Monday, 28 February 2022
गुगल हे सर्वस्व : धोकादायक गैरसमज
Saturday, 26 February 2022
निश्चित व्यवसायाकडे वाटचाल ....
Friday, 25 February 2022
जे चमकतं तेच फक्त सोनं नसतं ....
Thursday, 24 February 2022
BNI चा funda कदाचित हाच असेल ...
Reviews चा खरा उद्देश
Wednesday, 23 February 2022
"करोडपती" चा हुक ........
Monday, 14 February 2022
Story telling ...आवश्यक कौशल्य !
Saturday, 12 February 2022
सरसकट Downloads का बरं नाहीत ?
टीम फेरीस ह्या लेखकाचं एक पुस्तक *The 4-Hour Work Week यात मार्केटिंग ची एक tact तो सांगतो : Life-Time Support Free असं म्हटलं , की एकदम Value वाढते. आणि विक्री सुद्धा. खरोखरच तुम्हाला आयुष्यभर एखाद्या विषयावरचे प्रश्न सोडविता आले ( मी water तसेच डिजिटल चे सोडवितो ) तर उत्तमच आहे. सेल वाढो अथवा न वाढो, एक "Give" म्हणून हे उत्तमच आहे !
तरी सर्वच बाबतीत हे नको वाटतं. उदा. झूम recordings. बऱ्याचदा "ऐकेन कधीतरी" म्हणून नुसतं सडत बसतं मटेरीअल. त्यामुळे आता बऱ्याच वेळेला "फक्त पाहायला" तेही ३ एक दिवस अशी मी policy केली आहे. ज्या मंडळींना खरेच रस आहे तीच येतील. अशा पद्धतीने माझ्या विषयात रस असणारे लोक फिल्टर होत जातात, शिवाय नक्की लोकांना विषय भाव्तोय कि नाही हे सुद्धा कळत.
* सदर लिंक amazon वरील ह्या पुस्तकाच्या "Buy" ला जाते.
Friday, 11 February 2022
इमेल न्यूज लेटर : अर्थपूर्ण कंटेंट वितरणा करिता ....
मागे एका *पोस्ट द्वारे मी Automation Tools च्या अतिवापराने होणारे दुष्परिणाम ह्याबद्दल बोललो होतो. वारंवार अनुभव येऊन सुद्धा आपण ह्यांना कधी हुक होऊ हे सांगता नाही येत.
आता काय; सगळे whatsapp वरच असतात ना ! अशा उथळ विचाराचा आधार घेऊन मी **संपर्क-सेतू नामक नवीन tool द्वारे whatsapp newsletter तयार केले आणि माझ्या जुन्या-फिन्या, संपर्कात असणाऱ्या/नसणाऱ्या मंडळींना सुद्धा ते पाठवायला सुरुवात केली आणि परिणामी माझा नंबर whatsapp ने लागोपाठ दोन दिवस, दोनदा ban केलेला होता. ह्यामुळे सुरु झाला माझा उलटा प्रवास, कि हे का होत असेल ?
हे realize झालं ...
- सगळे whatsapp वर असतात (हे कुणी सांगितलं मुळात ?) .... हे सगळे मला नक्की हवेत का ?
- सगळ्यांना माझा कंटेंट का बरं आवडावा ?
- कित्येक मंडळींच्या मी विस्मरणात सुद्धा गेलो असेन !
- Whatsapp मध्ये खूप लिंक्स टाकायच्या नाहीत
- Whatsapp मध्ये फक्त block असतं ; unsubscribe नाही, इथूनच लोक report करतात
- ** संपर्क सेतू मधील chat-bot हे उपयुक्त आहे ते वापरायचं
- ***न्यूज लेटर हा सशक्त पर्याय होऊ शकेल
- इमेल हे कदाचित कमी वापरलं जात असेल, किंवा स्पॅम मधून वगैरे शोधावं लागत असेल; हे फक्त तीच मंडळी करतील, ज्यांना खराखुरा रस आहे !
- न्यूज लेटर चा subscribe form असेल, जो मी फक्त relevant ग्रुप्स तसेच whatsapp status ला ठेवेन त्यातल्या त्यात !
==================================
Footnotes
* https://nupune.blogspot.com/2022/01/tools.html
** Joy Web ही संपर्क-सेतू ची channel partner आहे. लिंक क्लिक करून काही purchase केल्यास joy ला अर्थार्जन होते. ह्या आधी किंवा नंतरही सल्ल्यासाठी स्वागत.
*** http://eepurl.com/hTptNT