Sunday, 23 April 2023
श्रेय बीय इत्यादी......
Thursday, 13 April 2023
शब्द स्वामित्त्व : सर्वात प्रभावी कौशल्य !
An Image can tell what 100 words can say
Video is the most popular media toay
Podcast is getting more & more popular
अशी वाक्य सतत कानावर पडत असतात. शिवाय तो Mehrabian आहेच साथीला, जो म्हणतो की शब्द हे फक्त ७ % उपयोगी ठरतात समोरच्यावर प्रभाव पाडायला.
ह्या सर्वाने काय व्हायला लागत... कि आपण शब्द संपत्ती ला दुय्यम समजायला लागतो. शब्द आणि तेही मायबोलीतील, हे अधिक भिडतात ही गोष्ट वादातीत आहे. जर आपण आपला स्वत:चा असा विचार सर्वात आधी ग्राह्य धरला तर.
नुकतेच एका सरकारी कार्यालयात भेट द्यायचा प्रसंग उद्भवला. एका टेंडर संदर्भात त्यांना काही माहिती द्यायची होती. माझे सर्व म्हणजे बऱ्या पैकी काम मायबोलीत चालतं. (हा मी एखाद्याला कनेक्ट व्हायचा सर्वात जवळचा सेतू )
तर तिथले कर्मचारी व उपस्थित व्यक्ती अगदी अभिमानाने " हे इंग्रजीतले शब्द मराठीत आणणे हा कसा मूर्खपणा सुरु आहे " ह्या आविर्भावाने काम करीत होते. एक व्यक्ती- जी प्रत्यक्ष संगणकात मजकूर टाकत होती - त्यांना अनेक मराठी प्रतिशब्द अगदी छान अवगत असलेले दिसत होते, त्यांनी Minutes of Meeting साठी एक सोप्पा, सुरेख, तत्काळ समजून येणारा मराठी शब्द सुचविला : "इतिवृत्त". Minutes of Meeting ह्या शब्दावरून माझ्या मनात अगदी पहिल्यापासून गोंधळच जास्त व्हायचे. कार्यालयांमध्ये रुजलेला हा बोअर शब्द. इतिवृत्त ला काय Problem आहे यार ! कमालीचा त्रास आणि अनादर दिसत होता मंडळींच्या चेहऱ्यांवर. असो.
मुद्दा असा ...की कितीही उदो उदो केला Videos, Images, Audios चा; तरी शोधायला Filters लावले जातात ते शब्दांचेच. त्यानेच आपला शोध सोप्पा, नेमका होतो.
माझं तर म्हणणं असं .. कि कमीत कमी शब्दांत मला सांगता यायला हव काय म्हणायचं ते ... म्हणजे ते जो शोधात असणाऱ्याच्या हातात चटदिशी पडेल. व्यवसायाचा देखील उद्देश तर हाच असतो ना ?
अगदी Chat GPT ने तुम्हाला तुमच्यासाठी हा आशय स्वरूपातील मजकूर झटक्यात दिला, तरी त्याला काय द्यायला सांगायचं हे नेमक्या शब्दांतच सांगावं लागतं ना ! कसं वाढवायचं हे कौशल्य ? तर ऐकून, वाचून. स्वत: स्वत:चं विकायची घाई न करता. तसेच वेळोवेळी कागदांवर टिपून, टिपत राहून, पुन्हा संदर्भ वापरत राहून.
हे कागदांवर किंवा डायरीवर घेवू शकलात तर खूपच छान. अगदी नाईलाज झाला तरच mobile. टिपून घेणे हे कागदावरच सोपं पडतं. परवा डिजिटल चं कौतुक करताना एक व्यक्ती ने मला त्यांचे असेच कार्ड पाठवले. मी मात्र माझे physical कार्ड चटदिशी त्यांच्या हातात थमविले. त्यांनी ते पाहिले शिवाय काहीतरी नोट सुद्धा केले. हे कुठे करणार डिजिटल कार्डवर ? तर मिळालेल्या, गोळा केलेल्या माहितीवर काम करायला सुद्धा पुन्हा शब्द सामग्रीच लागते. त्यामुळे हे स्वामित्त्व लवकर प्राप्त करणे श्रेयस्कर !
Saturday, 8 April 2023
काल attend केलेली ३ सेशन्स ...
कधी कधी छान सेशन्स attend करायचा योग येतो. असाच आला काल.
१. Chat GPT ह्या बहुचर्चित विषयावर Enjay IT systems चे CEO लीमेश पारेख ह्यांनी खूप छान टिप्स दिल्या. अगदी सर्व सामान्य विषयांसाठी हे टूल न वापरता अधिक चांगल्या पद्धतीने स्वत: च्या व्यवसाय केंद्रित कसे करता येईल ह्याचा हा एक छान डेमो होता. सोबतच लीमेश सर हे इतर मुद्देही सहज प्रवाहीपणे मांडतात. जरूर ऐका. ह्या सेशन ची Youtube Link :- https://youtu.be/tassf58YpoI
२. काल "Digitization for Smart Manufacturing" वर एक कार्यक्रम होता. वक्ते, डॉ. अरविंद टिळक हे ह्या क्षेत्रात अनेक वर्षे अनुभवी होतेच, शिवाय त्यांनी दिलेले काही काही संदर्भ, दाखले आणि काही विचार हे खूप चांगले होते. उदाहरणार्थ त्यांनी मांडलेला एक विचार म्हणजे : Costing मध्ये न घेतला जाणारा विषय : एखादा तास मशीन बंद राहिले तर बुडणारे उत्पन्न आणि ह्याला पूरक म्हणजे : इथे जर Smart Digitization ची काही तंत्रे वापरली तर होऊ शकणारा परिणामकारक बदल... हा अगदी नवा विचार होता माझ्याकरिता. हा सेशन प्रत्यक्ष होता. PMA च्या सभागृहात. श्री टिळक ह्यांच्या websites वर अधिक माहिती मिळूच शकेल :- https://aiplindia.com/
३. नव्या आर्थिक वर्षाचे नियोजन ह्या विषयावर निवडक उद्यमी च्या साप्ताहिक मीटिंग मध्ये श्री राहुल पोरे ह्यांनी एक सेशन घेतले. स्वत: CMA ह्या नात्याने कार्यरत असणारे पोरे सर ह्यांचे सेशन उत्कृष्ट झाले. हे झूम वर होते. ह्या सेशन ची लिंक :- https://youtu.be/qia6H6O25gs
Sunday, 19 March 2023
मला काम "करावेसे" वाटत आहे का ?
एका लहानशा, तुमच्या माझ्या सारख्या व्यावसायिकाला त्याच्या व्यवसायात करायच्या कामाचे प्रमुख ३ भाग असतात
- जे काही आपण ग्रहण करणाऱ्या ला म्हणजे ग्राहकाला देत असतो ते देणे व ह्या देवून हस्तांतरित करावयाच्या प्रक्रियेत समाविष्ट असलेली विविध / सर्व कामे. ह्याला सोप्पे करण्यासाठी आपण "धंदा चालवणे" म्हणू.
- दुसरे म्हणजे हा व्यवसाय मिळावा म्हणून करत असणारी कामे. ह्याला "धंदा मिळवणे" म्हणू.
- तिसरे म्हणजे ही सर्व कामे सुरळीत चालण्यासाठी करायची कामे. ह्याला "प्रशासन" हा शब्द योग्य वाटतो.
मिळवणे - चालवणे - प्रशासन. अगदी कोणत्याही धंद्यात हीच त्रिसूत्री येईल कामाला.
ब्रम्हा=मिळवणे विष्णू=प्रशासन महेश=चालवणे. ही तीनही कामे थोड्या थोड्या प्रमाणात व्यावसायिकाच्या आयुष्याचा भाग असतातच. कमी जास्त फरकाने काही आवडते, जास्त आवडते, आवडत नाही, वगैरे. परंतु करणे प्राप्तच असते. हे सातत्यानेही करावे लागते. इथे जरा गडबड होऊ शकते. आणि धार-सोड होऊ शकते. हे कसे टाळायचे ?
काम आवडून घ्यावे लागते
Monday, 13 March 2023
व्यावसायिक Category : मोठ्ठा विषय
बिझनेस नेटवर्क मध्ये जॉईन होताना कोणती Category घ्यायची ?
- सर्वात आधी : लगेच जॉईन होऊ नका. अगदी संधी हातातून चालली आहे असा भास निर्माण झाला तरीही. क्या खाना, तो दम खाना. जगात अनेक नेटवर्क आहेत. काळजी नसावी.
- तुमचा प्रमुख धंदा देत असलेल्या व्यवसायाची Category जर तिथे उपलब्ध असेल, तरच ती निवडा. उदा. आपण जर Certified Financial Planner असाल, आणि हेच तुमच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन असेल, आणि सदर ग्रुप मध्ये ह्याच Category मध्ये कुणी हजर असेल, तर उगाच Financial Coach वगैरे Category घेवू नये. सदर ग्रुप चे नेते वगैरे मागे लागले तरीही.
- जर अशी Category तिथे उपलब्ध असेल, तर इतर सर्व Factors पाहून जॉईन होवूच शकता. तरीही एक लक्षात असू द्या : की पुढे ह्या इतर Category हा प्रमुख व्यवसाय असणारे किंवा नसणारे उद्योजक देखील Join होवूच शकतात.
- सदर ग्रुप चे Leaders किंवा नेते ह्यांना मेम्बर संख्या वाढविणे हे प्रमुख उद्दिष्ट दिलेले असते. ते गाठले की छोटी छोटी कौतुके होत असतात. ही लोकांना फार प्रिय असतात. आपल्या ग्रुप मेम्बर चा प्रत्यक्ष व्यवसाय वाढविणे ह्याकडे दुर्लक्ष होत असते, राहते. त्यामुळे तुमच्या व्यवसाय मिळण्याच्या प्रक्रियेला विलंब लागू शकतो हे ध्यानात राहू द्या. शिवाय हे काही समाजाचे नेते वगैरे नसतात. तर त्या ग्रुप चे नेते असतात. त्या ग्रुप मध्ये थोडे जास्त चांगले.
- हे क्लब किंवा नेटवर्क चालविणाऱ्या संस्था देखील ह्या ग्रुप्स मध्ये स्पर्धा लावत असतात. उद्दिष्ट ? चांगलेच. की प्रत्येक ग्रुप ने स्वत: हून प्रयत्नपूर्वक व्यवसाय वाढ करावी, ग्रुप मेम्बर्स ना जोडीला घेवून. वापरायचा विवेक प्रत्येक ग्रुप leader ठेवेलच असे नाही.
- तुम्ही जर leader असाल तर मात्र नीट पाहून, पारखून घ्यायला हवे.
Friday, 10 March 2023
प्रत्येक काम महत्त्वाचेच ....
माझ्याकडे सध्या एक जरा चांगली संधी निर्माण झाली आहे... म्हणजे त्यातून काहीतरी चांगले, व्यवसायात जरा घवघवीत परिणाम मिळवून देणारी अशी एक घटना घडत आहे. पुन्हा ह्यात हो/नाही आहेच.
"तू जरा जास्तच न होत असलेली किंवा साशंक बाजू बघत आहेस " असा विचार एका जवळच्या व्यक्तीने मांडला.
हा एक लोकप्रिय गैरसमज आहे. माझ्या बाबत नव्हे, तर एकंदरीतच.
अनुभवाधारित, सारासार विचार करणे; हे योग्यच आहे नाही का ? पूर्वी मला अशा संधींच्या बाबत अनुभव असेल, तो गाठीला धरून निर्णय घेणे आणि कोणत्याही परिस्थितीत अयोग्य अशा काहीही Commitments न देणे ह्याला जर महत्त्व देवून विचार केला तर तो योग्यच आहे; निदान माझ्या पुरता तरी.
माझे व्यावसायिक आणि पर्यायाने सारासार आयुष्य कमीतकमी गुंतागुंतीचे रहावे व मला माझ्या हातातल्या प्रत्यक्ष कामावर अधिकाधिक लक्ष देवून ते ग्राहकासाठी जास्त सुयोग्य कसे राहील, इथे माझा प्रमुख विचार असायला हवा.
तर वरील घटनेच्या संदर्भात होत असं होतं, की मी त्याला अवास्तव (हो, अवास्तवच !) महत्त्व देत होतो, त्यामुळे त्यातील प्रत्यक्ष कामाचा वेळ वगळून उरलेल्या वेळातही स्वप्न रंजन किंवा इतर समांतर विचार वगैरे करत बसलो होतो. नशीब वेळीच डोके ठिकाणावर आले. तेही एक वेगळीच घटना आठवल्याने ....
परचुरे शास्त्री नामक व्यक्तीस समाजाने फक्त त्याला महारोग झाला म्हणून वाळीत टाकले होते. परिणामी त्यांच्या जखमा, त्याची मलमपट्टी हा विषय तर बादच. महात्मा गांधी ह्यांनी त्यांना सेवाग्राम येथे आणले व स्वत: त्यांची रुग्णसेवा केली. हा विचार आजच्या "आनंदवन" च्या मुळाशी आहे. ज्यामुळे बाबा आमटे प्रेरित झाले.
हे सुरु असतानाच देशाच्या भविष्याला कलाटणी देणारा १९४२ चा चले-जाव संग्राम, त्याची रणनीती वगैरे खलबते, तसेच योजना प्रत्यक्ष सेवा ग्रामात सुरूच होत्या. नेहरू वगैरे सर्व मोठे नेते तेथे तळ ठोकून होते. किती खलबते सुरु असतील, कल्पना केलेलीच बरी.
अशाही परिस्थितीत गांधीजी मध्येच उठून जात. अगदी High Voltage मीटिंग असेल तरीही.... "मला शास्त्रींच्या जखमा धुवायची वेळ चुकवायची नाही" असा विचार ठेवून.
हातातले प्रत्येक काम तितकेच महत्त्वाचे आणि एक "सध्या बाजूला ठेवू" हा विचार माझ्या मनातून कायमचा खोडला गेला ह्या प्रसंगामुळे.
आणि परिणाम म्हणाल ? तर चलेजाव सुद्धा लक्ष्यभेदी ठरले तसेच रुग्णसेवा देखील. कारण बाबांनी हि कुटी पाहूनच तर प्रेरणा घेतली !
Wednesday, 1 March 2023
फक्त repurpose करा ......
कालच एका सह व्यावसायिकाशी 1-2-1 करत होतो. तो मराठीच आहे, शिवाय त्याचा खास महाराष्ट्रीय पदार्थ तयार करण्याचा महाराष्ट्राबाहेर व्यवसाय आहे. हे पदार्थ फक्त एकाच सणा पुरते ते तयार करतात तेही वर्षात एकाच Season पुरते. तरी हे विक्री करण्यासाठी त्यांनी एक लहानसे दुकान भाड्याने घेतले आहे, जे ते वर्षभर ठेवतात. कारण हा सर्व माल त्यांना तयार करायचा असतो, शिवाय विकायचा देखील असतो.
त्यांचा सदर व्यवसाय जवळपास १० ते ११ वर्षे आहे, व अत्यंत Loyal असा ग्राहक वर्गदेखील आहे.
गेल्या सणासुदीला त्यांनी बऱ्यापैकी विक्री केली, तसेच आता कोविड पश्चात बाजार खुला झाल्याने त्यांना गेल्या तुलनेत जवळपास दीडपट विक्रीची अपेक्षा आहे. त्यामुळे ते तात्पुरते ३ महिन्या करिता जवळपासच एखादे दुकान शोधात आहेत. असा सर्व विषय सुरु होता.
मी त्यांना सुचविले, कि मुख्य दुकानात फक्त प्रमुख Category तील एक-दोन प्रकार ठेवा, उरलेले online किंवा एखादा TV Set. ज्यावर निवड करता येईल. मग अतिरिक्त Stock थेट तयार करण्याच्या जागेवरून पाठवता येईल ( मग तो कुठेही असेना का ! ) शिवाय ह्या मुळे, तुम्ही तुमच्या शहराबाहेर सुद्धा विक्री करू शकाल. हे एक नवीन module उभे राहील.
ह्याचं डिजिटल मार्केटिंग करायचा सर्वात स्वस्त आणि नेमका उपाय म्हणजे फेसबुक Live करून विविध दिवशी विविध पदार्थ दाखविणे, शिवाय प्रोमो ऑफर्स देणे.
हे व्यावसायिक जोडीने असेच खाद्य पदार्थ तयार करण्याच्या किंवा इतर कार्यशाळा देखील घेतात. कारण, अर्थात इतर वर्षभर काय करणार ? तर मी त्यांना असे सुचविले , कि ते ठराविक पदार्थ देणे इतकाच तुमचा scope नसून त्या अमराठी शहरात मराठी सणासुदीच्या विविध प्रसंगाना विविध वस्तू मराठी लोकांना पुरविणे हा तुमचा व्यवसाय समजलात , तर विविध लोकांशी संधान बांधून जे तुमचे तयार मार्केट , ग्राहक आहेत त्यांनाच पुन्हा पुन्हा कमी कष्टांत विक्री करू शकाल, शिवाय वर्षभर !
आपल्या कॅश फ्लो कडे एक नजर टाका, तुम्हालाच तुमची उत्तरे सापडतील !