आहे याचा पत्ताही नसतो. हिमनगाच्या पाण्याच्या खालच्या भागाची कल्पना आली नाही तर काय होते याचे 'Titanic' हे बोलके उदाहरण आहे.  

NOAM SHPANCER च्या मते मानसिक स्वास्थ्य हे अंतिम साध्य नाही तर ती एक प्रक्रिया आहे. तुम्ही कुठे चालला आहेत यापेक्षा कसे चालला आहात हे महत्वाचे आहे.

मग आजच्या दिवसाचे औचित्य साधून भावनांशी मैत्रीचा संकल्प  करू या, त्यांच्याविषयी सजगता बाळगू या  आणि एका मानसिक स्वस्थ जीवन प्रवासाची वाटचाल सुरु करू या.

वृंदा आंबेकर
Emotioal Intelligence Trainer
Mindfulness Therapist
Parenting Coach
emozance@gmail.com

Wednesday, 28 September 2022

Suspensions फार seruously घेऊ नका

"माझं गुगल प्रोफाईल सस्पेंड झालं. मी काहिच केलेलं नाहीये यार"
किंवा 
" फक्त पत्ता बदलला तर सस्पेंड ?"

वगैरे अर्थाचे अनेक मेसेज हल्ली येत असतात. त्याने लोक disturb होतात, आणि योग्यच आहे. Offline पेक्षा सुरुवातीला मिळणाऱ्या मोठ्या प्रतिसादाने आपण digital वर खूप काम करू लागतो आणि जास्त जास्त करू लागतो. त्यामूळे होतं असं

पण आता हे सर्व AI आधारित व्हायला लागलंय. म्हणजे COMPUTER च आपले प्रोफाईल, त्यात होत राहणाऱ्या घटना, वगैरे ठरवतो, आणि त्यानुसार काही विचित्र घडलं की आधी पुढचा अनर्थ टाळणारी कृती करतो ( त्याच्या दृष्टीने ).

म्हणजे AI कृत्रिम बुद्धिमत्ता.

हे समजून घेण्यासाठी ही बातमी कामाला येईल 

म्हणजे काय तर तुम्हाला अडचण आली तर support ला संपर्क करायचा आणि अडचण सोडवून घ्यायची. असे.

सर्वात आधी म्हणजे digital ला सर्वस्व मनायचे नाही. कारण त्याच्या scale up चा फायदा हवा असेल, तर चतुराईने काम करायचे. Digital हा सपोर्ट आहे. समजून घ्यायचं.

Tuesday, 13 September 2022

Execution चं असाधारण महत्त्व ....

 Compaq विरुद्ध Dell

ह्या दोन्ही कंपन्या संगणक क्षेत्रातील दादा कंपन्या. १९९० ते १९९८ मध्ये Compaq ने Mass Production मार्ग वापरून घवघवीत यश मिळविले, तर त्यानंतर Dell ने Inventory अगदी कुशलतेने म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा Orders करून खूप सुरेख यश मिळविले. ह्यात Dell ने प्रथम समजून घेतलं कि, संगणक क्षेत्रात जुन्या झालेल्या कोणत्याही Part चं मोल हे प्रचंड प्रमाणात घसरत जातं त्यामुळे हि Inventory कमीत कमी ठेवणे म्हणजे ग्राहक सुद्धा नव नवीन models ला आकृष्ट राहतो, शिवाय कोणताही माल पडून न राहिल्याने त्यात रक्कम अडकून बसत नाही. ह्याउलट Compaq ने मात्र Mass Production वापरून किंमत कमी ठेवायची ह्यावर भर दिला होता. ही पद्धत पूर्वी उपयुक्त व्हायची ती नव्या प्रकारे Lean Cash Flow ठेवताना अयशस्वी ठरली.

Dell ने अत्यंत कुशल असे Execution model वापरले. हे सोप्पे नाही, परंतु याला गत्यंतर देखील नाही.

अंमलबजावणी च महत्त्वाची 


आपल्या लहान लहान उद्योजकांच्या बाबतीत मला खूप वेळा असे लक्षात येते, की मंडळी "सेल" च्या इतके मागे लागलेले असतात कि त्यांच्या लक्षातच येत नाही कि अनेक छोट्या मोठ्या गोष्टी राहूनच गेल्या आहेत. दिखाऊ गोष्टी जास्त केल्या जातात आणि चिरकाल , स्थायी उपयुक्त गोष्टींकडे पाठ फिरविली जाते. परिणाम : आयुष्यभर "शिकार" करत बसावी लागते.

संपर्क सेतू Chatbot : छोटेसे उदाहरण 


आम्ही एक app विकतो. ज्याद्वारे Whatsapp चे Automation होते. म्हणजे काय , तर एखाद्याला आपल्या सेवा किंवा उत्पादनात अधिक रस असेल, तर त्याने अमुक एक अक्षरे किंवा क्रमांक पोस्ट केला कि आपोआप उत्तरे मिळतात. वरकरणी छोटेसे वाटणारे हे feature  प्रचंड उपयुक्त आहे. परंतु त्यात सुरुवातीला हे Chatbots Set Up करावे लागतात. ह्या कामाचा लोक कंटाळा करताना दिसतात.

ह्याविरुद्ध एकाच वेळी अनेक मेसेजेस पाठवणारी apps अधिक लोकप्रिय आहेत. का ? कारण ती अनेक लोकांना एकाच वेळी मेसेज सेंड करतात , वगैरे. अरे, पण जे तुमचा मेसेज पाहून येतात, त्याचं काय ? त्यांना तर हे Chatbots अधिक Engage करतील ना ? शिवाय एकदा आलेल्या माणसाला आपल्या कंपनीची माहिती देण्याची किती सुरेख संधी असते ही ! म्हणजेच एका प्रकारे Conversion into Customer ही शक्यता वाढीस लागत नाही का ? 

Execution चा आळस : प्रमुख कारण 

आळस म्हणू किंवा दृष्टी चा अभाव म्हणू, पण ह्या गोष्टी लोक करायला कचरतात. अशीच गोष्ट website बद्दल देखील पाहायला मिळते. तीच गोष्ट गुगल profile बद्दल, linked in profile बद्दल. लोकांना पोस्टिंग, Video , Photo वगैरे टाकण्याची इतकी उत्कंठा असते , कि हे जे खरं convert होणारं काम आहे, ते मागे पडून जातं. 

छोटी छोटी task , पूर्णत्त्वाला नेणे हे उत्तर 


Doctors ने दिलेल्या गोळ्या जशा एका वेळी एक ह्या प्रमाणात घेतो; तसेच ही कामे सुद्धा लहान लहान Dosages मध्येच घ्यावी म्हणजे एक एक part पूर्ण होत जातो. ह्याप्रमाणेच सर्व कामे एक टप्पा ठरवून केली तर छान पूर्ण होत जातात. Software मध्ये Version हा एक Concept असतो तसे आपण करू शकतो.