किंवा
" What Do You Do "
साधारण असंच प्रश्न विचारला जातो नवीन ओळख होताना. अगदी form वगैरेवर सुद्धा Occupation म्हणजे मिळालेली पोकळी तुम्ही कशी व्यापता असेच म्हटलेले असते. आपण व्यावसायिक ही स्वत:चा व्यवसाय करून म्हणजे कुणाला आपले skill महिनाभर भाड्याने देवून उपजीविका करीत नाही इतकेच. तरी ह्या वाटेवर खूप अडथळे येतात. शिवाय प्रयोग खूपच. घेतलेला प्रयोग, त्याची फलश्रुती होईस्तोवर सोडूनही देता येत नाही. आणि ह्या दरम्यान अनेक ( किंबहुना जास्तच ) अप्रिय कृतीच कराव्या लागतं राहतात.
कधी कधी "आता मी नाही बाबा ह्या नादाला लागणार" असे म्हणूनही आपण तीच चूक काही कालानंतर पुन्हा करतो, किंवा करत नाही. मुळात हळूहळू आपल्याकडे एक असा database तयार होतो, जो सांगतो आपल्याला की अमुक तुला suit होतं / अमुक नाही. हा स्वत: चा कप्पा असतो. पेच प्रसंगी ह्याला आपण रेफर करतो आणि निर्णय घेतो. क्वचित प्रसंगी कोणत्यातरी मोहाने आपण चुकीचा निर्णय पुन्हा घेतो, पुन्हा आपल्या reference database मध्ये भर पडते. हेच अनुभवाचे संचित.
तरीही मूळ पहिला मुद्दा पकडताना आपण व्यावसायिक मंडळींनी हे भान निश्चितच राखायला हवं की आयुष्य म्हणजे काही व्यवसाय आणि नफा-तोटा नाही. इतरही आहे. पण व्यावसायिकांना हे cutoff होताच येत नाही. Back of the Mind सतत चालूच राहतं.
म्हणजे काय, तर मार्ग ह्यातूनच जातो, तिथेच बदल करायला हवेत. म्हणजे काय ? तर at least कामांतून स्ट्रेस तरी कमी निर्माण व्हायला हवा. म्हणजेच असे सहकारी, systems तयार व्हायला हवे / हव्या कि माझं काम कमी - कमी होत जाईल.
म्हणूनच मी ( सध्या ) एक निर्णय घेतला आहे , तो म्हणजे जास्त संबंधांपेक्षा जास्त अर्थपूर्ण संबंध राखायचे. ह्याचा रस्ता सुरुवातीला जास्त संबंधांतूनच जाईल, तरी sort करून घ्यायलाच हवे. यात मी काही काही गोष्टी करायला लागलो आहे :
- उथळ पणा ला स्थान कमी देणे
- ग्राहकाची तयारी आधीच तपासून वेळ द्यायचा कि नाही हे ठरविणे
- कुणालाही Profile भारी वाटलं तरी अति महत्त्व न देणे
- शक्य असल्यास Zoom मिटींग्स करणे.
- कोणतीही नव कल्पना समोर आली तरी निदान ३ वर्षे तरी स्वत: बाजूला राहायचे.
- स्वत:चे Product Mix सुद्धा Freeze करायचे
- फक्त stable कंपन्या / softwares सोबत काम करायचे.
- जे करायचे नाही, त्यांना स्पष्टपणे नाही म्हणणे.
- ग्रुप मिटींग्स मध्ये Reactiveness कमी करणे.
सध्या निवडक उद्यमी वर आम्ही Automation बद्दल खूप बोलतोय, ह्या Automation चा प्रमुख हेतू हा आहे कि आपले काम उत्तरोत्तर कमी कमी होत जावे.
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.