Friday, 27 May 2022

काही नाही, तर निदान Profile तरी handy ठेवाच ठेवा !

मिळालेल्या संधी लगेच respond करायला हव्यात ....

आपण छोटे व्यावसायिक, बऱ्याचदा आपल्याकडे मार्केटिंग प्रकारात कुणीच नसतं, म्हणजे आपले आपणच. शिवाय संधी आजूबाजूला निर्माण होत असतात. त्या Orders मध्ये रुपांतरीत करणे, जास्त प्रमाणात करणे हे व्हायला हवं.

यातला नं. १ चा Roadblock म्हणजे पाठवायची माहिती तयार नसणे. बरेचदा असं होतं, की, आपल्या बद्दल समोरच्याने बरेच बोलून ठेवलेले असते. आपल्याकडेही Product इन्फो वगैरे खच्चून असते; पण "माझ्याकडेच का" या संदर्भात खूप कमी माहिती असते. कित्येक वेळा नसतेच. 

ही अगदी सर्वात पहिली गरज आहे. का बरे ? कधीकधी एखादा मोठा कनेक्ट आपल्याला कुणी रेफर केला, आणि आपल्याकडून profile पाठवायला उशीर झाला, तर समोरचा माणूस थांबत नाही. असं निश्चितपणे होऊ शकतं.

त्यामुळे निदान profile तरी handy ठेवाच ठेवा. आणि याकरिता सर्वात सोप्पा मार्ग आहे linked-इन profile. 




मी का ? इतकंच ठेवा मनात, आणि Linked In चा profile भरत जा. अजून काहीच करायला नको सुरुवातीला.

sample म्हणून माझे पाहू शकता : https://www.linkedin.com/in/soumitra-ghotikar/

Sunday, 22 May 2022

स्वतंत्र व्यावसायिक ( Practitioners ) आणि Digital मार्केटिंग ....

केस स्टडीज करा ना !

आजच एका फोरम वर छान चर्चा झाली. की, स्वतंत्र Practitioners उदा डॉक्टर, architects, Counsellers वगैरे मंडळींनी डिजिटल किंवा इतर मार्गांनी जाहिरात मार्ग वापरावा कि नाही ....

सूर असा निघत होता की Practo वगैरे Apps ह्या तितक्या reliable नाहीयेत, शिवाय Ads मार्गांनी ग्राहक नाहीच येत. काही प्रमाणात सत्य आहे, पण 100 टक्के नाही. आणि ह्यामुळे जर कुणी डिजिटल मार्केटिंग, ads ह्यापासून दूर रहात असेल, तर मात्र तुम्ही तुमचं बरंच नुकसान करून घेताय, कारण जग तुम्हाला तिथे शोधताय आणि तुम्ही नाही आहात.

जगाला त्याच्या problems ना Solutions हवे असते. ते तो तो व्यावसायिक देतो, म्हणून त्याच्याकडे लोक जातात. ह्या अशा practical case studies तुम्ही तयार करा, नावे न घेता, आणि पोस्ट करा किंवा पाठवा कुणी विचारल्यास. हळूहळू एक मोठी बँक तयार होईल आणि तुमच्यासाठी Reputation Material.

कशा असाव्या Case Studies ?

  • माझ्या मते Written तरी असाव्यातच. म्हणजे key Words द्वारे कुणालाही search करता येईल, गुगल ला सुद्धा.
  • विडीयो केलात, तरीही Title व Description मध्ये थोडा तपशील द्या.
  • सर्च मध्ये येण्यासाठी लिहू नका. खरेच अडलेल्याला सापडेल असे लिहा.
बघा करून. शंका आहे ? टाका कमेंट द्वारे.....

Wednesday, 18 May 2022

कंटाळ्याला करूयात channelize !

OPC म्हणजेच स्वतंत्र सिंगल उद्योजकाची हीच थोडी तारांबळ उडत असते, की सगळं एकट्याने किंवा एकटीनेच करायचं असतं. ह्यात Automation कसं सध्या करता येईल, हे पाहायला हवं : म्हणजे मग कामे जरा सोप्पी होतात आणि हातात पण येवू शकतात. 

Automation टप्प्याटप्प्याने करावं ...

आपल्या नित्याच्या कामात सर्वात त्रासदायक भाग कोणता, ते ठरवावं, तो किती महत्त्वाचा आहे हे पहावं आणि त्याला आधी प्राधान्यक्रमाने Automate करावं.

मला Accounts ह्या प्रकारचा प्रचंड कंटाळा यायचा, येतो. त्यामुळे ह्याच्यावर मी सर्वात आधी फोकस केला. याच्या जोडीला follow अप चे सेल्स call, किंवा पैसे मागणे ह्यासुद्धा कामाचा मला तितकाच त्रास व्हायचा. एक अजून काम होतं, ते म्हणजे आठवून ठराविक तारखांना इमेल्स पाठविणे. एकदा कोटेशन दिली व त्या orders जर close नाही झाल्या; तर ते leads एकदम बाद न करता त्यांच्याशी निदान इमेल द्वारे तरी संपर्क करावा लागतो; त्याना आपल्या क्षेत्रातील updates पाठवत राहिले तर ते leads आपल्याला लक्षात ठेवतात शिवाय पुढे भविष्यात requirements देतातही. याचाही मला कंटाळा येतो.

ह्या कंटाळा प्रकरणाला च मग channelize केलं मी ....

"असा कसा कंटाळा येवून चालेल ?" ह्या आदर्श वादातून आधी बाहेर आलो, 

आता चक्क लिस्ट च तयार केली आणि एक छोटी scale तयार केली ....

  1. कंटाळा आणणाऱ्या गोष्टी 
  2. किती कंटाळा आणतात ( 0 ते १० scale वर )
  3. त्याचं महत्त्व किती ( 0 ते १० scale वर ) 

मग ह्या गुणांची केली बेरीज आणि सरासरी काढली 

  • ह्यात सर्वात जास्त सरासरी चे आयटम्स अग्रक्रमाने घेतले व त्यावर आधी काम सुरु केलं.
  • त्यात कधी tools वापरून, तर कधी delegate करून Automation केलं 
  • 100 टक्के Automation केलेलं नाही, नाहीतर ताबा सुटू शकतो.







अधिक माहिती किंवा मदत हवी असेल; तर जरूर Comment Section मध्ये जरूर पोस्ट करा.

Sunday, 15 May 2022

Case Study : ग्राहक ते नेटवर्क रेफरल .....

मी माझ्या दिवसाचा सर्वात पहिला ऐच्छिक भाग हा माझ्या "Existing Customers" साठी देतो. म्हणजे अगदी त्यांना उठून लगेच फोन, किंवा गुड morning वगैरे नाही; तर त्यांना attend करतो. काही महत्त्वाचे असेल, तर थेट संपर्क किंवा team ला कोणती तरी task पूर्ण करायला सांगतो. त्यांचा फोन येण्याची वाट पाहत बसत नाही.

असेच गेल्या आठवड्यात माझ्या एका Client चा पुस्तक प्रकाशनासाठी निमंत्रणाचा Call आला. मी फक्त एक Long Call करून जाणून घेतले की माझी कुठे help लागेल वगैरे. त्यात समजलं, की त्याना समारंभाचे विडीयो शूट तसेच इतरही रेकॉर्डिंग करून हवे आहे , असं. 

लगेच मी माझ्या नेटवर्क मधील फोटो वालीला फोन केला, आणि ते काम तिनेही मिळवलेच !

इतकं विशेष काय आहे ह्या स्टोरीत ?

एक म्हणजे : आठवणीने आपल्या Existing accounts म्हणजे कस्टमर्स चा विचार करणे. त्यांना आपला कुठे उपयोग होतोय ते पाहणे, आणि त्यांच्या अडचणी सोडविण्याचा सतत प्रयत्न हवा. 

दुसरं म्हणजे : हा विचार Pro Actively व्हायला हवा. स्वत:हून.

तिसरं म्हणजे : त्यांना त्यांच्या व्यवसायात अडचण नसली तरीही कुठे Growth करता येईल, असं पाहत राहायला हवं , सतत.

माझं तर हे जीवन सूत्रच झालंय : आपला ग्राहक आपली सेवा किंवा उत्पादन का बरं घेईल ? त्याला काहीतरी Value तर add व्हायला हवी ना ! फक्त हा जरी मध्यवर्ती विचार ठेवला तरी आपला व्यवसाय 10 X वगैरे ठाऊक नाही, पण आयुष्यभराच साधन होऊ शकतो.

Saturday, 14 May 2022

Are You Selling ?

व्यवसाय आपण मांडलाय त्यामुळे तो चालवायलाही आपणच हवा.

"चालवायला" हे महत्त्वाचं.

बिझनेस चालला नाही असं कधी कधी म्हटल जात. म्हणजे चालवायला जमलं नाही हेच सत्य. बस एका जागी उभी असते,ती चालक येवून चालवतो तेव्हा चालते. असेच जर धंदा चालता करायचा असेल तर तो उठून चालवायला हवा. नुसता विचार करून, dream करून चालणार नाही तो.

Dream ने चालकाला उर्जा मिळेल, त्यातून एखादं उद्दिष्ट येईल डोळ्यांसमोर. आणि मग त्यातून विविध प्रयत्न करत राहण्याची इच्छा शक्ती. Dream सुद्धा महत्त्वाचं, आणि प्रत्यक्ष बस चालवणे सुद्धा, त्यामुळे चला, सेल करुयात !