निमित्त होते, निवडक च्या त्रैमासिक बैठका. त्याबद्दल पुन्हा कधीतरी बोलू. तर गेल्या महिनाभरापासून हे सुनियोजित आणि तरीही कोणत्याही प्रकारच्या ताणविरहित पार पडले. एकत्र प्रवास केल्याने संबंध, मैत्री अधिक घट्ट झाली. ३ तारखेला निघून ४ तारखेला परभणी ला पोचलो आणि पाठोपाठ L R Pharma येथे सकाळी आलो.
आधी एक सादरीकरण झाले. त्यात डॉक्टर स्वत: व सोबत त्यांचे दोन्ही चिरंजीव, स्नुषा तसेच तिसरी पिढी ( नातू ) ह्यांचाही सहभाग होता.
संध्याकाळी ( रात्री ) ऐसपैस निवांत क्षणांत गप्पा अधिक खुलल्या, रंगल्या. डॉ स्वत: Veternary Medicine ह्या क्षेत्रात अत्यंत सन्माननीय आहेतच, शिवाय जनावरांची आयुर्वेदिक औषधे ह्या क्षेत्रात बहुधा एकमेव असावेत. सरांचे अनेक प्रबंध, पुस्तके इत्यादी क्षेत्रात प्रचलित आहेत.
त्यांच्याच पावलावर पाउल ठेवून ज्येष्ठ चिरंजीव हा देखील "डॉक्टर सौरभ" आहे, जो आता कनिष्ठ चिरंजीव सिद्धांत, जो एका प्रथितयश संस्थेतून व्यवस्थापन शिकून तयार होवून आलाय. ह्या दोघांनी स्वेच्छेने कुटुंबाच्या उद्योगात प्रवेश केलाय, ढकललेले नाही, हे विशेष. स्नुषा कल्याणी ही कंपनीच्या उद्योगाचे दर्जा नियंत्रण पाहते, स्वत: उच्च विद्या विभूषित आहे, तर आता ही पिढी सध्याच्या उत्पादन कारखान्याव्यातिरिक्त आता अजून एक कारखाना अशी मोठी झेप घेत आहेत, सोबत एक अत्याधुनिक प्रयोगशाळा सेट अप असाही मोठ्ठा मानस आहे.
दुसऱ्या दिवशी ह्याला जोडून निवडक ने थोडे पर्यटन केले :-
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.