Dan Kennedy हा इंग्रजीतील एक प्रतिथयश लेखक आहे. मार्केटिंग मधील एक दादा माणूस आहे. त्याचं हे आत्मचरित्र स्वरूप लेखांचा संग्रह असलेलं पुस्तक. My Unfinished Business मला त्यात भावलेले काही भाग :-
( निवडक उद्यमी मध्ये ह्या पुस्तकातील काही भाग आम्ही चर्चेला घेतला होता. त्याचे video recording)
पान 17. पहिल्याच पानावर त्याने आयुषातल्या घटनांची केलेली उजळणी :
काय असेल पुढे ह्याची लख्ख कल्पना आली, आणि तसेच आहेही. बिनधास्त पणे अनेक लोकांची नावासकट करून टाकली आहे, आभार सुद्धा मानलेत. अपराधी भावना पासंगाला सुद्धा नाहीये.
पान ४५ ते ५० : कौटुंबिक वाईट आर्थिक परिस्थितीचा झालेला खोलवर परिणाम त्याने ४ ते ५ मुद्द्यांत छान मांडला आहे. त्यातला त्याच्या आईचा " Negative Anticipation" हा मुद्दा खासकरून अगदी पटला. याचा त्याला इतका फायदा झाला, कि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाताना एक सामर्थ्य प्राप्त झाले.
पान ५३ : एखादी तात्पुरती भीती ला सामोरे न गेल्याने कसे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते ह्याचे एका अनुभवाद्वारे कथन
पान ६४ : आपल्या शिक्षणपद्धतीत " संधी न दाखविणे" हि मोठी त्रुटी
पान ८१-८३ : कोणत्या वातावरणात आपण स्वत: यशस्वी ठरू शकतो, म्हणजे घरातले तसेच कार्यालयातील सभोवताल ह्याबद्दल केलेले सखोल भाष्य. ह्याला त्याने Success Environment हा शब्दप्रयोग वापरलाय.
पान १३९ : कोणते ग्राहक घ्या ? बहुमुल्य सल्ला.
पान १५५ : पर्याय निवडून तेथेच फक्त क्रयशक्ती चा विनियोग करण्याची पद्धत
पान १८२-१८८ : स्वत:च्या लेखन-व्यवसायाबद्दल विस्तृत लिहिलंय
पान १८९-१९० : वाचनाचा शिस्तबद्ध कार्यक्रम राबविणे ह्याबद्दल.
पान १९६ - १९८ : स्वत: किती व कसे पैसे मिळवितो
पान २२१ : Psycho-Cybernetics बद्दल
पान २५० : स्वत:चे व्यवसाय विकले
पान ३०१ - ३०२ : pricing बद्दल महत्त्वाचे विचार
पान ३२९ : कुणाचे ऐकावे
पान ३८४ - ३८८ : एका plumbing agency ची क्लासिक मार्केटिंग स्टोरी
सदर पुस्तक amazon वर उपलब्ध आहे : ही लिंक वापरू शकता