व्यवसायाचा भाग म्हणून आपण reviews वगैरे मागतोच. तरीही अधून मधून काही अत्यंत समाधान देणारे क्षण येतात आणि आपला कामाचा उत्साह टिकून राहतो.
आजच आमचे एक ग्राहक श्री अडसूळ ह्यांनी मला एक पोस्ट पाठवली ज्यात त्यांनी आमचे ट्रेनिंग ३ जणांना नुसते सांगितलेच नाहीये, तर चक्क त्यांचे नंबर सुद्धा मला पाठवले.
मी "धन्यवाद" म्हणताच त्यांची प्रतिक्रिया अशी होती कि,
ज्या गोष्टी ते workshop मध्ये शिकले त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष रोज खूप leads मिळत आहेत, आणि हाच अनुभव ते त्यांच्या ग्रुप मधील इतर व्यावसायिकांना देवू इच्छित आहेतमहत्त्वाचं हे आहे यात , कि ही कृती सदर गृहस्थांनी जवळपास दोन महिन्यांनतर केलेली आहे. कधी कधी लगेच लोक भावनेत reviews वगैरे देतात. पण हे अगदी भरपूर वापर करून मगच आलेले आहे, त्यामुळे कर्माचे समाधान यातून मिळेत. त्याची गोडीच आगळी !
सर्वात महत्त्वाचं म्हणजे : आपल्या सेवांचे पैसे मिळणे हे आपल्यासाठी " उत्पन्न " आहे पण ग्राहकाच्या मात्र "खर्चातला" भाग असतो. हा खर्च ग्राहक कोठून करणार, तर त्याच्या उत्पन्नातून. हे त्याचं उत्पन्न वाढायला आपले उत्पादन किंवा सेवा मदत कशी करू शकेल हा विचार आपल्या व्यवसायाच्या केंद्रस्थानी सतत ठेवायला हवा !
वरील विचार अत्यंत योग्य आहेत
ReplyDelete