मला काही दिवसांपासून खूप stressed वाटत होतं. खोदून खोदून पाहिलं तरी विशेष कारण सापडत नव्हतं. इथे मानसिक आरोग्याची tools काही काळ उपयुक्त ठरली, पण औट घटकेचीच. कारण हे ओझे अगदी सतत आहे डोक्यावर असं Feeling येत होतं. मी NLP शिकलोय. त्यातून "भावना बदलून" पहिली, प्रारूपे बदलून. तरी हे कायम स्वरूपी ओझे काही साथ सोडेना.
आणि तो क्षण सापडला
Load नव्हे , तर Purpose आहे !
ज्याचं मला ओझं वाटत होतं, तोच तर हेतू आहे माझ्यासाठी कार्यरत राहण्याचा ! हे नसतं तर काहीतरी दुसरं केलं असतं ना ! ओशो ह्यांची एक-दोन जुनी व्याखाने आठवली .... ते म्हणतात : "मैं क्यूँ अशांत हूँ यही विचार मन को अस्वस्थ करता हैं , स्वीकार लें के मैं अशांत हूँ, तो अस्वस्थता गायब" असंच काहीसं झालं असावं.
बस त्या load चा विचार समोरचं काम करताना "हवं-नको" चं फिलिंग आणत होता. तो गायब झाल्या झाल्या मला कामात मजा येवू लागली परत. योगायोगाने रिक्षा बोलावली होती, ती अशी काय चकाचक होती, की बास रे बास. सभोवतालचा परिसर देखील एकदम छान भासायला लागला ....
अगदी असच काहीसं...माझ्या बाबतीत ही होतं आहे... अवेळी जाग येते... विचारांचा कल्लोळ माजतो...खूप स्ट्रेस येतो..अगदी घाम फुटतो...
ReplyDeleteआताही पहाटेचे साडेतीन वाजले आहेत....दोन वाजल्यापासून जागा आहे.... सौमित्र आपण यावर बोलूयात का... कारण काही गोष्टी शब्दातीत ..... असतात