नुकतंच प्रसाद कात्रे ह्या printing व्यवसायात गेले ४० वर्षे हून अधिक असलेल्या व्यावसायिक मित्राने
निवडक उद्यमी ग्रुप वर त्यांचा व्यवसाय पुढे कोण सांभाळेल ह्याविषयी काही विचार शेअर केले.
त्यांच्याच मुलांनी वगैरे नाही, तरी निदान एखादा होतकरू धुरीण तयार करता येईल का वगैरे सांगोपांग चर्चा झाली.
तत्पूर्वी माझ्या संपर्कातील दोन ते तीन दुसऱ्या पिढीतील उद्योगांना मी भेटून आलो होतो.
एकाने वडिलांचे व्यावसायिक नाव सुरू ठेवले आहे, पण व्यवसाय मात्र बदलला आहे, आणि फायद्यात आहे व्यवसाय, परंतु दुसऱ्या पिढीत भव्य दिव्य वाढ अजिबात झालेली दिसत नाहीये,की, फार इच्छा सुद्धा नाहीये दिसत. त्याच्या पुढच्या पिढीत कुणी आहे का ? तर नाहीच दिसत. थोडक्यात उत्तराधिकारी ह्या विषयात जरा साशंकता च दिसते आहे.
दुसऱ्या व्यवसायात वडिलांच्या धंद्याच्या पूर्ण विरुद्ध धंदा मुलगा करतो आहे. त्यातही वडिलांचा सहभाग विशेष दिसत नाहीये. म्हणजे knowledge transfer ही प्रक्रिया तरी किमान असावी, तर तीही दिसत नाहीये. म्हणजे म्हणायला दुसरी पिढी, परंतु तसा उपयोग शून्य. उत्तराधिकारी वगैरे विचार तर शिवले ही नसावेत.
तिसरा उद्योजक पहिल्या पिढीचा. धडाडीचा. उत्तम माया कमावलेली आहे. स्थावर स्वरूपात आहे. परंतु लिक्वीड asset मध्ये बऱ्यापैकी संघर्ष दिसतोय. शिवाय स्वतः एकटीच व्यक्ती manage करते आहे. नुकतेच त्यांनी अनेक वर्षे सुरू असलेल्या व्यवसायात फार भविष्य दिसत नसल्याने नवे बिझनेस मॉडेल स्वीकारले आहे. ही व्यक्ती चतुर आहे, पैशात. त्यामुळे bisleri प्रमाणे ह्यांनी देखील उत्तम किमतीला बिझनेस विकून टाकला, तरी मग उत्तराधिकारी वगैरे नसेल, तर इथेही समस्या आहेच.
यासंदर्भात माझ्या CA शी मी माझ्या व्यवसायाबद्दल चर्चा केली असता त्यांनी एखादी होतकरू व्यक्ती पाहून त्याला घडवायचे सजेशन दिले. वरकरणी चांगले वाटले हे उत्तर, तरी ....
त्या व्यक्ती ला हा बिझनेस आकर्षक वाटेल का, हा प्रश्नच आहे. त्यामुळे वेळेत आवरते घेवून माझा व्यवसाय माझ्यासाठी मरेपर्यंत निदान कर्माचे साधन झाला तरी ठीक म्हणतो मी !