Wednesday, 22 June 2022

उत्तरोत्तर काम कमी होत जायला हवं ना !

"काय करता आपण ?" 

किंवा 

" What Do You Do " 

साधारण असंच प्रश्न विचारला जातो नवीन ओळख होताना. अगदी form वगैरेवर सुद्धा Occupation म्हणजे मिळालेली पोकळी तुम्ही कशी व्यापता असेच म्हटलेले असते. आपण व्यावसायिक ही स्वत:चा व्यवसाय करून म्हणजे कुणाला आपले skill महिनाभर भाड्याने देवून उपजीविका करीत नाही इतकेच. तरी ह्या वाटेवर खूप अडथळे येतात. शिवाय प्रयोग खूपच. घेतलेला प्रयोग, त्याची फलश्रुती होईस्तोवर सोडूनही देता येत नाही. आणि ह्या दरम्यान अनेक ( किंबहुना जास्तच ) अप्रिय कृतीच कराव्या लागतं राहतात. 

कधी कधी "आता मी नाही बाबा ह्या नादाला लागणार" असे म्हणूनही आपण तीच चूक काही कालानंतर पुन्हा करतो, किंवा करत नाही. मुळात हळूहळू आपल्याकडे एक असा database तयार होतो, जो सांगतो आपल्याला की अमुक तुला suit होतं / अमुक नाही. हा स्वत: चा कप्पा असतो. पेच प्रसंगी ह्याला आपण रेफर करतो आणि निर्णय घेतो. क्वचित प्रसंगी कोणत्यातरी मोहाने आपण चुकीचा निर्णय पुन्हा घेतो, पुन्हा आपल्या reference database मध्ये भर पडते. हेच अनुभवाचे संचित.

तरीही मूळ पहिला मुद्दा पकडताना आपण व्यावसायिक मंडळींनी हे भान निश्चितच राखायला हवं की आयुष्य म्हणजे काही व्यवसाय आणि नफा-तोटा नाही. इतरही आहे. पण व्यावसायिकांना हे cutoff होताच येत नाही. Back of the Mind सतत चालूच राहतं. 

म्हणजे काय, तर मार्ग ह्यातूनच जातो, तिथेच बदल करायला हवेत. म्हणजे काय ? तर at least कामांतून स्ट्रेस तरी कमी निर्माण व्हायला हवा. म्हणजेच असे सहकारी, systems तयार व्हायला हवे / हव्या कि माझं काम कमी - कमी होत जाईल. 

म्हणूनच मी ( सध्या ) एक निर्णय घेतला आहे , तो म्हणजे जास्त संबंधांपेक्षा जास्त अर्थपूर्ण संबंध राखायचे. ह्याचा रस्ता सुरुवातीला जास्त संबंधांतूनच जाईल, तरी sort करून घ्यायलाच हवे. यात मी काही काही गोष्टी करायला लागलो आहे :
  • उथळ पणा ला स्थान कमी देणे
  • ग्राहकाची तयारी आधीच तपासून वेळ द्यायचा कि नाही हे ठरविणे 
  • कुणालाही Profile भारी वाटलं तरी अति महत्त्व न देणे 
  • शक्य असल्यास Zoom मिटींग्स करणे. 
  • कोणतीही नव कल्पना समोर आली तरी निदान ३ वर्षे तरी स्वत: बाजूला राहायचे.
  • स्वत:चे Product Mix सुद्धा Freeze करायचे 
  • फक्त stable कंपन्या / softwares सोबत काम करायचे.
  • जे करायचे नाही, त्यांना स्पष्टपणे नाही  म्हणणे.
  • ग्रुप मिटींग्स मध्ये Reactiveness कमी करणे.
सध्या निवडक उद्यमी वर आम्ही Automation बद्दल खूप बोलतोय, ह्या Automation चा प्रमुख हेतू हा आहे कि आपले काम उत्तरोत्तर कमी कमी होत जावे.

Tuesday, 21 June 2022

Google My Business नव्हे; तर Google Business Profile

नुकताच मी GMB म्हणजेच Google My Business बद्दल एक webinar attend केला. त्यात मिळालेली मौल्यवान, अद्ययावत माहिती Share करतोय :-

  1. आता google my business नाही म्हणायचं , तर Google Business Profile असं म्हटलं जाईल.
  2. Up-To-Date असलेली Profiles ही जवळपास 2.7 पट अधिक भरवशाची समजली जातात. हे Up-to-Date व गुगल च्या धोरणानुसार Compliable ठेवणारया मंडळीना अर्थात जास्त धंदा मिळेल.
  3. तुमच्या व्यवसायाला जर का Physical Location असेल, तरच ते Google Maps वर दिसणार.
  4. Brands , कलाकार, संस्था तसेच इतर असे व्यवसाय जे फक्त Online च काम करतात, ते Google Business Profile साठी पात्र ठरत नाहीत.
  5. पात्र असलेल्या व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांशी सांगितलेल्या बिझनेस hours मध्ये वैयक्तिक संपर्कात रहावेच लागेल.
  6. अपात्र असलेले व्यवसाय : online फक्त , तसेच आपल्या मालकीच्या नसलेल्या किंवा भाडे-करार नसलेल्या ठिकाणी आपण काही काम करत असाल उदा क्लासेस घेणे, मिटींग्स करणे वगैरे तर हे पात्र नाही. Co-Working places पात्र ठरत नाहीत.
  7. काही व्यवसाय उदा. केटरिंग सेवा, पेंटिंग व्यवसाय, प्लंबर सेवा वगैरेंचे स्वत:चे लोकेशन नसते, तर ते ग्राहकाच्या दारात जाऊन सेवा देतात, असे व्यवसाय Service Area Business म्हणून गणले जातात. 
  8. असे SAB's हे स्वत:चे लोकेशन टाकू शकत नाहीत. बहुतेक Home based Businesses ह्या प्रकारात मोडतात. हे गुगल maps वर दिसत नाहीत, परंतु google search मध्ये दिसू शकतात. तुमचा व्यवसाय अशा प्रकारे जर setup केलेला असेल, तर त्यावरून प्रत्यक्ष पत्ता काढून टाका परंतु Service Areas मात्र शाबूत ठेवा. 
  9. काही व्यवसायांचे Hybrid Model असते. उदा. एखादे उपहारगृह. असे उपहारगृह ह्या दोन्ही सुविधांचा उपयोग करून घेऊ शकते. परंतु दिलेल्या व्यावसायिक वेळांत त्यांच्याकडे कर्मचारी वर्ग तसेच व्यवसायाची कायम स्वरूपी फिट केलेली पाटी दर्शनी भागात असायला हवी. असायला हवी.
  10. व्यवसायाचे नाव टाकताना जे कायद्याने नाव असेल तेच टाका. पुढे उगाचच गांव अथवा Category नका जोडू. Keywords वगैरे अजिबात चालत नाहीत.
  11. Practitioners म्हणजेच एखादा सल्ला वगैरे देणारे व्यावसायिक आपल्या firm चे नाव जोडू शकत नाहीत. त्यानी फक्त त्यांचे नाव तसेच आडनाव लावावे.
  12. पत्ता टाकताना जवळची खुण वगैरे टाकू नये. बिल्डींग नंबर वगैरे टाकायचा झाल्यास Add Line हा पर्याय वापरा.
  13. दुसऱ्या कोणी तुमचे बिझनेस लिस्टिंग तयार केले असेल, तर त्यांना सांगून तुम्हाला Primary Owner बनवा. हे फक्त त्यांनाच करता येईल, म्हणजे सर्व ताबा तुमच्या हातात येईल, यायलाच हवा.
  14. सारखी सारखी आपली Category बदलत राहिल्याने लिस्टिंग Suspend होऊ शकते.
  15. Seasonal Businesses बद्दल : जेव्हा Season असेल, उदा. गणपती ; तेव्हा व्यावसायिक तास सेट करायचे. जेव्हा सिझन नसेल तेव्हा Temporarily Closed असं निवडा. सिझन आला कि परत ON. फक्त बोर्ड मात्र कायम असायला हवा ( हे मात्र कसं व्हायचं हे कळले नाही )
  16. एकूण ३ फोन क्रमांक देता येतात. एकच त्यातला दिसतो. तो शक्यतो Landline असेल, शिवाय लोकल area code सकट ( उदा. ०२०-२४३२००४३ ) तर अधिक बळकटी येते.
  17. websites बद्दल सांगताना Redirected URLs  किंवा फेसबुक पेज वगैरे चालत नाही. थेट आपली website किंवा गुगल तर्फे मिळालेलीच.
  18. ९० टक्के लोक असे लिस्टिंग पाहतात, ज्यांवर फोटोज भरपूर आहेत. हे फोटो तुम्ही किंवा तुमच्या ग्राहकांनीही टाकलेले असू शकतील.
  19. इतर कोणत्या apps वगैरे GBP ला कनेक्ट केलेल्या असतील, तर त्या ताबडतोब काढून घ्या. अडचणीत येवू शकाल.
  20. लिस्टिंग सस्पेंड सुद्धा होते , त्याची मुख्य करणे ही : keywords नको इतके घातलेत, co-working space मध्ये बिझनेस लिस्ट केलाय; online फक्त असलेला बिझनेस लिस्ट केलाय, आणि अनेक..... 

इतकं महत्त्वाचं आहे का हे सगळं ?

जर तुमचा व्यवसाय सर्च वर अवलंबून असेल, तर निश्चितच आहे. कारण गुगल लिस्टिंग सस्पेंड झालेलं परवडणार नाही तुम्हाला. त्यापेक्षा Guidelines सांभाळलेल्या च बऱ्या. शिवाय ह्यामुळे profile optimize तर होतेच की !

तुमचं एखादं दुकान आहे, आणि तुम्ही गुगल वर नाही, असं असेल, तर मात्र विचार कराच करा , कारण :-


शंका, प्रश्न, प्रतिक्रिया जरूर द्या !

Sunday, 19 June 2022

पहिलं पाऊल:- WhatsApp Automation

WhatsApp आपण अक्षरशः जाता येता वापरतो. तरीही मी पाहतो की फारच कमी लोक अजून बिझनेस व्हॉट्सॲप वापरतात.

हे वापरण्याचे काही फायदे :-

१. विनामूल्य आहे.
२. व्यक्तिगत म्हणजे मेसेंजर वरून इथे शिफ्ट झालात तरीही तुमची chat history अजिबात delete होत नाही.
३. नंबरही तोच राहतो. फोनही.
४. समोरच्याला काही कळण्याच्या संबंध नाही फार. 
५. एकाच फोन मध्ये २ सिम स्लॉट असतील तर एकावर तुमचा वैयक्तिक व एकावर बिझनेस install करता येतं.
६. परत परत व्यावसायिक माहिती पाठवायला यात catalogues आहेत. तसेच quick reply हा पर्याय आहे.
७. लेबल वापरून chats pin अधिक प्रमाणात करता येतात.
८. Profile वरील share वरून qr code घेता येतो.

काहीच करायचे नाही. आपल्या चालू नंबरवर किंवा दुसऱ्या नंबरवर बिझनेस व्हॉट्सॲप install करायचे. बास.

Tuesday, 14 June 2022

आपला सर्वात मौल्यवान ग्राहक कोण ?

माझ्या मते जो आपल्याला सर्वाधिक काल स्वत:सोबत ठेवतो, तो !

कारण, तो आपल्या कुवतींवर विश्वास ठेवत असतो. आपल्या कडून कमी जास्त झाले तरी काम करून घेत असतो, आणि आपल्याला आपला धर्म निभावायची संधी देत असतो. त्यामुळे कितीही बिग Big Ticket Clients आले - गेले तरी ह्या वर्गातल्या ग्राहकांकडे सर्वात आधी लक्ष द्या.

ह्यांच्या साठी मी आणखी काय करू शकेन ?


हा विचार उद्योजकाच्या सतत केंद्रस्थानी असायला हवा. असं जरुरी नाही कायम कि माझ्याच कोणत्या product किंवा सेवाच ह्याकरता उपयुक्त व्हाव्या. मी इतरही काही करू शकेन. जसे कि ....
  • माझ्या संपर्कातले एखाद-दोन कनेक्ट देवू शकेन
  • माझ्या संपर्कात काही ओळखी करून देईन
किंवा असेच काही ....
बघा काही सुचते का, आणि सांगाही !


Wednesday, 8 June 2022

कामाची खरी पोचपावती ....

व्यवसायाचा भाग म्हणून आपण reviews वगैरे मागतोच. तरीही अधून मधून काही अत्यंत समाधान देणारे क्षण येतात आणि आपला कामाचा उत्साह टिकून राहतो.

आजच आमचे एक ग्राहक श्री अडसूळ ह्यांनी मला एक पोस्ट पाठवली ज्यात त्यांनी आमचे ट्रेनिंग ३ जणांना नुसते सांगितलेच नाहीये, तर चक्क त्यांचे नंबर सुद्धा मला पाठवले.

मी "धन्यवाद" म्हणताच त्यांची प्रतिक्रिया अशी होती कि, 

ज्या गोष्टी ते workshop मध्ये शिकले त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष रोज खूप leads मिळत आहेत, आणि हाच अनुभव ते त्यांच्या ग्रुप मधील इतर व्यावसायिकांना देवू इच्छित आहेत
महत्त्वाचं हे आहे यात , कि ही कृती सदर गृहस्थांनी जवळपास दोन महिन्यांनतर केलेली आहे. कधी कधी लगेच लोक भावनेत reviews वगैरे देतात. पण हे अगदी भरपूर वापर करून मगच आलेले आहे, त्यामुळे कर्माचे समाधान यातून मिळेत. त्याची गोडीच आगळी !

सर्वात महत्त्वाचं म्हणजे : आपल्या सेवांचे पैसे मिळणे हे आपल्यासाठी " उत्पन्न " आहे पण ग्राहकाच्या मात्र "खर्चातला" भाग असतो. हा खर्च ग्राहक कोठून करणार, तर त्याच्या उत्पन्नातून. हे त्याचं उत्पन्न वाढायला आपले उत्पादन किंवा सेवा मदत कशी करू शकेल हा विचार आपल्या व्यवसायाच्या केंद्रस्थानी सतत ठेवायला हवा !

Load नव्हे; Purpose ....

मला काही दिवसांपासून खूप stressed वाटत होतं. खोदून खोदून पाहिलं तरी विशेष कारण सापडत नव्हतं. इथे मानसिक आरोग्याची tools काही काळ उपयुक्त ठरली, पण औट घटकेचीच. कारण हे ओझे अगदी सतत आहे डोक्यावर असं Feeling येत होतं. मी NLP शिकलोय. त्यातून "भावना बदलून" पहिली, प्रारूपे बदलून. तरी हे कायम स्वरूपी ओझे काही साथ सोडेना.

आणि तो क्षण सापडला 

"पडसाद कसा आला न-कळे; अवसेत कधी का तम उजळे" असं काहीसं घडलं आणि त्या एका Realization च्या क्षणी मला उमगलं एक सत्य : कदाचित माझ्यापुरतं आणि क्षणात ताण हलका झाला. काय उमगलं ? 

Load नव्हे , तर Purpose आहे !

ज्याचं मला ओझं वाटत होतं, तोच तर हेतू आहे माझ्यासाठी  कार्यरत राहण्याचा ! हे नसतं तर काहीतरी दुसरं केलं असतं ना ! ओशो ह्यांची एक-दोन जुनी व्याखाने आठवली .... ते म्हणतात : "मैं क्यूँ अशांत हूँ यही विचार मन को अस्वस्थ करता हैं , स्वीकार लें के मैं अशांत हूँ, तो अस्वस्थता गायब" असंच काहीसं झालं असावं.

बस त्या load चा विचार समोरचं काम करताना "हवं-नको" चं फिलिंग आणत होता. तो गायब झाल्या झाल्या मला कामात मजा येवू लागली परत. योगायोगाने रिक्षा बोलावली होती, ती अशी काय चकाचक होती, की बास रे बास. सभोवतालचा परिसर देखील एकदम छान भासायला लागला ....