Wednesday, 30 August 2023
भपक्या पेक्षा स्वत्व महत्त्वाचे !
Monday, 14 August 2023
"कोण" पेक्षा "कुठून" हे अधिक महत्त्वाचे....
आपल्याला शोधणारा आपल्याला नक्की कुठून म्हणजे कोणत्या ठिकाणाहून शोधत आहे हे पहिले जाणून घेऊन त्याप्रमाणे विचार करायला हवा. बरेचदा जे साधारणपणे ऑफलाइन लोक असतात ज्यांच्या एकाच ठिकाणी दोन-तीन गोष्टी दुकानात ठेवलेल्या असतात ते त्या दोन तीन गोष्टी गुगल listing मध्ये एकत्र टाकता येतील का असं विचारतात.उदाहरणादाखल फोटोमध्ये दाखवलेले एक दुकान पहा👇🏻
कोकणात किंवा छोट्या गावांमध्ये साधारण अशा प्रकारची दुकाने आढळतात. या दुकानात खाद्यपदार्थ, किराणामाल तसेच सायकलचे पंक्चर काढायची देखील सोय आहे.एका लहानशा गावाच्या दृष्टीने ही अगदी योग्य अशी सोय आहे. तरीही गुगलवर या दुकानाचे लिस्टिंग करताना तिन्हीपैकी एक निवडावे लागेल.
एकतर सायकलचे दुकान किंवा किराणा मालाचे दुकान किंवा उपहारगृह.
"हे असं का" हे समजून घेण्याची गरज आहे. गुगलवर तुमचं दुकान शोधणारा त्या रस्त्यावर नसतो किंवा त्या गावातही नसतो त्यामुळे आल्यावर एकाच ठिकाणी तीन गोष्टी मिळणे हे तो पाहत नसून आधी पाहत असतो की याच्यापैकी कदाचित एखादीच गोष्ट कुठे मिळेल. कारण गुगलवर सर्च टाकताना "सायकलचे दुकान किंवा किराणा मालाचे दुकान किंवा उपहारगृह" असे टाकत नाहीत तर त्यापैकी कदाचित एकच गोष्ट टाकली जाईल._सायकल दुकान अधिक उपहारगृह व सोबत किराणामाल असे देखील शोधले जाणे तसे अवघडच._त्यामुळे गुगलच्या शोध मोहिमेत तुम्हाला झळकायचं असेल तर गुगलवर शोधणारी व्यक्ती ही काय सर्च टर्म टाकेल हे पाहूनच लिस्टिंग तयार करावे.यातली एक टीप अशी की एकावेळी एका ठिकाणी एकच व्यवसाय नोंदा. त्याच ठिकाणी दुसरा व्यवसाय नोंदविता येत नाही हे लक्षात ठेवा.
Monday, 31 July 2023
एकच ट्रेनिंग, पुन्हा पुन्हा का बरे करतात मंडळी ?
Tuesday, 25 July 2023
संख्या व खरी परिणामकारकता
बिझनेस नेटवर्क्स व्यवस्थित चालावी यासाठी त्यातील प्रमुख घटक म्हणजे त्या त्या नेटवर्क चे मेम्बर्स ह्यांनी कृतीशील राहावे लागते. आणि ते राहावेत ह्यासाठी नेते मंडळी अनेक प्रकारे शक्कल लढवीत असतात. त्यातली एक शक्कल म्हणजे : अमुक एक संख्याबळ मिळविणे व त्याला जोडून असलेला एखादा खास मान-सन्मान.
ह्यातील उद्देश तसेच हेतू निश्चितच उदात्त आहे ह्यात शंका नाही. कारण अणूक एक संख्येत घोळत पडलेला एखादा ग्रुप ह्या उद्दिष्टाने जरा ढवळला जातो, त्यांचे म्होरके कामाला लागतात आणि एक उर्जा संचारते. ही उर्जा संक्रमित होते व नवनवीन मेंबर जोडले जातात. ह्याची परिणती अर्थात उत्तम प्रकारे व्यवसाय वाढण्यात होऊ लागते, जे की नेटवर्क चे प्रमुख साध्य असते.
हे काम जर योग्य रीतीने केले, तर खूप छान परिणाम मिळतात. एक तर व्यवसाय वाढीला लागतो , शिवाय नाठाळ मंडळी बाद होवून कर्तृत्त्ववान मेंबर चमकू लागतात.
ह्याउलट जर विवेक राखला नाही, तर मात्र "नुसती संख्या" हा एक नंबर गेम होतो, विचित्र संस्कृती तयार होते आणि गाडी रसातळाला जावू लागते. त्यामुळे कर्तव्याचा काहीतरी माप-दंड हवाच.
ह्याच संदर्भात मी ज्या क्लब चा सदस्य आहे, तिथे ५० ही संख्या प्राप्त झाली, की एक विशेष सन्मान दिला जातो. मी एक प्रस्ताव दिलाय तो असा, की याकरिता त्या ग्रुप ने निदान ३ महिने सलग ५५ ही संख्या राखून दाखवावी. त्यानंतर त्यांचा सन्मान करावा.
पाहू काय होतंय !
Wednesday, 28 June 2023
माझ्यासाठी जे Right; तेच राईट !
३-४ महिन्यांपूर्वी मला एका हितचिंतक मित्रा कडून सरकारी कामाची एक संधी आली. संधी मला Next-Level घेवून जावू शकेल अशी. दिवसभर बसून मी सर्व कागदपत्रे तयार करून दिली. शेवटी त्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी मला जराशा विचित्र अटी फेकल्या , त्या खालील प्रमाणे :-
- तुमचा कोर्स केल्याने उद्योजक पुढच्या महिन्यापासून अर्थार्जन करायला लागलाच पाहिजे.
- त्यातून निदान ८० टक्के लोक अर्थार्जन करायला लागलेच हवेत.
- डिजिटल कोर्स अगदी स्वस्तात व्हायला हवा.
- अधिकाऱ्यांनी "ओके" म्हटले, कि तुमचे पैसे फटक्यात रिलीज.
- आपण सगळ्यात "बाप" असू, पण सरकारी खात्यात आपल्या हातात काहीच नाही.
- अगदी क्लीन अधिकारी वर्ग असला, तरीही तर प्यादे कुठे अडले कि सगळे नामानिराळे होतात. मरतो, तो उद्योजक.
- अशा केसेस मध्ये आर्थिक तर होतंच, शिवाय मानसिक नुकसान देखील प्रचंड होऊ शकतं, वेळ खूप जातो हे अतिरिक्त.
- अगदी Defined प्रकारचा Product किंवा सेवा असेल, उदा. Dunlop चे tyre supply, तर ठीक आहे. पण असे कोणते उत्पादन किंवा सेवा असेल, ज्यात नवीन पणा आहे, आणि ज्यात काही मान्यता देणारे अधिकारी आहेत, अशात सरकारी खात्यात हात न घालणे हे योग्य.
Thursday, 1 June 2023
कस्टमर बदलतोय....
Sunday, 21 May 2023
इथे Steve Jobbs चं काय काम ?
IIT , IIM , MIT किंवा London School of Economics वगैरे मध्ये जावून शिक्षण घेणे किंवा इथे शिकून आलेले, फंडे करणारे लोक्स हा एक नवा वर्ग निर्माण झालेला आहे.
ह्याच्या सोबत, सतत कायम बाहेरच्या लोकांचीच ( नेट वरील ) उदाहरणे घेवून आणि देत राहणे हा देखील एक वर्ग आहे.
शिवाय, इथल्या देखील प्रथितयश लेखकांची अभिवचने share करणे, संस्कृतातील सुभाषितांचे दाखले देणे ही देखील एक पद्धत रुजू असते.
.jpeg)

.jpeg)


.jpeg)
