Tata ग्रुप बिसलेरी कंपनी Acquire करणार अशी जवळजवळ खात्रीशीर बातमी आहे आता बाजारात. ह्यातून tata ग्रुप नक्की काय मिळवतोय वगैरे मी माझ्या water business blog वर लिहिलंय. तितकंच महत्त्वाचं श्री रमेश चौहान ह्यांच्या बद्दल समजून घ्यायचं असा विचार आला मनात. हे रमेश चौहान म्हणजे बिसलेरी चे मालक. रु ७,000 कोटींना हि कंपनी विकणारा हा अवलिया हे पहिल्यांदाच करत नाहीये.
मुळात १९६५ ते १९७० दरम्यान ह्यांनी एका इटालियन व्यक्तीकडून हि कंपनी ४ का ५ लाखांना विकत घेतली. १९९३ पर्यंत विशेष महत्त्व दिलेही नव्हते. कारण तो पर्यंत लिम्का, थम्स अप, गोल्ड स्पॉट असे जोरदार brands त्यांच्या खिशात होतेच. १९९१ मध्ये उदारीकरणाच्या लाटेत कोका कोला भारतात आल्या आल्या त्यांनी चौहान ह्यांच्या उत्पादन कारखान्यांना त्यांचे products करण्यासाठी आक्रमक मोहीम उघडली. तो पर्यंत पेप्सी देखील तयार होतेच. वेळेत काळाची योजना पाहून त्यांनी हे brands पटापट विकून टाकले आणि बिसलेरी वर फोकस केले.
आत्ताच्या घडीला बिसलेरी हा एक फक्त ब्रांड नसून एक Category च आहे. पण फक्त नाव नव्हे, तर उल्लेखनीय असे वितरण नेटवर्क उभे केले बिस्लेरीने : ४,५०० वितरक, ६००० वाहने तसेच १० लाखांहून अधिक दुकाने, किंवा तिथे प्रत्यक्ष बाटली घेतली जाते अशी स्थाने. ह्याच्या जोडीला काळाची पावले ओळखून सज्ज केलेले १३५ हून अधिक कंत्राटदार : जे बिसलेरी नावाने भारताच्या काना कोपऱ्यात हे उत्पादन करतात.
जाहिरात देखील दर्जेदार !
उंट ह्यांना आपल्या जाहिरातींद्वारे आपले Brand Ambassador वापरणारे बिसलेरी हे कल्पकतेत देखील मागे नाहीत. जाहिरात क्षेत्रांत अनेक वेळा बिसलेरी च्या जाहिरातींना पारितोषिके मिळत राहिली आहेत.