Thursday, 30 December 2021
कामावर फोकस
Wednesday, 29 December 2021
प्रेरणा हरवली आहे ? एक फोन : कात्रे ह्यांना : बस्स !
हे "चितळे बंधू" आहेत बरं !
Sunday, 26 December 2021
प्रत्येकाचा "segment" निराळा .....
आजच घडलेले 2 प्रसंग :-
प्रसंग १ : आमच्या बिझनेस नेट्वर्किंग क्लब मधील एक चर्चा
" खूपच कच्चे आहेत यार आपले मेम्बर्स "
" असं कसं , इतकं कसं कळत नाही यार ! "
" अमुक-अमुक सारखं व्हायचं तर खूपच पल्ला गाठायला लागेल "
प्रसंग २ : फोन वरील एक चर्चा, विषय : आंतरराष्ट्रीय प्रदर्शन
Segmentation : एक सुटसुटीत तंत्र !
चला, एक उदाहरण घेऊ : माझंच !
एकदा का हे कळलं कि आतली मळमळ बंद व्हायला हवी !
Friday, 24 December 2021
व्यवसायावर आधारित Genuine चित्रपटांचं दुर्भिक्ष्य
आम्ही निऊ च्या मीटिंग साठी एक आठवडाभर जंग जंग पछाडल तरी "मेड इन चायना" "गुरु" "बदमाश कंपनी" "हरीश्चन्द्राची factory" ह्यापलीकडे गाडीच जाईना ! इंग्रजीतही फार नाहीत काही. तरी त्यातल्या त्यात आम्ही Rocket Sing निवडला ह्यावेळी चर्चेला.
रेकॉर्डेड मीटिंग पाहता येण्यासाठी लिंक : https://www.facebook.com/795309869/videos/346318493520370/
निऊ चा फेसबुक ग्रुप विनामुल्य असतो, त्याची लिंक :- https://www.facebook.com/groups/nupune/
व्यवसाय म्हणजे "मनोरंजन नाहीच" असं कसं समजतात कुणास ठाऊक ? म्हणजे ती लफडी, प्रेम-फिम, डान्स, कमी कपड्यातील अभिनेत्र्या, झाडांमागे पळापळी हे हवच का ? कधी जाणार याच्या पल्याड, कुणास ठाऊक !
Thursday, 23 December 2021
Franchise देण्याची घाई ...
B2C हे न टाळता येणारे मॉडेल
Wednesday, 22 December 2021
जीर्णोद्धार अर्थात व्यावसायिक Model पुनर्विकसन
Saturday, 18 December 2021
माय बिझनेस चे Attributes
प्रसंगानुरूप पोस्टिंग !
ह्यांना गुगल वर add करता येत नाही !
Friday, 17 December 2021
तुमचं वेगळेपण...
Wednesday, 15 December 2021
अधिक शक्तिशाली असे लोकल मार्केटिंग
कोविड पश्चात घडलेली प्रमुख गोष्ट म्हणजे : लोकल चं समजून आलेलं महत्त्व ! आता बिल्डर्स सुद्धा हे छान वापरू लागले आहेत : एक होर्डिंग सध्या मी पाहतोय सेनादत्त पोलीस चौकी पाशी :-
True Caller Premium : खरंच आहे का उपयुक्त ?
True Caller ही App बरीच मंडळी वापरतात. छानच आहे. त्यात एक premium version असतं. त्याबद्दल जरा विस्तृत चर्चा झाली होती, मराठी connect च्या मीटिंग पश्चात. त्याचं बद्दल हे पुढे थोडं.
- Who Viewed My Profile : हे चांगलं आहे
- More Contact Requests : साधारण 30 request पाठवता येतील महिन्याला
- premium Badge : आपला call घेण्याची शक्यता वाढते.
Saturday, 11 December 2021
दुसऱ्या वर्षपूर्ती च्या निमित्ताने ....
आज ११ डिसेंबर २०२१ , अर्थात "निवडक उद्यमि"चे दुसरे वर्ष संपले. त्यानिमित्ताने हे अगदी मुक्त विचारमंथन. काहीही न योजून केलेले. कोणताही ठराविक परिणाम न अपेक्षिता केलेले. त्यातून माझे कच्चे-पक्के दुवे देखील उघडे पडतील कदाचित. पण म्हटलं ना ... कोणताही "अमुक एक परिणाम न अपेक्षिता केलेले" ...!
खरं तर निऊ सुरु करताना बिझनेस नेट्वर्किंग मधले व्यावसायिक मेम्बर्सच डोळ्यासमोर होते. त्यांचं ( त्यात मीही आलोच ) ते थोडसं उथळ वागणं, कधी कधी अती स्वार्थी होत आपल्यापुरता विचार करणं तर कधी अधिकार-लालसेपोटी अंध होणं, कधी गटबाजी तर कधी प्रांतवादी होणं वगैरे अनेक कंगोरे लक्षात आले, येत राहतात.
वाटत राहतं ... "ये तो धंदा नहीं है boss". जास्त खोल जाऊन, अधिक प्रगल्भ विचार करत राहून एक दीर्घ पल्ल्याची उपाय-योजना करता येईल का काही ! हाच विचार करता करता अनेक व्यक्तींशी संबंध येत गेला, आणि मग अचानक पणे एक गोष्ट लक्षात आली... की अरे... शिकायला काहीच लागणार नाही ! एक यु ट्यूब Video भी काफी है यार !
एकलव्य चा जन्म !
ह्या वर्षातली माझ्यासाठी खूपच मोठी उपलब्धी म्हणता येईल ही. म्हणजे आपण प्रत्येक मीटिंग ला निवडून निवडून Video आणतो, त्यातले जे Speaker असतात, ते होतात आपले द्रोणाचार्य ! हा सगळा मामला अगदी विनामुल्य ! कित्ती भारी. ना तो speaker शोध , ना त्याला आवश्यक असा प्रेक्षक गोळा करा ना अजून काही ! मला तर हे खूप म्हणजे खूपच भारी वाटतं.
कारण मला मुळात उगाचच Crowd नकोच आहे. ग्रुप ची निष्कारण संख्या वाढविणे, मग ते पीच करत राहणे, मग त्या physical मिटींगा, फोलच आहे असं मला वाटू लागलंय आता. त्यापेक्षा ज्यांना वाटतं त्यांनी भेटावं खुश्शाल !
फेसबुक live आहेच कि शिवाय !
फेसबुक ने इतकी मस्त सोय करून ठेवलीये, कुणालाही पाहता येतं ! ग्रुप जॉईन व्हायचं बंधन नाही ! किती मस्त आहे. ज्यांना हवं ते येतात आत, बाकीचे बांधावर !
येते काही महिने तरी हाच राहील आपला परिपाठ
म्हणजे एक सत्र एकलव्य , एक सत्र ओळखी आणि बाकी गप्पा असंच ठेवू schedule मिटींग्स चं. आता ग्रुप पोस्ट सुद्धा बदलाव्या म्हणतो ! पाहूया.