Saturday 31 August 2024

ह्यांना धंद्याची गरज नाहीये !

अनेक प्रदर्शनांना जो अनुभव येतो, तोच पुन्हा काल सुद्धा कॉपी पेस्ट. गंमत म्हणून अनुभव पोस्ट करतो, तुम्हाला पटेल, की शीर्षक किती योग्य आहे :-

१. मी stall धारक मंडळींना म्हणालो कि तुमचे मालक माझे मित्र आहेत, अनेक वर्षे ओळख आहे.

२. stall धारक जी यंत्रे विकतात , तीच मी सल्ला स्वरूपात देतो-देत असतो

३. प्रदर्शन मुंबईला, मी एका पुण्याच्या उद्योजकाला म्हणालो, अरे, माझी factory तुमच्या जवळ होती 

४. काही ठिकाणी मशिनरी मांडलेली, त्यावर बाटल्या च नाहीत, हा कसला डेमो !

५. एखाद्या ठिकाणी म्हणालो, कि Video करू का ? तर म्हणे Youtube पे देखो ना !

एक ना दोन, अनेक अनुभव, वरील एकही अनुभवात stall धारक व्यक्तीने ना नांव विचारले, ना काही उत्सुकता दाखविली.

असाच एक वेगळा अनुभव पुण्यात Startup Exhibition ला आला होता. तिथे ६ पर्यंत वेळ असूनही खुद्द stall धारक जे स्वत: Founders होते तेच ५ वाजता गाशा गुंडाळून मोकळे, तर दुसऱ्या एका stall वर Hospital साठी लागणारे एक Software होते आणि शेजारी Hospital साठी यंत्रे तयार करणारा Stall. दोघेही ३ दिवसांत एकमेकांना साधे भेटलेले देखील नाहीत.

बिझनेस नेट्वर्किंग क्लब्स मध्ये काही वेगळा अनुभव येत नाही. कित्येक वेळा रेफरल दिला असेल, आणि काय झाले म्हणून चौकशी केल्यावर सांगतात ... "त्यांच्याकडून काही आलेच नाही हो". बाबा, तुला धंदा देणे हे एकच काम आहे त्याचं आणि माझं जणू ...

मग फक्त इतकंच वाटतं ... ह्यांना गरज च नाहीये .....