आपला व्यवसाय गुंतवणूक दराप्रमाणे पाहता यायलाच हवा.
यातला सर्वात पहिला निदर्शक म्हणजे नफा. आणि ROI. शिवाय हा काही काळानुसार मापायला हवा.
वेळोवेळी ( आदर्श स्थिती दर ३ महिन्यांनी ) आपल्या products, सेवा ह्यांचे मूल्यमापन करायला हवे, कोणत्या सुरू ठेवायच्या,कोणत्या मध्ये बदल करायचे, कोणत्या बंद करायच्या वगैरे.
नुकतेच वाचनात आले, की पेप्सिको ही कंपनी आता मध्यपूर्व, आफ्रिका तसेच दक्षिण आशिया ह्या विभागांत त्यांच्या Aquafina ह्या प्रॉडक्ट साठी आता rpet म्हणजे पून: चरित प्लास्टिक चा अधिकाधिक वापर करेल.ही झाली कृती. पण हे जरूर पहावे लागेल की ही कृती स्फुरली कुठून ?
प्लास्टिक चा वापर कमी करण्या विषयी उदात्त दृष्टिकोन असला तरीही अर्थकारण महत्त्वाचे ठरते. शिवाय पर्यायी व्यवस्था होईपर्यंत हळूहळू टप्प्या टप्प्याने हे होणे शक्य आहे. परंतु यात जर काम सुरू केलं नाही तर कंपनीचे esg मानांकन मात्र अजून घसरेल ह्यात शंकाच नाही.
ESG मानांकन काय आहे ह्याबद्दल सकाळ मध्ये एक विशेष लेख आला होता. आणि हे त्या त्या कंपन्यांचे रोखे बाजारातील स्थान बळकट किंवा कमजोर करण्यात खूप परिणामकारक ठरेल ह्यात वाद नाही. या आधाराने पेप्सीचे हे मूल्यांकन खूप खाली ( १६ chya आसपास) आहे. स्पर्धक कंपनी कोका कोला चे मध्यम आहे. तर मायक्रोसॉफ्ट चे उच्च ( > ७० ) आहे. तर इथून ही कृती स्फुरली असायची शक्यता नाकारता येत नाही.
आपल्यासाठी धडा असा की याचप्रमाणे आपणही आपल्या व्यवसायाचे सिंहावलोकन करतो का ? नसलो, तर करायला हवे. ह्याकरता आपण पूर्वी श्रीरंग गोखले सरांचे एक सेशन ठेवले होते ज्यात KRA आणि KPI ह्याबद्दल चर्चा केली गेली होती.
KRA म्हणजे परिणाम कुठे घडवून आणायचा आहे उदा. पदरात पडणारा पैसा. व्यवसायातील भाग. KPI म्हणजे हे नक्की दाखविणारे निदर्शक. म्हणजे नफा.
गोखले सरांचे कल्पकते चे दिवस हे पुरस्कार प्राप्त पुस्तक जरूर वाचा. मराठी मध्ये ह्या विषयावर असलेले कदाचित एकमेव पुस्तक असावे.
सुंदर उदाहरण दिले आहे. सिंहावलोकन करताना के आर ए आणि के पी आय उपयोगी पडतातच परंतु पुढची वाटचाल करतानाही त्यांचा उपयोग होतो. मी बॅलन्स स्कोर कार्ड मधल्या या तत्त्वाचे ट्रेनिंग अनेक लोकांना दिले परंतु त्याचा सर्वात उत्तम उपयोग सौमित्र सरांनी करून घेतला...
ReplyDelete