Saturday, 11 October 2025

उद्योगाचे पुढील पिढीत यशस्वी संक्रमण !

निवडक उद्यमी चे पूर्वापार सदस्य आहेत, त्यापैकी डॉ राजूरकर हे एक सदस्य. परभणी मध्ये त्यांचा L R Pharmaceuticals हा उद्योग गेली २५ वर्षे उभा आहे, आणि विशेष म्हणजे पुढच्या पिढीत आता संक्रमित देखील झालाय. नुकतीच निवडक उद्यमी च्या काही मंडळींनी त्यांच्या उद्योगास भेट दिली, त्याबद्दल वृत्तांत :-



निमित्त होते, निवडक च्या त्रैमासिक बैठका. त्याबद्दल पुन्हा कधीतरी बोलू. तर गेल्या महिनाभरापासून हे सुनियोजित आणि तरीही कोणत्याही प्रकारच्या ताणविरहित पार पडले. एकत्र प्रवास केल्याने संबंध, मैत्री अधिक घट्ट झाली. ३ तारखेला निघून ४ तारखेला परभणी ला पोचलो आणि पाठोपाठ L R Pharma येथे सकाळी आलो.



आधी एक सादरीकरण झाले. त्यात डॉक्टर स्वत: व सोबत त्यांचे दोन्ही चिरंजीव, स्नुषा तसेच तिसरी पिढी ( नातू ) ह्यांचाही सहभाग होता.











संध्याकाळी ( रात्री ) ऐसपैस निवांत क्षणांत गप्पा अधिक खुलल्या, रंगल्या. डॉ स्वत: Veternary Medicine ह्या क्षेत्रात अत्यंत सन्माननीय आहेतच, शिवाय जनावरांची आयुर्वेदिक औषधे ह्या क्षेत्रात बहुधा एकमेव असावेत. सरांचे अनेक प्रबंध, पुस्तके इत्यादी क्षेत्रात प्रचलित आहेत. 



त्यांच्याच पावलावर पाउल ठेवून ज्येष्ठ चिरंजीव हा देखील "डॉक्टर सौरभ" आहे, जो आता कनिष्ठ चिरंजीव सिद्धांत, जो एका प्रथितयश संस्थेतून व्यवस्थापन शिकून तयार होवून आलाय. ह्या दोघांनी स्वेच्छेने कुटुंबाच्या उद्योगात प्रवेश केलाय, ढकललेले नाही, हे विशेष. स्नुषा कल्याणी ही कंपनीच्या उद्योगाचे दर्जा नियंत्रण पाहते, स्वत: उच्च विद्या विभूषित आहे, तर आता ही पिढी सध्याच्या उत्पादन कारखान्याव्यातिरिक्त आता अजून एक कारखाना अशी मोठी झेप घेत आहेत, सोबत एक अत्याधुनिक प्रयोगशाळा सेट अप असाही मोठ्ठा मानस आहे. 

दुसऱ्या दिवशी ह्याला जोडून निवडक ने थोडे पर्यटन केले :-




दुसऱ्या दिवशी सर्व सकाळी पुनश्च मुक्कामी आलो. आता पुढची त्रैमासिक भेट जानेवारीत असेल. ह्या भेटींचे कारण असे आहे, कि आपण एकमेकांचे संचालक मंडळ. तीन महिन्यांचा अहवाल आकड्यांच्या स्वरूपात सादर करायचा आणि अपेक्षित परिणाम साधायचा.

Thursday, 2 October 2025

संधी इथेच आहे !

निर्यात म्हणजे तसं पाहता काय असतं वेगळं ? इथे जवळ काही वस्तू पाठवायच्या ऐवजी लांब पाठवायची. लहान गोष्टी पाठवताना तर ही कटकटच वाटते,नाही का ? 

उदा. कुणी खाद्य पदार्थ तयार करतय तर लांब  म्हटलं की जरा जीवावरच येतं. 

इतकं आणि इतकंच साधं ठेवलं ना आपण, म्हणजे त्या so called "export" चा गरिमा काढून टाकला की मग आपण प्रत्यक्ष, सहज विचार करू लागतो, त्याला प्रवृत्त होतो.

उदा. नुकताच मी मध्यपूर्वेच्या देशांत जाऊन आलो. काही काम मिळाले होते. तर पाठोपाठ, सवयीने तिथेच पुढे काय संधी त्याकरता पुन्हा एक प्रदर्शन असेल त्याला जावे का, वगैरे महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात मन गुंतू लागलं. 


तरी पुढची कोणतीही पावले उचलण्या पूर्वी काही गोष्टी विचारत घेणे योग्य, जसे की 

जे काम तिकडे निर्यात करू पाहतोय,त्याला इथेच खूप मागणी आहे ना !
कधी तरी येणाऱ्या spikes वर संपूर्ण रणनीती आखणे पूर्ण चूक
तिथेही ( आखाती देशांत ) त्यांना scale up करणे ही मोठी समस्या भेडसावते, जी आपल्याकडे अजिबात नाहीये.
मान्य की आपल्याकडे जरा गोंधळ आहेत, पण त्यातच अमाप संधीही आहेत.

सरतेशेवटी एवढेच म्हणायचे आहे,की इथेच आपल्याला आपले काम देऊ करण्यासाठी वाव असेल, तर परदेशी काम करू नये असे नाही, पण वाट पहावी, रणनीती आपल्याच करता आखावी. 

सध्याच्या अमेरिकी आयातशुल्क प्रकरणाने अनेक दिग्गज मंडळींना जागेवर आणले असेलच !